कधी कधी
अनपेक्षितपणाच्या सौम्य सुखद
क्षणांनी हि
मनात चैतन्याचा
निर्मळ झरा
खळखळून वाहू
लागतो. मुक्त
कंठा निशी
तन-मनं अगदी
सुखाने नाचू
बागडू लागतं, गाऊ
लागतं.
अश्याच काहीश्या
स्थितीत असता
खांदेरीला जाण्यचा
सुयोग जुळून
आला.
आदल्या दिवशी
झालेली मित्रांची
गाठ भेट
त्यात अनपेक्षितपणाचा
एका जिवलगचा कॉल , अन
झालेला संवाद ह्याने
आनंदाला आधीच
उधाण भरले
होते .
त्या उधाणलेल्या
आनंद सागरातूनच
, आसुसलेल्या भेट
ओढीने , नवं
चैतन्याचे वल्हे मारत
पहाटे खांदेरी
साठी प्रयाण
केले.
दहा जणांची
आमची मुंबईतली भटकी
टोळी एकत्र
जमली.
त्यात आमच्या
छोट्या राणी
साहेबा , म्हणजे आमची
पुतणी साहेबा अष्टमी
पहिल्यांदाच
माझ्या सोबत किल्ले
भटकंतीसाठी बाहेर
पडली.
किल्ले भटकंतीची
ओढ अन निसर्गाची
रंगत संगत
आताच इथपासूनच लागावी
ह्यासाठी तिला मुद्दाम
घेऊन आलो
होतो.
मनात हि केंव्हापासून
तशी इच्छा
होती..आपलं
हे शिववैभव
खांदेरी उंदेरी
एकदा तरी
पाहुन घ्यावं.
त्याचा योग
आता जुळून
आला होता
.
कला , गीतू,
स्नेहल , पनू
, सारिका
,नम्रता, अष्टमी
, सुशांत
, स्वरूप अन
मी अशी
दहा जणांची
आमची टोळकी , गेट
वे वरून
सकाळी ठीक
पाऊणे नऊ
वाजता फेरी
बोटीने मांडावा
साठी रवाना
झाली .
अलिबाग म्हणावं
तर ते
माझं आवडतं
ठिकाण .
अथांग पसरलेला
अन नेहमीच उथळलेला हा दर्या
सागर , त्यावर
आच्छादलेलं निळाईचं छतं
, उनाड मोजका वारा,
त्यावर हिंदकळनारी
लहरी लाट
, सागरी पक्षांचा
मागोवा , मोठाली
जहाजं हे सारं
नजरेस सामावत
आम्ही पुढे
जात होतो
.
पुढे काही
वेळातच मांडावा
बेट गाठलं
.
मांडावा बेटापासून
थेट पुढे थळ गावापर्यंत.. नारळी
पोफळीच्या बागांची
गर्द सावली,
तना मनावर
आरूढ होऊन
सुखद स्पर्श
करून जात होती.
इथली बोली
कानावर पडत
होती . इथली
माणसं हृदयाशी
जुळत होती.
नेत्र सुद्ख
आनंद तना
मनात रुंजी
घालत फिरक्या घेत
होता .
सागरी किनार्याची
गाज आता दूरवरून हि
ऐकू येत
होती .
थळ गावापासून
अगदीच काही अंतरावर
आता खांदेरी उंदेरी
खुणावत होते .
नजर दूर
कोणा कोनात पसरत
होती. इतिहासाचा
मागोवा घेत
...
मुंबईच्या इंग्रजांवर
वचक बसविण्यासाठी
शिवाजी महाराजांनी
मुंबईपासून १५
मैलावर असणार्या
‘खांदेरी’ बेटावर
किल्ला बांधण्याचे
इ.स.१६७२ मध्ये
ठरविले. त्याप्रमाणे
किल्ल्याची तटबंदी
बांधण्यास सुरुवात
झाल्यावर इंग्रज
व सिद्दी
अस्वस्थ झाले.
