कलावंतीण ट्रेक अनुभव : सोमवार पासून ठरवलेलं
येत्या रविवारी कुठेतरी जायचच ट्रेकला त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची
,
पण काहीच सुचत न्हवत कुठे
जायचं शनिवार उजाडला तरी काही ठरल नाही ....कलावंतीणदुर्ग येथे जायचं अस मी बुधवार
का गुरवारी मित्रांना सांगितल होत तितकंच...पण पक्क न्हवत ... शेवटी शनिवार रात्री
९:३० वाजता कलावंतीण ला जायचं आहे हे मी ठरवून टाकल. आणि मित्रांना लगेच फोन
फिरवले. सकाळी ९:४५ वाजता असणारी पनवेल s.t डेपो मधून सुटणारी ठाकूरवाडी s.t
पकडायची अस निच्छित झाल.
कल्याण हून एक मित्र येणार होता...वाशीवरून दोघे येणार होते..आणि
ठाण्याहून आम्ही तिघे मित्र. असे सहाजन होतो आम्ही. सकाळी जायचं होत. म्हणून आपोआपच जाग
आली..तयारी वगैरे करून पाठीवर sack घेऊन मी आणि माझा मित्र आम्ही दोघे निघालो.
ठाणा station ला आलो. एक मित्र अजून येणार होता. त्याची वाट पाहत बसलो... सकाळची
८: ०१ ची पनवेल ट्रेन होती. ८:०० वाजण्यास फक्त ५ मिनिटे शिल्लक होती..गाडी
सुटायची वेळ आली होती ..अन मित्राचा अजून पत्ता न्हवता. शेवटी १ मिनिटाचा अवधी
शिल्लक असताना तो आला ...तेंवा कुठे बर वाटल....
९:१५ च्या सुमारास आम्ही s.t डेपो तिथे पोहोचलो. इतर मित्रांना भेटलो
. त्यातला एक मित्र दीड तास अगोदरच तिथे पोहोचला होता...त्यामुळे ...s.t कुठून
कोणत्या फलाटा वरून ..सुटते ..किती वाजता सुटते ...वगैरे सर्व माहिती त्याने काढली
होती. त्यामुळे काही प्रश्न न्हवता. frndship day त्याच दिवशी होता त्यामुळे
...एकत्र भेटलो तेंवा एकमेकांच्या हाताथ रीब्बिंस बांधल्या. अन frndship day.साजरा
केला. सकाळच कोणी काहीही खाऊन न्हवत आल ..त्यामुळे ...वडापाव वर ताव
मारला..पाण्य्च्या बॉटल्स भरल्या. आणि s.t येण्याची वाट पाहत बसलो. ९:४५ ची ती s.t
त्यादिवशी १०.०० च्या सुमारास आली. गर्दी इतकी न्हवती ...त्यामुळे लगेच बसण्यास
जागाही मिळाली. सर्वांच एकदाच तिकीट काढाल. सहाजानाचे ७२ रुपये झाले ...एकाचे १२
रुपये. साडे दहा - पावणे अकरा च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. समोरच V आकाराचा
कलावंतीण अन प्रबळ गड दिसू लागला होता. s.t तून खाली उतरल्यावर वारदोली-ठाकूरवाडी
अशा नावाची पाटी वाचली . अन समोर असणार्या डांबरी वाटेने पुढे जावू लागलो.
पावसामुळे सर्व काही हिरवागार झाल होत. मन अगदी प्रसन्न झाल त्या
हरित अशा वातावरणाने....मस्त शुभ्र धवल ते धोधो वाहणारे धबेधबे पाहून मन हरवून जात
होत. ... आम्ही पुढे पुढे जात होतो त्या वाटेने. वाट पुढे एका धबधब्याजवळ जात होती
,एका माणसाने आम्हा स सांगितले ...मग तसाच पुन्हा माघारी फिरलो ..अन दुसर्या
डांबरी वाटेने पुढे जावू लागलो. जाता येता काही माणसे दिसत होती, रस्त्यावर
त्यांना विचारल कलावंतीण ला कस जायचं...त्यानाही काही व्यवस्थित सांगता नाही आल.
आम्ही पुढे पुढे जाताच होतो . वाट काही सापडत न्हवती. एक तास आमचा असाच वाया गेला.
कुणीतरी आम्हास सांगितल. कि जिथे तुम्ही उतरलात त्या गावातून मागच्या रस्त्यावरून
गडाकडे जाणारी सरळ वाट आहे. आम्ही त्याच गावात पुन्हा १ तासाने परतलो. एक तास वाया
गेल्यानंतर आमचा खरा प्रवास सुरु झाला कलावंतीणला जायचा. गावाच्या त्या मागच्या
रस्त्याने जाताना एक SPA REsort लागतो ..त्याच्या बरोबर समोरून एक वाट आहे ती
सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवते.
रस्त्याने मस्त रमत गमत - सुंदर धो धो वाहणार पांढरे शुभ्र धबधबे
पाहत. हिरवळीने नटलेल्या त्या डोंगर दरयांकडे पाहत आम्ही पुढे जात होतो.
गावातून जाणारी वाट हि जरा घसरणीचीच आहे. बारीक बारीक - मोठे मोठे असे दगडी..चिखल....त्यात पावसामुळे वाढलेले गवत... ह्यामुळे जरा जपूनच जावे लागते...
असा हा पावसाळी एक दिवशीय ट्रेक कलावंतीण सुळका
आमच्या हमेशा स्मरणात राहील !!
|
Add caption |