मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

  किल्ले लोहगड दुर्गभ्रमंती | संकेत य पाटेकर

इथल्या सर्व जीवसृष्टीची तृष्णा भागवत पावसाने निरोप घेतला होता. हिरवाईचा प्रसन्नमय रंग लेवून सृष्टी हि कशी आनंदानं बहरली होती. वारा उनाड मस्तीत धुंदीत तल्लीन होतं जणू गुणगुणत होता. त्याचा प्रेमळ मायेभरल्या स्पर्शाने घामजलेलं हे शरीर सुखाने दौड करत होतं. पावलं हि आनंदाच्या ठेका धरत खिंडीतून लोहगडाच्या दिशेने आगेकूच करत होती. तन मन कसं सह्यद्रीमय झालं होतं. मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला त्याच्या लोहासारख्या मजबूत अंगामुळे, म्हणजेच त्याच्या मजबूत बांधणीमुळे , महत्वामुळे, त्याच्या ऐतिहासिक आणि एकूणच भौगोलिक स्थितीमुळे कायमच लक्षात राहतो. - संकेत य. पाटेकर --------------------------------------------------------------------------------------- कसे जाल ? मुबईपासून लोणावळा थांबणारी कुठलीही मेल एक्क्सप्रेस पकडावी. ( इंद्रायणी आहे इंटरसिटी आहे . ) लोणावळा स्टेशनला उतरून ...लोणावळा पुणे हि लोकल पकडावी. तिसरा चौथा स्टॉप मळवली स्टेशन आहे . मळवली स्टेशपासून पंधरा ते वीस एक मिनिटात भाजे लेण्याजवळ आपण पोहचतो. तेथून दिड दोन तासाची पायपीट करत खिंड गाठत गडावर पोहोचता येते. किंवा स्वतःचे वाहन असल्यास थेट गाडी पायथ्याशी नेता येते. ( तीव्र वळ्णावळणाची चढण आहे. हे कृपया ध्यानी घ्यावे. ) २५ /- रुपये प्रवेश फी आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वा सहा दरम्यान किल्ला पाहता येतो. नम्र विनंती : गडाचे पावित्र कायम राहील ह्याचे कृपया ध्यान असू द्यावे. डोळसपणे किल्ले भ्रमंती व्हावी