त्यांनी किल्ल्याला
वेढा घालण्याचा
प्रयत्न केला.
त्यामुळे शिवरायांनी
तात्पुरती माघार
घेतली व
किल्ला बांधण्याचे
काम थांबविले.
इ.स
१६७९ मायनाक
भंडारी यांच्या
नेतृत्वाखाली निवडक
१५० माणसे
देऊन ऐन
पावसाळयात खांदेरी
दूर्गाच्या बांधकामास
पुन्हा सुरुवात
करण्यात आली.
यामुळे अस्वस्थ
झालेल्या इंग्रजांनी
किल्ल्याचे बांधकाम
थांबविण्याचा प्रयत्न
केला, पण
किल्ल्यावरुन मायनाक
भंडारी व
किनार्यावरुन (थळच्या
खुबलढा किल्ल्यावरुन)
दौलतखान यांनी
इंग्रजांना प्रतिकार
करुन किल्ल्याला
रसद पुरवठा
चालू ठेवला.
या कामी
महाराजांच्या आरमारात
असलेल्या उथळ
तळाच्या छोटया
होडयांनी महत्वाची
भूमिका निभावली.
ओहोटीच्या वेळी
उथळ पाण्यातून
या बोटींच्या
हालचाली चालू
असताना इंग्रजांच्या
खोल तळ
असलेल्या बोटी
समुद्रात खोल
पाण्यात अडकून
पडल्यामुळे इंग्रजांना
हात चोळत
बसावे लागले.
शेवटी इंग्रजांनी
१६८० मध्ये
शिवाजी महाराजांशी
तह केला.
पुढे ८
मार्च, १७०१
रोजी सिद्दी
याकूत खानने
‘खांदेरी’ वर
हल्ला केला,
पण मराठयांनी
तो परतावून
लावला. १७१८
मध्ये इंग्रजांनी
मोठा तोफखाना
युध्द नौकांवर
ठेवून किल्ल्यावर
हल्ला केला,
पण किल्लेदार
माणकोजी सूर्यवंशी
याने किल्ला
५०० माणसांनीशी
महिनाभर लढवला.
त्यामुळे इंग्रजांना
हात हलवित
परत जावे
लागले. पुढे
१८१४ मध्ये
खांदेरी पेशव्यांच्या
ताब्यात गेला.
१८१७ मध्ये
त्याचा ताबा
परत आंग्रेकडे
गेला. १८१८
मध्ये ‘खांदेरी’
किल्ला इंग्रजांच्या
ताब्यात गेला.
|
असा हा
खांदेरी, शिवरायांच्या पद
स्पर्शाने पावन
झालेला अन खुद्द
शिवरायांच्या देखरेखेखाली
उभारलेला किल्ला आज कळकळीची
आरोळी देत, अश्रू
ढाळत उभा
आहे .
'या रे
माझ्या लेकरांनो
या ,या
कुणी तरी
या ....माझी
हि दुरावस्ता मलाच
बघवत नाही
. असे जणू
म्हणत...
शत्रूवर वचक
बसविण्यासाठी बांधून
घेतलेले खांदेरी
उंदेरी हे किल्ले आज सागरी
लाटेशी ,
इथल्या नैसर्गिक
आपत्तीशी इतकं
वर्ष, संघर्ष
करत अजूनही दिमाखाने उभे
आहेत.
पण आपल्या
लोकांना त्याचा
ना अभिमान
ना कसली
चिंता . साधी
लाज हि
नाही .
तिथे गेल्यावर
त्याची ती
दुरावस्ता पाहून
कळून आल.
जागो जागी
स्वतःचं नाव
कोरून रंगरंगोटी केलेली
तटबंदी.
दारू पार्ट्या
करून धिंगाणा
घालणारे लोकं ..एकेकाळी
शत्रूला धडकी
भरवनाऱ्या अभिमान असलेल्या
तोफांवर वर
उभे राहून
सेल्फी काढणारे महाभाग पाहून
खरंच मन
कळवलं .
