तोरणा ट्रेक अनुभव :- दि :- १०-११ डिसेंबर
काही दिवसांपूर्वी ठरवल होत....१० डिसेंबर ला नाणेघाट ला जायचं, त्याप्रमाणे माहिती काढत होतो,
काही मित्रांना वगैरे सांगून पाहिलं,त्यांनी सांगितल कि जाताना तुम्ही जाऊ शकाल ,पण येताना st. वगैरे मिळणे मुशकील होईल. 'स्वताहाच वाहन असेल तर उत्तम...
आम्ही st ने जाणार होतो, त्यामुळे सकाळी लवकर जावून रात्री पर्यंत आम्हाला घरी परतायचं होत....., स्वताहाच वाहन हि न्हवत , त्यामुळे तेथे जान रद्द केल.
एक एक दिवस पुढे जात होता. आत्ता फक्त ४-५ दिवसच शिल्लक होते,
अजून आमचा ट्रेक final झाला न्हवता,
माझ्या मनात २, ३ किल्ले होते, त्यातला तोरणा हा किल्ला पाहायचं मी ठरवलं. पण तो एका दिवसात करता येईल का ? हा प्रश्न मनात घोळू लागला
कुठेही जाण्या अगोदर मी नेत वरून ...पुस्तकातून अनेक ब्लोग वाचून त्या संबंधित माहिती काढतो ....आणि मगच पुढे जाण्याच निच्छित करतो.
आणि किल्ल्यावर जाताना त्या किल्ल्याची माहिती असंन गरजेच आहे. नुसतं नावाला जायचं म्हणून किल्ल्यावर कृपया जावू नये.
तोरणा किल्ला सर करायचं अस मी मनात ठरवून टाकल. आणि त्याप्रमाणे तिथे जाण्या विषयी माहिती गोळा केली.
रात्री ११ वाजून २० मिनिटांनी ठाण्याहून सुटणारी सीद्धेश्वर एक्स्प्रेस पकडायची अस मी ठरवलं. आणि त्या प्रमाणे शनिवारी रात्री आम्ही निघालो.
ठाण्याहून आम्ही ५ जण होतो, मी ,लक्ष्मन , किशोर , मिलिंद , आणि अंकुश, पुण्याहून दोघे मित्र येणार होते ....ते सकाळी स्वारगेट ला भेटणार होते.
ठरल्या प्रमाणे सिद्धेश्वर एक्स्प्रेस ने आम्ही निघालो. reservation न्हवत त्यामुळे general डब्यातूनच प्रवास करावा लागला.
तो हि उभ्याने पुणे स्टेशन येई तोपर्यंत. त्यातही लोकांची उभं राहण्याकरिता, बस्न्याकारीता भांडण सुरु होत. मारा मारी पर्यंत मजल गेली होती.
मुंबई तली ती आपली लोकल ट्रेन परवडली. तिथे चौथ्या seat वर जागा तरी मिळते बसायला आणि passage मध्ये लोकांना उभं हि राहता येत.
पण ह्या मेल मध्ये इकडच तिकडे अजिबात कोण होत नाही. जो तो आपल्याला राजा समजतो. इतकी लोक रेंगाळत उभी असताना.
पाय ठेवण्यास जागाही नसताना. थोडी तरी दया माया दाखवावी ह्याच काही नाही. अडीच - पावणे तीन दरम्यान आम्ही पुणे स्टेशन ला उतरलो. ते श्वास मोकळा करून.
खूप बर वाटलं. ३ तास उभ्याने प्रवास केला कस ते आम्हालाच माहित.
थोडस फ्रेश होवून आम्ही पुणे st डेपोत पोहोचलो. तिथे चौकशी केली, तेंव्हा समजल कि सकाळी ६ वाजता वेल्हे करीता पहिली st आहे.
पहाटेचे ३.१५ झालेले. वेळ मुबलक होता आम्हाजवळ. पण लवकरात लवकर आम्हास वेल्हे ह्या गावी पोहोचायचं होत. कारण तिथे पोहोचण्यास आमचे दोन तास जाणार होते.
अन पुन्हा तेथून गडावर पोहोचण्यास दोन ते अडीच तास जाणार होते. गडावर फिरण्यास ३ तास आणि पुन्हा उतरण्यास तितकाच वेळ.
आणि शेवटची st वेल्हे गावातून सायंकाळी ५ ची. त्यामुळे सकाळी लवकरात लवकर वेल्हे गावात पोहचण काहीही करून आम्हाला इष्ट होत.
