आजोबागड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आजोबागड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ जुलै, २०१३

आजोबांच्या भेटीस ...... Trek to Ajobagad / Aja Parvat

हिरवे हिरवे गार गालिचे ,
हरित तृणाच्या मखमालीचे ..

पावसाळ्यात कुठे हि ट्रेक ला जा ,सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात , आनंदाच्या स्वर लहरी मध्ये .., संगीताचे वलय निर्माण करून ..

हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला , त्याच्या लावण्यमय सौंदर्याने ..., पण कधी कधी त्याच सौंदर्याला मानवी रूपाच एक डाग लागत . ती खंत मनास वाटू लागते . त्याचच वाईट वाटत खूप.

काल असच आजोबांच्या (आजोबा गड / आजा पर्वत ) भेटीस गेलो होतो ,जाता जाता निसर्गच ते भव्य , मोहक रूप नजरेत सामावून.

रस्त्याच्या दुर्तफा चहु कडे पसरलेली हिरवाई, अधे मध्ये पावसाची ओघळती सर , नद्या ओढ्यांचे , वाहते रूप , त्यातून होणारा खळखळाटी स्वर , नांगर घेऊन , बैलांस जुंपून जमिनीची मशागत करणारा शेतकरी , आणि दूर वरून एका ठिकाणी त्याच्या घराचे दिसणारे कौलारू छत ,
कुठे रस्त्या लगतच असणाऱ्या वसतीगृहातील , लहान मुलाचे, ' वेगळेवेगळे भाव दर्शवणारे निरागस चेहरे, असे अनेकानेक क्षण मनास भावतात , एक वेगळाच अनुभव घेत असतो आपण .

काल हि असाच काहीसा अनुभव आला . पण त्यात एक खंत हि मनी लागली .
कि मानवाने त्याच्या स्वार्था साठी निसर्गावर खूप घाव घातलेत , अजून हि तो घाव देतोयच आहे , त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. हे एक कटू सत्य आहे .

वृक्षतोडी नंतर , जंगलच्या जंगल उध्वस्त केल्यांनतर आता मानव '' डोंगरफोडी कडे'' वळला आहे .
कुठे हि जा , एक दृश्य हमखास दिसतं , ते म्हणजे डोंगराला पडलेली खाच , त्यावर पडलेले मानवी मनाने घडवलेल्या क्रूर यंत्राचे हात .

काही काळा ने हे डोंगर दऱ्या हि नाहीसे होणार कि काय ? अस चित्र डोळ्यसमोर येऊ लागत .
सगळीकडे एक सपाटी दिसू लागते , आणि त्यावर इमारतींचे मजलेच मजलेच रचलेले दिसू लागतात . ,
पुढे कृतीम रित्या तयार केलेली डोंगर दरयांची सजावट पाहण्यास लोकं त्यांच्याच परिसरात जावू लागतील.
असो ..पुढच ते पुढच पण आत्ताच काय ? थांबवू शकणार का आपण हे ?

नजरेने टिपलेल्या क्षणांनी मनाच्या भावना हळूच कधी उचंबळून जातात . त्यात कधी हास्य असते तर कधी खोलवर विचारात मग्न करणारी एक प्रेरक शक्ती .
असो ,

ठाण्याहून पहाटे ५:४४ ची आसनगाव लोकल ने आमच्या दहा जणांचा समूह ठीक ५:५६ ला आसन गाव स्थानकात उतरता झाला . पुढे आसनगाव येथून रिक्षा ने शहापूर कडे . तिथून मग एक टमटम ठरवून थेट देहने गाव .
ह्या वर्षीचा पावसाळ्यातला हा माझा , राजमाची , असावा नंतर चा तिसरा पण माझ्या बहिणी सोबतचा पहिला ट्रेक , त्यामुळे आनंदातच होतो.

देहने गाव पासून , वाल्मिकी आश्रम कडे जाणाऱ्या रस्त्या ला , थोडा चढ चढून , आजोबा गडा कडे असा फलक दर्शविणाऱ्या पाटी जवळ रस्त्याच्या एका कडेला आम्ही गाडी पार्क केली (आमची टम टम ..)