ज्या रयतेसाठी
ज्यांनी जीवाची
होळी केली
. किल्ले लढविले
, जिंकले, घडविले , स्वराज्य
निर्माण केले
.
त्या वास्तूची
, त्या प्रेरित
इतिहासाची , गड
किल्ल्यांची
ना तमा ना फिकीर
,
ना कसला
अभिमान, अभिमान
असला तरी
तो नावापुरता ...
' जय भवानी जय
शिवाजी ' बस्स..झालं संपल . आज त्याची अशी अवस्था
पाहून मनाचे
रंगच पालटले
.
एकटी दुकटी
एखाद मुलगी
सुद्धा इथे
आली तर
ती शरमेने
मान खाली
घालेल .
कारण इथल्या,
इथे येणाऱ्या
काही मानवी नजरा हि
वासनेने तुडूंब
भरल्या आहेत.
च्यायला , इथे कुणला मारून
टाकून फेकून
दिलं तरी
कळणार नाही
रे ?
असंच एक
वाक्य कानाशी धडाडलं , मागे
वळून पाहिलं
तर एक
उनाड टोळकी
तटबंदी वरून फिरकत होती
.
त्याकडे दुर्लक्ष
करत ..आम्ही
दीप गृहाच्या
पुढे असलेल्या दरवाजातून
आता शिरलो.
फेसाळणार्या सागरी
लाटा दगडांच्या
राशींची खेळी
करत होत्या
.
एखाद्या नव्या
जोडपाने सागरी
किनारी येउन
एकमेकांवर पाण्याच्या
शिडकावा करावा
तसंच काहीस
ते भासत
होत. तर
असो..
सभोवताली पसरलेल्या
दगडांच्या राशींच अन
एकावर एक
अश्या रचलेल्या
तटबंदीतल्या त्या
चीरांचं ते शिवरायांच
दुर्गविज्ञान , प्र.
के. घाणेकरांच्या
पुस्तकातून आधीच डोक्यात
उतरलं होतं
.
ते आता
प्रत्यक्ष पाहत
होतो .
कित्येक साल
त्या दगडांच्या
राशी ह्या
उधाणलेल्या सागरी
लहरींना थोपवून आहेत.
अजूनही तुम्ही
खंबीर असा,
'तटबंदी -बुरुजहो हो' आम्ही
आहोत तोवर
..अस जणू
गर्वाने अभिमानाने
सांगत.
आम्ही कित्येक
वेळ त्या
राशींवर अन
फेसाळणार्या लाटेशी
रममाण झालो
होतो .
इथून निघूच
नये असंच
वाटत होतं
. पण वेळे
अभावी चालते
झालो .
भव्य सागरी
डोहात इवल्याश्या
वाटणाऱ्या होडक्यातून सागराचे
अनाहूतं रूपं पाहत आम्ही
खांदेरी गाठले
. तिथून धक्क्या
पासून पुढे हनुमान
मंदिर अन
दीप गृहाशी
पुढे सरकत
दरवाज्यापाशी
आलो. येथून ह्या
सागराचे विशाल
रूपं , सागरी लाटेचे
तांडव , दगडांच्या
राशी , तटबंदी
बुरुज न्हाहाळत होतो.
पण वेळेला
थांबण माहित
नसतं . त्यामुळे आम्ही हि
एक एक
करत पुढे सरसावलो
.
आता शेवटी
मी अन नम्रता
काय ते
उरलो होतो.
तेवढ्यात तिघा चौघांचा
एक टोळकं जाण्याच्या
रस्त्याला अडून बसलं.
फोटोग्राफी करत...
त्यातल्या एकाचं
आमच्याकडे लक्ष
गेलं . अन त्याने
उगाच डीवंचावं
म्हणून विचारलं,
आमच्याकडून काही
त्रास नाही
ना ? मी हास्यची एक
रेघाटी चेहऱ्या वरून
फिरकावली. .