मग जवळच असलेल्या हॉटेल मध्ये जावून गरमा गरम चहा प्यायलो. आणि पुढे स्वारगेट ला जाण्याच ठरवलं. सकाळचे ३:३० वाजले होते.
त्यामुळे रिक्षा शिवाय पर्याय न्हवता. पुणे ते स्वारगेट त्यांनी आम्हा कडून दोन रिक्षा चे १६० रुपये आकारले. अगोदर १८० सांगितले होते.
पण आम्ही येत नाही पाहून अवघे वीस रपये कमी केले . आम्हाला देखील लवकर जायचं होत. आणि दुसरा काही पर्याय न्हवता. त्यामुळे जाणं भाग पडल.
स्वारगेट ला गेल्यावर चौकशी केली . तेंव्हा कळलं कि ६:३० ची स्वारगेट - धिसार ST आहे.
आम्हा कडे २ तास होते. आणि दोघे मित्र हि भेटणार होते. स्वारगेट पासून अवघ्या ३ किलो मीटर वर त्यांच घर होत. त्यामुळे त्यांच्या घरी जावून फ्रेश वगैरे होण्याच ठरवलं.
मित्राच्या घरी थोड आराम करून चहा वगैरे घेऊन , आम्ही पुन्हा स्वारगेट ला ६:३० च्या अगोदर येऊन पोहोचलो.
मिनिट काटा पुढे पुढे धावत होता, तास काटा हि हळू हळू पुढे पुढे सरसावत होता. पण ह्या ST चा अजून पत्ता न्हवता.
६:३० चे 7 झाले, ७ चे ७;३० , पावणे आठ होत आले तरी ST नाही.
वेळ खूप महत्वाची होती. कारण घरी आम्हास परतायचं होत.
एक माणूस आम्हा जवळ येऊन विचारू लागला कुठे जायचं आहे म्हणून ? आम्ही सांगितल वेल्हे ला , तो म्हणाला मी सोडतो तुम्हाला प्रत्येकी ६० रुपये होतील . चालेल तर बघा?
आम्ही थोड विचार करून म्हटल अजून १५ मिनिटे थांबूया. आठ वाजेपर्यंत वाट पाहुया ST ची . मग काय ते ठरवू नंन्तर .
८ वाजले होते. आणि तेंव्हाच कोणाची तरी हाक ऐकू आली वेल्हे ST आली ते. पटापट सारे जण ST त चढलो. म्हटल नशीब आली एकदाची ST
आता खरा प्रवास सुरु झाला आमचा. ७ तिकिटे घेतली ३२९ रुपये . प्रत्येकी ४७ रुपये. प्रत्येकाने विंडो सीट पकडल्या होत्या , आणि सारे बाहेरील दृश्य पाहण्यात मग्न होते
काही वेळाने ST ने पुणे सातारा एक्स्प्रेस हायवे क्रोस केला. आणि ST नरसापूर मार्गी पुढे पुढे धावू लागली. काही वेळ गेल्यावर अनेक डोंगर रांगा दिसू लागल्या. ..
आणि पुढे राजियांचा गड '' गडांचा राजा '' राजगड '' ह्याच सुंदर मनमोहक दृश्य समोर दिसू लागल.
मन स्वतःशीच म्हणू लागल .
हाच तो गड , जिथे महाराज २५ वर्ष राहिले , इथूनच त्यांनी अनेक मोहिम्या आखल्या. इथूनच त्यांनी अफजल खान विरुद्ध मोहीम आखली.
हाच तो गड, हाच तो पवित्र गड, हीच ती स्वराज्याचाची पहिली राजधानी. ''राजगड.'' डोळे दिपवून गेले, मन हर्षून गेले.
पुढे काही वेळाने आम्ही जिथे जाणार होतो.
तो गड '' म्हणजेच तोरणा ' स्वराज्याच तोरण '' शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जो गड आपल्या ताब्यात घेतला. आणि स्वराज्याच तोरण बांधलं.
तो तोरणा किल्ल्याच मन मोहक दृश्य समोर दिसू लागल. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा .
महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.
सकाळी ठीक १० वाजता बरोबर २ तासांनी आमची ST वेल्हे गावात पोहोचली.
गावात हॉटेल्स बरेच आहेत. त्यामुळे जेवणाची वगैरे व्यवस्था इथे होते. आम्ही स्वारगेट हूनच काही पदार्थ घेतले होते जेवणाकरिता, त्यामुळे इथे काहीहि न घेता. सरळ गडाच्या दिशेने मार्गी क्रमण करू लागलो.
