जवळ
जवळ पाच एक महिन्या नंतर कुठे एखाद किल्ल्याला मी भेट दिली .
प्रति - 4
चर्च..

प्रति - 12

.
खालील बाजूने...

मुख्य दरवाजा ... सध्या येथून येणारी वाट बंद आहे...
प्रति - 14
प्रति - 15..
दरवाजाच्या देवडीत विराजमान झालेले गणेश ...

एकीकडे निळाशार , अथांग बाहू पसरलेला समुद्र ..... त्याच्या संगीत लहरी (गाज )
एकीकडे ..मानवी वस्ती .... इमारती आणि औद्योगीकरण ...
आणि त्याच बरोबर हि ऐतिहासिक वास्तू....
ह्याची एकत्रित सांगड घालायची. आणि पुढच्या प्रवासाला निघायचं.
महीपत
- सुमार आणि रसाळगड नंतर ( वृत्तांत अजून तसा लिहायचा बाकी आहे ...लवकरच ते हि पूर्ण करेन )हि अचानक ठरलेली आमची ह्या वर्षीची दुसरी मोहीम महाराष्ट्र दिनाच्या शुभ
मुहूर्तावर ...आखलेली .
तशी
हि आमची धावती भेट ठरली .... पण परिपूर्ण अशी .
संध्याकाळी
साडे पाचच्या सुमारास , सुर्य मावळतिला झुकत असता अक्खा उरण परिसर (अगदी न्हावा शेवा ) पिंजून झाल्यावर आम्ही ह्या किल्ल्याला
भेट दिली म्हणजे डोंगर चढणीला सुरवात केली.
किल्ले
द्रोणागिरी...
उरण
जवळचा करंजा बेटा वरील हा किल्ला .
पाहण्या सारखा , निसर्गरम्य अगदी .. एक दिवसात होईल असा ..
पावसाळ्यात येथे वेगळीच चमक असेल ह्यात वाद नाही. वर्दळ तशी नाहीच. Restricted Area असल्या कारणाने बहुदा तस असावं. कारण ONGC PLANT बाजूला असल्याने दिवस रात्र इथे पोलिस पहारे असतात . त्यांच्याकडून परवानगी घ्यायची आणि थेट किल्ला पाहून यायचं.
किल्ल्याचा आवाका तसा फार मोठा नाही . त्यामुळे १ तासात किल्ला पाहून होतो. उर्वरित वेळ , तुमच्याजवळ स्वतःच वाहन असेल तर आसपासची ठिकाणे पाहू शकता.

द्रोणागिरी मंदिर , करंजा टोक ....JNPT तल्या जुन्या 'शेवा' गावाला भेट वगैरे ..वगैरे ..
किल्ल्याचा इतिहास :
सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापूरी या राजधानी पासून जवळ असणार्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे.
द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.
( ईतिहास संदर्भ - ट्रेकक्षितीज )

उरण एसटी स्थानकाच्या अगदी समोर असणार्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत
गेल्यास ....आपण इथवर येउन पोहोचतो . येथून किल्ल्याला जाणारी वाट आहे.
प्रति 1
प्रति 1
साधारण वीस एक मिनटाची पायवाट
चढत आपण किल्ल्याच्या बुरुजाशी येऊन पोहोचतो. तिथून काही पाउल पुढे चढून गेल्यास ...उजव्या
हाताला पहारे चौकी लागते...पुढे ..हा प्रवेश द्वार
...तिथून आत शिरायचं.
प्रति - 2
समोरच हि वास्तू ( चर्च )
नजरेस दिसते .....
प्रति - 3
प्रति - 5
चर्च..
प्रति - 6
चर्च.. आतील भाग..
प्रति - 7
ऐतिहासिक वास्तूवर व तटबंदी वर स्वतःची नाव कोरणारी महाभाग
कमी नाही आहेत आपल्याकडे..
त्याच अजून एक उदाहरण ..प्रति - 8
प्रति - 09...
प्रति - 10...
एक वेगळी रचना असलेली पाण्याची टाकी ... " गागौणी व गिजोणी
"
प्रति - 9
प्रति - 10
प्रति - 11
उरण परिसर ..देखावा ..

.
बुरुज....
ह्या बुराजापासून पुढे ....खाली चालत गेल्यास .......मुख्य दरवाजा
लागतो .
सध्या त्याची बरीच पडझड झाली आहे.
प्रति - 13
बुरुज....
प्रति - 13
मुख्य दरवाजा कडे जाणारी वाट ...
प्रति - 14...
मुख्य दरवाजा ... सध्या येथून येणारी वाट बंद आहे...
प्रति - 14
प्रति - 15..

प्रति - 16...
दरवाजाच्या देवडीत विराजमान झालेले गणेश ...
प्रति - 17

एकीकडे निळाशार , अथांग बाहू पसरलेला समुद्र ..... त्याच्या संगीत लहरी (गाज )
एकीकडे ..मानवी वस्ती .... इमारती आणि औद्योगीकरण ...
आणि त्याच बरोबर हि ऐतिहासिक वास्तू....
ह्याची एकत्रित सांगड घालायची. आणि पुढच्या प्रवासाला निघायचं.
धन्यवाद ..!
संकेत पाटेकर
२२.०५.२०१६.
महत्वाची
टीप : - द्रोणागिरी नावाचा कुठलासा किल्ला आपल्या येथे अस्तित्वात आहे.
हेच
तिथल्या लोकांना माहित नाही. त्यामुळे उगाच भटकायला होतं . (म्हणायला इतर नव्या गोष्टी हि पहायला मिळतात त्यामुळे ..पण ती गोष्ट निराळी .. आपला गणिती सांगड घातलेला वेळ कुठेसा चुकतो एवढंच .. )
तर...
उरण
एसटी डेपोच्या अगदी समोरच एक निमुळता रस्ता आहे . जो द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी
जातो. वाटल्यास उरण डेपोच्या चौकात विचारपूस केल्यास कुणी एक नक्कीच तुम्हाला सांगेल
.
पण त्यापुढे निघालात
...तर अपवादानेच एखादा भेटायचा.