सोमवार, १८ जून, २०१२

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

पाउस - जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही ...जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो ..आणि मग शब्दांचा भडीमार आपल्यावर ओढावून घेतो बहुदा त्याला दुसर्याचा राग ओढावून घेणे आवडत असाव. ...
असो प्रबळ गडास जाण्याच मुहूर्त जानेवारी पासून शोधत होतो. पण मुहूर्तच सापडेना .
 जेंव्हा जेंव्हा ठरवायचो तेंव्हा तेंव्हा काही ना काही अडचण येत असे.
















पण ह्या वेळेस मात्र मुहूर्त सापडला . आणि प्रबळगड सर सुद्धा केला . पण पाऊसाने नको त्यावेळी येऊन आमची फार निराशा केली .
गडावर फक्त पावसाच थैमान,घनदाट रान, ती शांतता , त्यात आम्ही फक्त तिघे , मधेच माणसाने शिटी वाजवी तश्या आवाजात ओरडणार्या त्या पक्षाचे सुंदर आवाज , एक वेगळाच आनंदीय क्षण

समोरचं परिसर काळ्या पांढर्या ढगांनी व्यापून गेला होता. समोरच दृश्यच दिसत न्हवत . फक्त काळ्या पांढर्या रंगाचे थर आणि झोंबणारा थंडगार वारा आणि सोबत पाउस

आमची सुरवात मात्र दमदार झाली......
पहाटे लवकर ठाण्याहून पहिल्या वाशी ट्रेन ने आम्ही निघालो. पनवेल एस टी डेपो तून सकाळी ७ वाजता सुटणारी ठाकूरवाडी एस टी ने जायचं होत. (ठाकूरवाडी हे गडाच्या पायथ्याच गाव, त्यापुढे हि प्रबळ माची म्हणून गाव आहे.) .

आम्ही तिघे म्हणजे मी किशोर आणि आमचा बाळू दादा म्हणजेच लक्ष्मण आम्ही ७ च्या अगोदर पाच - दहा मिनिटे पनवेल डेपोत पोहोचलो . नि एसटी ची चौकशी करण्यास चौकशी खिडकी कडे गेलो. तेंव्हा मास्तर कडून कळले कि . ठाकूरवाडी करता जाणारी एस टी तीन दिवस झाले बंद आहे . तीन दिवसापूर्वी एस टी वाहन चालकाला तिथे मारहाण केली त्याबद्दल त्यांनी एस टी बंद केली होती. आम्ही मनात म्हणालो कि ह्याच वेळेस का अस झाल .
आता कसे जाणार ? हा प्रश्न देखील पडला होता ? तेंव्हा मग किशोर म्हणाला आपण शेडुंग फाट्या पर्यंत एस टी ने जावू तिथून मग रिक्षा ने ठाकूरवाडी पर्यंत .
आम्ही वडगाव हि एस टी ने शेडुंग फाट्या पर्यंत पोहोचलो. तिथून रिक्षाने ठाकूरवाडी ....शेडुंग ते ठाकूरवाडी त्या तीन आसनी रिक्षावाल्याने आम्हाकडून ८० रुपये घेतले . अंतर अवघ ८ किलोमीटर होते . पण आम्ही देऊ केले . कारण आमच्या मध्ये तसे भाव कमी जास्त करणं ....कोणाला पटवण जमत नाही जे आहे ते द्यायचं ......ह्या वृत्ती पायी रिक्षा वाल्याने ८० रुपये होतील ...हे सांगितल्यावर काही कमी जास्त न करता सरळ रिक्षात बसलो. नि १५ मिनिटा मध्ये ठाकूरवाडी गावात पोहोचलो.

ह्या पूर्वी म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही इथेच आलो होतो .कलावंतीण चा सुळका सर करण्यास , त्यामुळे प्रबलमाची गावा पर्यंत जाणारी वाट आम्हास माहित होती. आम्ही त्या वाटेने पुढे पुढे सरसू लागलो .