सरळ सोपी वाट आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा इथे प्रश्न येत नाही. वाटेत एक फलक तोरणा किल्ल्याविषयी माहिती दर्शवित होता.तो वाचत पुढे सरसावलो.
पुढे एका वळणावर रहाट असलेली एक विहीर दिसली ,काही बायका माणस तिथे पाणी भरत असताना दिसले...तिथून पुढे पुलावरून जी वाट जाते ती आपल्याला थेट गडाच्या बिनी दरवाज्यापर्यंत नेते. सरळ सोपी वाट आहे.
वाटेत पुढे काही अंतर पार केल्यावर काही पायर्या लागतात . त्या रेलिंग च्या सहाय्याने चढून आपण एक एक पाऊल पुढे टाकू लागतो. तोच समोर नयनरम्य धबधबा लागला (आम्ही गेलो तेंव्हा कोरडा होता ) .
तिथे फोटो सेशन झाल्यावर आम्ही थोड्याच वेळेत बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचलो. १ तास ४५ मिनिटे इतका अवधी आम्हास लागला. बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचण्यास. वेल्हे गावातून
बिनी दरवाजा पार केल्यावर गोमुखी पद्धतीचा कोठी दरवाजा लागला. ..आणि गडाच्या अंगणात आमचा प्रवेश झाला.
डाव्या हाता कडे वळून आम्ही एक एक वस्तू पाहत पाहत ''दारू कोठार'' जवळ आलो. आणि तेथून मग बुरूजा जवळ.
बुरुजावरून झुंजार माचीच सुंदर रूप आपल लक्ष वेधून घेत. राजगड च सुंदर मनोरम्य दर्शन सुद्धा येथूनच होत.
झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर. इथून राजगड च रूप आणि आजूबाजूचा परिसर न्ह्याहालत आम्ही
झुंजार बुरुजाजवळ आलो. इथे काही वेळ बसून आम्ही निघालो ते थेट मेंगाई मंदिर च्या दिशेने . इथे आपली राहण्याची व्यवस्था होते. मंदिराच्या समोर एक छोटस गणेश मंदिर हि आहे .
मेंगाई देवीच दर्शन घेऊन आम्ही एक एक पाऊल पुढे टाकू लागलो.
घड्याळाचे काटे कसे पटापट पुढे पुढे पडत होते . दुपारचे तीन वाजले होते. अजून दोन तासांनी म्हणजेच ५ वाजता गावातून शेवटची ST होती.
ती काहीही करून पकडायचीच होती. अजून बराच काही पाहायचं राहील होत.
बुधला माची तिथला तो सुळका खुणावू लागला होता . दुपारचे ३ वाजले होते. एक तास आम्हा जवळ अवघा होता. त्यात जे काही पाहायचं ते पाहायचं होत.
बुधला माची पर्यंत जावून येऊन खूप उशीर होणार होता. त्यामुळे बाकी मित्राचं मत घेतलं . काय करायचं ? कारण पुढे शेवटची ST जी पकडायची होती.
दोघा मित्रांनी पुढे जाण्याच नाकारलं. बाकींनी पुढे जायचं ठरवलं . इथपर्यंत आलो आहोत तर ते पाहूनच जावू. अस माझाही निर्णय होता. त्यामुळे जराही वेळ न दवडता आम्ही बुधला सुळक्याच्या दिशेने निघालो.
वाटेत कोकण दरवाजा लागला. इथून पुढे खाली उतरत आम्ही पुढे जावू लागलो . ते दोघे मित्र कोकण दरवाज्या इथे थांबले. जवळ जवळ १५ ते २० मिनिटात आम्ही त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून पुढे वाट घसरणीची आहे. एक एक पाउल हा जपूनच टाकावा लागतो. ....
आम्ही एक एक करत पुढे जावू लागलो, आणि काही वेळेतच अर्धा सुळका पार केला. पुढे टोकावर जाण्यास वाट न्हवती. त्यामुळे तिथपर्यंतच आम्हास समाधान मानव लागल. वेळ हा न्हावताच. त्यामुळे पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
बिनी दरवाज्यापर्यंत येण्यास आम्हास ४ वाजून ५ मिनिटे झाली होती. एका तासात आम्हाला काहीही करून गावात पोहोचायचं होत. पटापट पावले टाकत आम्ही पोहोचालोही.
पण काहीही उपयोग झाला नाही. आम्ही येण्या अगोदरच ST निघून गेली होती. आता पुढे काय हा प्रश्न उभा होता. ?????