अन पुढे
झालो तीला सोबत
करून ..म्ह्टल..
शिवरायांच्या ह्या भूमीत अन खुद्द त्यांच्या ह्या किल्ल्यात आपण आहोत ,तिथे कसली आलेय डर नि तमा ,प्रसंगी दोन हात करण्याची निधडी छाती हि ह्या गड किल्ल्याच्या प्रेरणादायी इतिहासातून मिळवलेय राव...
शिवरायांच्या ह्या भूमीत अन खुद्द त्यांच्या ह्या किल्ल्यात आपण आहोत ,तिथे कसली आलेय डर नि तमा ,प्रसंगी दोन हात करण्याची निधडी छाती हि ह्या गड किल्ल्याच्या प्रेरणादायी इतिहासातून मिळवलेय राव...
त्या दरवाज्यातून
बाहेर पडलो
. तटबंदी वरून
चालत चालत
पुढे निघालो
.
अथांग पसरलेला
हा दर्या
सागर कधी खवळलेला , कधी
शांत , तर कधी
गूढ भासत
होता.
तसा तो
नेहमीच भासतो
.
तरीही दर्या सागरचं हे
अस ना
ना वविध
रूपं मला नेहमीच
आकर्षणाच ठरलंय
.
काय नि काय
रहस्यं , गुपित
दडलेत असतील
ह्याच्या पोटी , कुणासं ठाव
? कधी कुणाला
त्याचा थांगपत्ता लागेल का
? लावता येईल
का ? प्रश्नच प्रश्न...कधी हि
न उलगडलेले
..
मला
तर हे
एक कोडचं वाटतं ...न
सुटणार
तरीही त्याचं विशालं रूप
मात्र मनास भावतं
. कित्येक गोष्टी
तो सहज
सामावून घेतो
... त्याच
बडेजाव न
करता ..
कधी कधी आपल्या
मनाशी हि
मी ....त्याच
साधर्म्य जुळवू पाहतो
.
आपलं मनं हि असंच एक कोडं आहे . विशाल सागरासारखं...
आपलं मनं हि असंच एक कोडं आहे . विशाल सागरासारखं...
त्यात नित्य
नेहमी काय
कोणती ढवळा ढवळ होत
असेल ते आपणच
जाणतो . समोरच्याला ते
कधी कळून
येत नाही
. जीवनाचे
असे एक
एक धडे
निसर्गाशी अस
एकरूप झाल्यास
सहजच मिळतात
. त्यातून
आपण घडत
जातो. तर असो,
तटबंदी वरून जात असता आम्ही
एका बुरुजा
जवळ थांबलो
. तिथे एक तोफ
आपल्या मातीशी
इमाने राखत
निवांत पहुडली होती. सागरी
शत्रूचा जणू
अद्यापही कानोसा घेत
..
त्याची छानशी
माहिती , तोंड
ओळख गीतू आमच्या लहानग्या
अश्तू ला
देत होती.
येथूनच पुढे दुसरा
एक 'बुरुज' नजर
टप्यात येत
होता. तिथेच
काहीशी नजर खिळून राहिली.
एकटक झाली. मनाचे
वारे वेगाने
दौडू लागले.
काही महाभाग
,धडाडनाऱ्या त्या तोफेवर
चढून सेल्फी
काढत मग्न
होते.
ते पाहून
थंडावलेलं रक्त क्षणात खवळलं . अन
त्या रोकने
पाउले निघू
लागली.
तिथवर पोहचलो
तेंव्हा त्यांचे
ते कारनामे अजूनही
सुरूच होते
.
'फोटो साठी
कायपण ' , कुठे
पण ,'साला
जरा पण
अभिमान नाही ह्यांना,
ह्यांच्या तोंडी
नुसताच जयघोष.. जय भवानी जय
शिवाजी... बस्स' ते
तरी कशाला
घ्यावं म्हणतोय
.