पावसाचे तसे चिन्हे काही दिसत न्हवती . डोंगरांनी मात्र हिरवाईचा पांघरून अंगावर ओढावून घेतला होता, वातावरण पण कस थंडगार होत.हवा खेळती होती , डोंगरातील खळ्या मात्र अजून पांढर्या शुभ्र धवल धबधब्याने खळखळ नारया झरया ने स्पर्शित न्हवती.



पहिल्या पावसातल्या पहिल्या सरीत उगवणारी आणि अवघे १० -१५ दिवस राहणारी शेवला (भाजी )जागोजागी चालताना इथे तिथे दिसत होती .


















प्रबळमाची गावात शिरताच आमच तिथल्या गावकी कुत्र्याने भुंकत भुंकत स्वागत केल.
एक छोटा मुलगा आणि त्याची मोठी बहिण कुठला तर खेळ खेळत होते.
पुढे एक छोटस खोपट होत. त्याच्या जवळ एक फलक लावला होता.
आमच्या इथे जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था केली जाईल . त्या फलकाला माझ्या कॅमेरात बंदिस्त करून आम्ही पुढे निघालो .
आता मात्र पाउस पडण्याची चिन्हे उभी होती . कलावंतीण सुळका आणि प्रबळ गडाला ढगांनी आपल्या पंखात लपवलं होत. त्यात कलावंतीण चा सुळका त्या पंखातून हळूच बाहेर पडत आमच्या कडे जणू डोकावून पाहत होता अस जाणवत होत. मला तेंव्हा राहावल नाही आणि तो क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी कॅमेरा चालू केला आणि क्लिक करायच्या आत कसला तरी आवाज आला नि कॅमेराच्या पडद्यावर मेसेज आला.....''लेन्स एरर ''
ह्या पूर्वी २ वेळा लेन्स बदलून आणली होती ....आता पुन्हा लेन्स प्रोब्लेम ....मन निराश झाल.
कारण माझ्याशिवाय दुसर्या कुणाकडे कॅमेरा न्हाव्ताच.
आणि त्यात ते वातावरण इतक आल्हादायक होत ...........कस सांगू.

कॅमेराच दुख मनात ठेवून पुढे चालत राहिलो . एव्हाना पावसाच आगमन झाल होत . तो आमच्या वर बरसत होता अगदी रिमझिम करत ......,
गावातून जात असता गावाच्या उजवीकडच्या वाटेने आपणास प्रबळ गडाकडे जाता येते .
मळलेली वाट आहे ...तरी सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते ...कारण एकाच वाटेतून १-२ वाटा फुटतात आणि तिथेच आपण फसलो जातो.
आम्ही सुरवातीलाच फसलो नि प्रबळगडाच्या उभ्या सरळ सोट कड्या खाली आलो उभा चढ चढत एका वेगळ्याच अनवट वाटेने...

























तिथून आसपासचा परिसर किती मोहक दिसत होता .त्यात आम्हास पावसाच्या सरीने न्हावू घातले होते . काळ्या कातळावरील ते खेकडू कड्यावरून ओसर्णारे पाणी पिण्यासाठी चिटकून बसले होते.

आम्ही कातळ कड्याच्या कडे कडे ने वाट काढत पुढे सरलो ...काही वेळाने आम्हास नेहमीचीच रुळलेली वाट दिसली जी गडाकडे जाणारी होती .. आम्ही एकदम RIGHT TRACK वर आहोत ह्याचा आनंद झाला. पुढे ती वाट पकडत आम्ही दगड धोंड्यावरून झाडी- झुडपातून पांढर्या ढगातून आणि रिमझिम नारया पावसाच्या सरीतून थंडगार वारा अंगावर घेत पुढे जावू लागलो .

प्रबळगडावर घनदाट रान आहे. उंच उंच दाटी दाटीचे झाडे झुडपे त्यातून ती मळलेली वाट, निरव शांतता , त्या शांततेत अजून तल्लीनता आणणारे , आपल्या गळ्यातून वेग वेगळा आवाज काढणारे पक्षी , पावसाने केलेला काळोख ... तो जो तिथला अनुभव, तो आनंद मनाला स्पर्शून जातो कायमचा.