संध्याकाळी ५ च्या आत तुम्ही परतणार ना ? ह्या अटीवर, टमटमचे चालक कैलास हे तयार झाले होते . त्यांना संध्याकाळी समर्थांच्या बैठकीस जायचं होत . आणि ते आम्हास तसं प्रत्येक वेळी बजावून सांगत होते . पण मनाच्या सदहृदयी भावेनेन .

गाडी इथेच लावतो ह , तुम्ही बघा , पाचच्या आधी या, जमलंच तर लवकर या ?
कैलाश ह्यांनी जाता जाता पुन्हा हे वाक्य उच्चारल, आम्ही खात्रीशीर येतो म्हणून सांगितल ,
अन बैलगाडीच्या त्या वाटेने धुक्याच्या राशीत लपलेल्या आजा पर्वताकडे पाहत त्या दिशेला आमची पाउलं पुढे पुढे टाकू लागलो .

आजोबागड
निसर्गसंपन्न अशी वनराई , इथेच वाल्मिकी ऋषि चं वास्तव्य होत . इथेच त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला ,
इथेच सीता मायेन , लव कुश अशा दोन पुत्रांना जन्म दिला . हाच तो आजोबा गड , लव कुश त्यांना आजोबा म्हणत , म्हणून आजोबा गड / आजा पर्वत .



























एक , सव्वा एक तासात आम्ही वाल्मिकी आश्रमात पोहचते झालो.
आणि पोहचताच तिथल्या एका वट वृक्षानी , त्याच्या गोलाकार विस्तीर्ण पसरलेल्या असंख्य पारंब्यांनी लक्ष वेधून घेतलं. .
त्याच्याच शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या , धर्मशाळेच, ' आतलं काम हि चालू असल्याच कळल. 
चौकशी केली असता , तिथेच काम करत असलेल्या त्या काकांनी , आतले चालू असलेल काम दाखविले...
इथे बरेच जण येतात , त्यामुळे राहणायचा प्रश्न असतो , त्यामुळे हे बांध काम चालू आहे .

बरेच जणू इथे राहू शकतील . दूर वरून येणारे , ५- १० दिवस इथे राहून मग निघू शकतील .
त्याचं बोलन ऐकल्यावर , मी नि यतीन त्या धर्म शाळेतून बाहेर पडलो ,
फार वेळ इथे न थांबता , थेट सीतेचा पाळणा येथे जावून मग पुन्हा आश्रमात येण्याच आणि मग इथला आजू बाजूचा परिसर पाह्ण्याच निच्छित झालं होत . त्यानुसार फार वेळ न दवडता आम्ही १५ मिनिटात तिथून निघालो , पण जाता जाता जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या, केवीळवाण्या,त्या किंकाळीने मन सुन्न झाले होते .

मंदिराच्या थोड्या पुढे, काही अंतरावर एका ठिकाणी शेळीच्या त्या निष्पाप छोट्या पिल्लूचा बळी घेतला जात होता . देवाच्या नावाने, ते किंचाळत होतं, जीवाच्या आकांताने . पण ते किंचाळण काही क्षणाचाच होत .
जीव जाताच ते किंकालन हि त्या शांततेत ते विरून गेल .

मन त्यातच पुढे वाहू लागल .
आश्रमाच्या मागच्या बाजूने , धबधब्याच्य वाटेने पाउलं पटपट पडू लागली . घन दाट जंगलाच ते रूप आणि सोबत पक्षांचे सुरेल स्वरगीत आणि वाहते नितळ , शुभ्र धवल असे धबेधबे पाहण्यात मन एकरूप व्हाऊ लागल .

सव्वा तासाच्या, दगडांच्या त्या राशींवरून ती चढ चढून आम्ही दुपारी १२:३० ला सीतेच्या पाळणा ह्या ठिकाणी , त्या गुहेच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. 




























एका बाजूला व्ही आकाराची खोल दरी , आणि त्या दरी ला रौद्र तसेच भव्य असे रूप बहाल करणारे धुक्याचे दाट थर 
आणि ओथंबून वाहणाऱ्या पावसाची सर ह्यांच्या एकत्रित मिलनाने तिथलं तेवातावरनच इतकं आल्हादायक झालं होत . काय सांगू .......विचारू नका ...


अर्धा तासाचे ते आनंदी क्षण आणि सीतेचा पाळणा , ती गुहा पाहून , नजरेत सामावून नि स्मृतीत ठेवून आम्ही आश्रमाकडे परतू लागलो .