वाटलं थोडा
तरी शहाणपणानं
वागतील . पण कसलं
काय, जरा नजर
इकडून तिकडे
वळली.
तोच ह्याची
सेल्फी गिरी
पुन्हा सुरु ..ते पाहून
मन पुन्हा
धारेवर आलं.
त्यांना पुन्हा
एकवेळ समज दिली..तेंव्हा ते
निघून गेले.
पण मनात
कालवाकालव करून..
ह्या
तोफा - तटबंदी
बुरूजं आज
मूकपणे हे
सगळं सहन करत आहेत,
'आमचं दुर्दैव रे अजून काय' अस म्हणत ...
'आमचं दुर्दैव रे अजून काय' अस म्हणत ...
तर असो
इतिहासाची सोनेरी पाने
उलगडत आम्ही
वेतोबा मंदिरा
जवळ आलो.
धक्याच्या बाजूलाच
असलेले हे
मंदिर , त्यातली त्रिकोणी
आकाराची शेंदूरचर्चित
शिळा म्हणजेच
वेताळ .
हे गावकर्यांच श्रद्धास्थान . त्यामुळे एखादा
नवस बोललं
अथवा नवी
होडी - गलबत
घेतली कि दर्शनासाठी गावकरयाचं इथवर
येण जाणं होतंच
असत . मग त्यात
एखादा बकरा वगैरे
बळी हि
दिला जातो
आजही येथे
असंख्यांनी गावकरी
हजर होते
.मंदिरात कसला
तरी कार्यक्रम चालू
होता .
आरडा ओरड
, किंकाळन सुरु होत. . त्याअर्थी
एखाद्याच्या अंगात
आल्यावर मंत्र
तंत्र सुरु
असतात असंच
काहीस सुरु
असावं असा
तर्क करत
जरास आत
डोकावतं अन कानोसा
घेत मी
बाहेर पडलो
.
मंदिरा शेजारीच
काही पाउलं पुढे
टाकत मोठ
मोठ्या दगडी
शिला पहुडल्या
आहेत . तिथे
जेवणाचा वगैरे
कार्यक्रम सुरु
होता. जंगी पार्ट्याच होत्या
त्या ..
दारू मटनावर
कुणी ताव मारत
होते . कुणी पेंगत
होते तर कुणी
डी जे
च्या तालावर मोठ्या
आवाजात दारूच्या बॉटल्स हाताशी
घेत नाच
गात होते
.
अस हे बेसूर
चित्र पाहनं अन
ते देखील
आपल्या स्वराज्यातील
अभिमानी किल्ल्यावर ,
'खांदेरीचं सौंदर्य राखूया
,
स्वच्छता राखूया'
अशा अर्थी
फलक मोठ्या
अभिमानानं लावलेला दिसला
. ज्याने लावला
त्याने खरच
चांगल्या हेतूनेच
लावला असेल
. पण येथे
येणाऱ्याच त्याकडे
साफ दुर्लक्ष..
खाउन फेकून
दिलेल्या पत्रावळ्या, ग्लास
वगैरे सर्वत्र पसरलेल्या दिसल्या.
जागो जागी
दगडांच्या राशीवर
अन खुद्द
मंदिराच्या भिंतीवर
हि कुणी
कुणी आपली
नावे रेघाट्लेली दिसली
. इतकी स्वतःच्या
नावाबद्दल ...प्रेम अन
अभिमान ...पण
किल्ल्याबद्दल
काहीच नाही..
काय बोलावं
अन कुणास
बोलावं...आम्ही
पुढे निघालो
. किल्ला जवळ
जवळ आता
पाहण्यात आला
होता . अजूनही
एक गोष्ट
मात्र आमच्यापासून
जणू आंधळी
कोशिंबीर चा
खेळ खेळत
होती. ती
एकमेव गोष्ट
म्हणजे 'जादुई
दगडी शिळा ' .