पुढे एक मळलेली वाट पकडून आम्ही एका सपाट पठाराच्या टोकावर आलो . इथून मला वाटत कलावंतीण चा पूर्ण सुळका दिसत असावा. पावसा मुळे आणि पांढर्या काळ्या थरामुळे आम्हास ते दृश्य दिसू शकले नाही. त्या ढगांनी सारा परिसर आपलासा केला होता.
आम्ही थंडीने कुड कुडत होतो . पावसाने ओलेचिंब झालो होतो. त्यात हा वारा अजून आमची चेष्टा करू पाहत होता . काही वेळ आम्ही तिथे पाउस कमी होईल नि सगळा परिसर स्वच्छ होईल ह्या आशेने तिथे थांबून होतो . पण पावसाचे चिन्ह कमी होत नाही हे पाहून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो .
येताना एका वाटेने आलो म्हणून जाते वेळी जरा दुसर्या वाटेने जायचे ठरविले . त्या वाटेने पुढे जात असता एक पाण्याच टाक लागल.पावसाने ते टाक भरलं होत.


थोड्या वेळाने 'त्याच वाटेने आम्ही आलो तेथून पुन्हा उतरलो . वर येताना झरे वगैरे ह्याच नाव हि कुठेच दिसत न्हवत पण खाली उतारते वेळी जागो जागी छोटे मोठे धब-धबे...
मन आवरेना तेंव्हा त्या झर्याच पाणी अंगा खांद्यावर घेत त्याचा मन मुराद आनंद लुटावयास लागलो. नि पुन्हा नेहमीच्या मळलेल्या वाटेने गड खाली उतरू लागलो.
पावसाने ह्या वेळेस खूप झोडपले आम्हास . आसपासच परिसर पाहण्यास सक्त मनाई केली होती त्याने आज ...

पण त्यातही आम्ही खूप आनंद घेतला ...निसर्गाच्या अद्भुत चमत्कारिक क्षणांचा .

संकेत य पाटेकर
१९.०६.२०१२




गडावरील हिरवळ :






















धुक्यात हरवलेली पायवाट :





















पावसाचा... निसर्गाचा आनंद घेत असताना मी ..

1 टिप्पणी:

PRABALAGD HOTEL ROOM GUIDE SERVICE -8056186321 म्हणाले...

Dear Tourist,

Machi Prabal is an ancient and beautiful village. It is situated half-way up a mountain (such a plateau or ledge is called a "machi" in Marathi) at the base of the fort Prabalgad. Because of the two forts Prabalgad and Kalavantin and the natural beauty of the surrounding regions, many visitors and fort-enthusiasts are attracted to this place.

To fully explore this area, you will need at least two days. However, many visitors have had some difficulty in finding food and lodging near this village. Some visitors would return home after one day tour and others would spend the night sleeping outdoors on the grass and eating whatever they could bring or manage to obtain. It is also hard for ladies and children to stay here comfortably.

In order to provide a solution to this problem, the Bhutambare family has started a Kalavantin Durg & Prabalgad Dharshan Guide, Lodging& Food Service to help visitors. We provide you a tour package including every service you would require. The Bhutambare family provides these services using their own home as the base of operations.

I Would like to Introduce Myself , My name is Nilesh Bhutambre (I am called "Bhau" by those close to me, especially by everyone in my village). I’m only one “Adivasi “ boy who’s completing graduation in my village After completing my graduation and Diploma in Programming Language I am now employed as a Computer Operator & Programming Assistant at CEERI Unit, (a Central Govt. institute for research & development in the field of electronics) CSIR Madras Complex, Chennai.

Suggestions and feedback about the services provided by this venture are most welcome. Your suggestions will help us improve the service experience that we provide to other tourists like you.
Website :-http://prabalgad.jigsy.com/

Please e-mail your suggestions to: neel.nilesh0506@gmail.com or kalavantinprabalgad@gmail.com

You can contact me through my mobile-phone at 08056186321 (Please remember to add the "0" at the beginning.)

You are also welcome to read our blog to learn about news & updates from our side: http://prabalgad.blogspot.in/