दुपारी १ च्या सुमारास आम्ही खाली उतरण्यास सुरवात केली आणि २:३० च्या सुमारास आश्रमात दाखल हि झालो . 
मग नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मशाळेत जेवण वगैरे उरकून आसपासचा परिसर पाहू लागलो .


पावसाची संततधार अजून हि तशी सुरुच होती. खाली येता येता त्या घनदाट जंगलातून पावसाने चांगलेच झोडपले होते , सर्वजण ओलेचिंब झालो होतो. 

त्यातच आम्ही जेवण उरकलं आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यसाठी बाहेर पडलो.






वाल्मिकी आश्रम कडे जाताना समोरच एक विरगळ , आणि सतीशीला आहेत , ते पाहून त्या संबंधी प्रश्न चिन्ह निर्माण झाले ? हे इथे कसे ? इथे काही लढाई वगैरे घडली आहे का ?
कारण आजोबा गड ह्या विषयीचा इतिहास माझ्या वाचण्यात कुठे आला नाही ?

आजोबा गड म्हणजेच आजा पर्वत , वाल्मिकी ऋषि तसेच सीता माई , लव कुश ह्यांच्या वास्तव्याने पावन झालेलं एक पवित्र स्थान. ह्या व्यक्तीरिक्त अजून तरी मला काही माहित नाही . कुणाला काही माहित असल्यास जरूर सांगावे . हि विनंती .

वाल्मिकीची ऋषि ची समाधी पाहून झाल्यास त्याच्या शेजारीच शिव मंदिर आहे , तिथे काही देव देव देवतेचे शिल्प आहेत , त्यात गणेश मूर्ती , विठ्ठल रखुमाई असे काही देविकाची शिल्प आहेत.
त्याच्या थोडा पुढे अजून एक शिव मंदिर आहे. पण आत पाणी आणि गाळ साचल्यामुळे काही आतील शिल्प अथवा शिव लिंग दिसण्यात येत नाही.

कुठे हि बाहेर गेल्यास वेळेच बंधन हे असतच , ते पाळावच लागतं, मनात असो वा नसो ,
आम्ही हि कैलास ह्यांना ५ ची वेळ दिली असल्यामुळे, साडे तीनच्या आसपास आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो . ते सारे क्षण नजरेत आणि कॅमेरात कैद करून .....

अशा तऱ्हेने आजोबांच्या सहवासात दिवस कसा पटकन निघून गेला ते आमचं आम्हालाच कळल नाही .
असो पुन्हा लवकरच येऊ तुमच्या भेटीला ........आजोबा ..:)

संकेत पाटेकर
०२.०७.२०१३

काही सूचना :-
१) तीन वर्षा पूर्वी पावसाळ्यातच इथे एका मुलीचा , सीतेच्या त्या गुहे जवळ जातना , वर चढत असता त्या खोल दरीत पडून मृत्यू झाला होता . हे मी काही ब्लोग मध्ये वाचल होत . आणि प्रत्यक्ष आज आश्रमातील त्या बाबांकडून हि ऐकल . वर पर्यंत जाणे तसे सोपे आहे , नित्य नेहमी ट्रेकर्स मंडलींना ते काही अवघड नाही. पण जातना जरा जपूनच . कारण पावसाळ्यात तो कातळ ओलसर नि चिकट झाल्याने , घसरण्याची फार शक्यता असते . तेंव्हा पुढचा काय तो विचार करावा आणि मग जावे .

२) आश्रमातून सीतेच्या पाळण्या पर्यंत जाता जाता , त्या घनदाट रानातून , मच्छर नि काही चिमुकली पाखरं खूप त्रास देतात . त्यमुएल जाताना काय ते बदोबस्त करून जावे . ओडोमॉस वगैरे ,वगैरे.

खर्चाचा तपशील :-
थानेहून पहाटे ५:४४ लोकल ट्रेन आसनगाव
तिकीट दर - ३० रुपये (जाउन येउन )

आसनगाव ते शहापूर - रिक्षा
तिकीट दर : १० रुपये प्रत्येकी

शहापूर ते देहाने - टमटम
जाउन येउन दर १५०० सांगतात . तुम्ही १२०० पर्यंत येऊ शकता .