जिचा आम्ही
इथवर आल्यापासून शोध
घेत होतो.
पण कुठे
ते नक्की
कळेना .
धक्क्याला लागुनच
समोर खांदेरीचा
आराखडा रेघाटला आहे
. त्यावर एकवार नजर
डोकावली तेंव्हा
ते दर्ग्याच्या
आसपासच आहे
ते कळून आलं . मग
पाउलं हि पटपट
पुढे निघाली
.
समोरच दीपगृह
आपल्या ऐटदार
शैलिनीशी खुणावत होता.
आम्ही त्याच
दिशेने पाउलं टाकू
लगालो .
१८६७ मध्ये,
२५ मीटर
उंचीच हे
षटकोनी दीपगृह बांधण्यात आलं.
सध्या ते
मुंबई पोर्ट
ट्रस्ट च्या
अखत्यारीत आहे.
अन सरखेल
कान्होजी आंग्रे ह्यांच्या नावाने
ते आता
रूढ झालं
आहे. महाराजांच्या
निधना नंतर
मराठी आरमाराचे
सामर्थ्य वृद्धिगंत
करणारे सरखेल कान्होजी
आंग्रे,
आरमार प्रमुख
, परकीय आरमारी
सत्तांना जेरीस
आणून सोडणारे
, आपली दहशत
वठविणारे,
त्यांना मनोमन
मुजरा करत
पुढे सरसावलो
.
उन्हाची थोडी
बहोत झळ
आता अंगावर
येत होती
. सूर्य नारायण
हि डोक्यावर तळपू
लागले होते.
एक एक
पाऊलं टाकत आम्ही
. गर्द
छायेच्या भल्या
मोठ्या वृक्षा
खाली विसावलो
.
तो दिसला
अन मनातला
शीणच निघून गेला
. प्रत्येकाने एक
एक धोंडा हाती
घेत त्यावर
आघात करायला सुरवात
केली . आणि त्यातून
खरच 'मेटालिक
साऊण्ड येऊ लागला.
आघातातून हास्य
फुले उमळू लागली . मनातली
ती जादुई आस
पूर्ण झाली
.
आता पुढ
चं पाऊलं दीप गृहाकडे
वळल.
ते पाहण्यास
पूर्व परवानगी
लागते . हे इथे
मुद्दाम नमूद
करू इच्छितो
.
आमचं भाग्य
अस कि
आमच्या सोबत
असनार्या कलागुणी मैत्रिणी
च्या भावोजींची
ओळख होती.
त्यामुळे ते सारं
जवळून पाहण्याची
आयती संधीच
चालून आली . अन
नुसतंच पाहणं न्हवे तर त्याची
कार्यप्रणाली हि
समजून घेता
आली.
त्यासाठी त्या
काकांना मनोमन
धन्यवाद , ज्यांनी
आमच्यासाठी तसदी घेतली
. अन अगदी
खुल्या मनानं
माहिती दिली
.
दीप गृह
हावरून समुद्राचं
अचाट रूपं अन
नयनरम्य परिसर नजरेस पडतं.
गलबत नौका
सागरी लाटांवर
तरंगताना दिसतात
.
आम्ही ते
सगळं पाहून जाणून
अंतर्मुख होवून
बाहेर पडलो
.
हा परिसर
ऐकूनच हवेशीर
आहे . खेळती हवा,
गर्द दांट सावलींची
झाडं, मोकळा आवारं, अथांग समुद्र
, वार्याच्या
झोतावर फिरकनारी पवनचक्की
, मनाला
सुखद अनुभव
देणारे हे क्षण
..आम्हाला जागचे हलू
देत न्हवते
. काही क्षण
आम्ही तिथेच
निवांत विसावलो .
पुढे गीतू
ने उंबराच्या
झाडाशी शिवरायांची
अन शंभू
राज्यांची प्रतिमा
ठेवून
शिवरायांची आरती
म्हणवून घेतली
. अन सिंह
गर्जनेसह ललकारी देत
परिसर दणाणून
सोडला .
खांदेरी ची
दुर्गभेट परिक्रमा आता
आमची पूर्ण
झाली होती.
.
तेवढ्यात तिथलेच शिर्के नावाचे
गृहस्त अन
त्यांची टीम
नि आमच्यात , खास करून
गीतू , ह्यांच्यात
इतिहासाच्या ह्या
अमुल्य ठेव्या
बद्दल , होत
असलेल्या अनास्थाबाद्द्ल
चर्चा रंगली
.
रोजच्या होणार्या
दारूच्या पार्ट्या
, रेघाटलेली नावं , केरकचरा
ह्याबद्दल खंर
तर जनजागृती झाली
पाहिजे . गावातल्या
लोकांत तरी
...
दुपारी २
च्या आसपास
त्या दीप
गृहातील कर्मचाऱ्यांचा
निरोप घेत आम्ही
पुन्हा थळ साठी
रवाना झालो.
सागराचं ते विशाल
रूपं पुन्हा अनुभवत
.
त्याच्या डोईवरी
हेलकावे घेत..
तरंगत्या होडक्यातून
..फेसाळल्या लाटांचा शिडकावा अंगावर
घेत .. खांदेरी
उंदेरीला मनोमन मुजरा
करत ..
संध्याकाळी ५
वाजेपर्यंत तरी
आम्ही नारली
पोफळींच्या बागेत
, थळ गावी, कलाच्या गावी
निवांतपणे पणे हिंडकत
होतो.
वरण भात
भाजी, भाकरी
, पापड
लोणचं, फ्राय
केलेली मच्छी,
भुर्जी ह्या घरी
बनवलेल्या लज्जत
, चवदार पदार्थांवर ताव
मारत जो
तो अगदी
भरघोस जेवून ,तृप्त होवून
निवांत पहुडलेला
.
कुणी बागेत
चक्कर मारत
होतं. कुणी
गप्पांत रंगलेलं
, कुणी शांत
झोप घेत
होत .
जवळ जवळ
दीड एक तास
आम्ही ब्रेक
घेतला . अन
तेथून सार्यांचा
निरोप घेत
पुढे निघालो.
सांजवेळी मांडावात
पोचलो . तेंव्हा
सूर्य नारायणाची लाल
तांबूस किरणे
क्षितिजाशी पसरली
होती .
तो हळु
हळु ह्या
अथांग सागरात विलीन
होण्यास आसुलेला
जणू ..
त्याच ते
रूपं अन
किनाऱ्याशी गाज
मनाला पुन्हा
पुन्हा ह्या भवसागरात
ढकलून देत
होती .
सूर्योदय अन सूर्यास्त हे माझे आवडीचे क्षण , ते क्षण न्हाहाळत बसण हा माझ एक आवडता कार्यक्रम.
सूर्योदय अन सूर्यास्त हे माझे आवडीचे क्षण , ते क्षण न्हाहाळत बसण हा माझ एक आवडता कार्यक्रम.
असे क्षण
मी सहसा
सोडत नाही. तो
एक आगळा
वेगळा अनुभव
असतो.
कळत्या सूर्यनारायनाला
निरोप देत , रात्री
अधिक गूढ
भासणार्या सागराशी
कानगोष्टी करत
आम्ही फेरी
बोटीने आम्ही
पुन्हा गेटवे
ला पोचलो.
तेंव्हा कुणा
एकाला दिलेल्या
शब्दाची आठवण
झाली . ती आधी
पासूनच होती
म्हणा ..त्यासाठी
पाउलं झपझप दौडू
लागली. दीर्घ कालवधी नंतर
होणारी एखादी भेट
..मनाला वेळेच्या
हि पुढे
घेऊन जाते
. ..
अशीच एक
आसुलेली हि
भेट ..माझ्या
मनाला दौडू
लागली ...तुगडूक ..तुगडूक ..तुगडूक
आपलाच
,
- संकेत य पाटेकर
०४.०४.२०१५
इतिहास संदर्भ - ट्रेक क्षितीज
जल दुर्गांच्या सहवासात - प्र. के घाणेकर
भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची - पराग लिमये
प्र. ची - 1
गेट वे ते मांडावा ..साठी रवाना
प्र. ची - 2
प्र. ची - 3
प्र. ची - 4
प्र. ची - 5
प्र. ची - 6
रंगाची उधळण
प्र. ची - 7
प्र. ची - 8
लक्ष्मी आईची कृपा..
प्र. ची - 9
वल्हव रे नाखवा .. वल्हव वल्हव..
प्र. ची - 10
खांदेरी - उंदेरी
दिसलेला डॉल्फिन ..
प्र. ची - 12
प्र. ची - 13
प्र. ची - 14
प्र. ची - 15
प्र. ची - 16
प्र. ची - 17
तटबंदी बुरुज ..
प्र. ची - 19
प्र. ची - 20
उन्ह वाऱ्यांनी अन सागरी लाटांनी ढासळत चाललेली तटबंदी ..
प्र. ची - 21
मोठ मोठाल्या दगडी चिरा एकमेकांवर ठेवून रचलेला बुरुज...
प्र. ची - 22
हनुमान मंदिर..
प्र. ची -23
बुद्ध विहार
प्र. ची - 24
दरवाजा..
प्र. ची - 25
तटबंदी बुरुज अन फेसाळणार्या लाटा ..
प्र. ची - 26
प्र. ची - 27
शिवरायांच दुर्ग विज्ञान.... लाटांचा तडाखा बसू नये म्हणून घेतलेली काळजी ..दगडांची रास ..
प्र. ची - 28
प्र. ची - 29
प्र. ची - 30
प्र. ची - 31
प्र. ची - 33
फेसाळ नाऱ्या लाटांना थोपून ठेवणारी दगडांची रास
प्र. ची - 34
अथांग पसरलेला सागर अन निळाई ...चौकटीतून
प्र. ची - 35
एकांत , वपुंच्या शैलीत म्हणायचं तर परिसराच मौन म्हणजे एकांत...तो एकांत साधताना ..
प्र. ची - 36
आमची चिमुकली ..., पुढची पिढी
प्र. ची - 37
दगडांच्या राशी अन बुरुज ..
प्र. ची - 38
तोफा हि सुटल्या नाहीत ...रंगून टाकलंय अगदी नावांनी ..
कधीकाळी धडाड नाऱ्या ह्या तोफा ...आज मूकपणे उभ्या आहेत.
प्र. ची - 39
गीतू अन आमची छोटी...माहितीची देवान घेवाण करताना ..
प्र. ची - 40
खुद्द शिवारायंनी हि त्याचं नाव कुठे लिहून ठेवल नाही . पण आपण कपाळ करंटे ..अजून काय बोलणार .
प्र. ची - 41
वेतोबा मंदिर ...
प्र. ची - 42
पाटी नुसती नावाला...
प्र. ची - 43
प्र. ची - 44
खांदेरी वर येणारे गावकरी ..
चिरया मध्ये रोवलेली तोफ...
प्र. ची - 48
भांड्याचा आवाज येणारा एकमेव जादुई दगड ...
प्र. ची - 49
धडाडनारी तोफ अन रडार ..
प्र. ची - 50
प्र. ची - 51
प्र. ची - 52
प्र. ची - 53
प्र. ची - 54
आमची छोटी ...
प्र. ची - 56
प्र. ची - 57
निवांत पहुडलेल्या नौका..
प्र. ची - 58
प्र. ची - 59
प्र. ची - 60
प्र. ची - 61
सांजवेळ ..
सूर्योदय अन सूर्यास्त हे दोन क्षण माझे आवडते...
परतीची वाट @ मांडवा ..