सायंकाळचे ५ वाजले होते. ST निघून गेली होती, ST साठी आम्ही एका तासात गड उतरलो होतो , पण त्याचा आता काहीही उपयोग न्हवता. आम्ही मग चहा घ्यायचं ठरवलं आणि मग पुढे काय ते बघू म्हणून एका हॉटेल मध्ये बसलो.
चहा वगैरे पियुन झाल्यावर सारे बाहेर आलो, पुढे एक PRAIVATE गाडी उभी होती. ST नाही पकडता आली तरी आपणास येथून PRIVATE गाड्या मिळतात. पण त्यातल्या काहीच स्वारगेट पर्यंत नेतात. काही पुणे सातारा हायवे पर्यंत सोडतात. तिथून मग पुढे कसरत करतच एखादी गाडी वगैरे पकडावी लागते स्वारगेट पर्यंत पोहोचण्यास.
ST थांबली तर थांबते.
आम्ही हि त्याप्रमाणे PRIVATE गाडी केली. प्रत्येकी ३० रुपये. त्यांनी आम्हाला पुणे सातारा हायवे पर्यंत सोडलं. तेंव्हा सायंकाळचे ६:३० झाले होते.
पुणे सातारा हायवे वर स्वारगेट व इतर ठिकाणी जाण्यासाठी लोकांची तुडूंब गर्दी होती. एक हि ST थांबत न्हवती. जो तो मिळेल ती गाडी पकडून , हातवारे करून , गाडी थांबवून ,ज्याच्या त्याच्या मुक्कामी जात होते.
आम्हला बरोबर ७:१५ ला स्वारगेट करीता ST मिळाली. ती हि भरगच्च, त्यामुळे स्वारगेट पर्यंत उभ्यानेच प्रवास करावा लागला.
रात्री ८:१५ ला म्हणजेच एका तासाने आमची ST स्वारगेट डेपोत पोहोचली.
सर्व जण खूप थकले होते, आणि त्यातच ST तून उभ्याने प्रवास, आणि प्रचंड भूकही लागली होती. त्यामुळे आम्ही अगोदर ''ठाणे ST करीता चौकशी करून'' एखाद्या हॉटेल मध्ये जेवण करायचं ठरवलं.
दोघे मित्र हे पुण्याचेच होते, स्वारगेट पासून काही अंतरावर त्याचं घर होत, त्यामुळे त्यांनी आमचा निरोप घेतला, आणि ते त्यांच्या घराच्या दिशेन निघाले.
आम्ही जवळच असलेल्या एका उपहार गृहात शिरलो. आणि VEG बिर्याणी ची ओर्डर दिली.
अजून दिलेली ओर्डर आली न्हवती त्यामुळे डोळे इकडे तिकडे पाहत होते, तेंव्हा समोर एक पुणेरी बोर्ड दिसला
"" आमच्या कडे बाल कामगार
काम करत नाहीत '' कृपया ह्यांची नोंद घ्यावी"" ती पाटी पाहून क्षणभर हसायला आल '' पुणेरी पाट्या म्हणजे एक एक मजेशीर असतात. गंम्मतच असते एक ,
जिथे अस लिहल होत, तिथेच समोर एक बाल कामगार काम करताना दिसला...आहे ना गंमत..!!!
थोड्याच वेळात एक जण गरमां गरम बिर्याणी घेऊन आला. ती पाहूनच वाटलं हि खूप तिखट असणार. लालभडक असा रंग होता,
एक चमचा खातोय तोच लगेच पाणी....एक चमचा खातोय तोच लगेच पाणी....वेटरला विचारलं ''इतना तिखा क्यू है ?
त्याने म्हटलं ''आपने ओर्डर दिया वैसा हि है''
मी म्हटल '' हमने तो खाली veG बिर्याणी बोला था
इतना तिखा कभी रहेता है क्या बिर्याणी ''
कोणीच खाल्ली नाही ती बिर्याणी...!!!
तो ती ओर्डर cancel हि करत न्हवता
तो म्हणाला : एक बार ओर्डर दिया तो cancel नाही होता .
मी म्हटल वा ...सही ..!!
मनात म्हटल उगाच आलो इथे
भुखा तर सार्यांनाच लागल्या होत्या, पण असली तिखट बिर्याणी घशा खाली उतरत न्हवती.
आम्ही पुन्हा मग RICE PLATE ची ओर्डर दिली. आणि आमची भूख भागीवली.
आता वेळ होती ती BILL देण्याची ,सगळ मिळून ५१० रुपये bill झाला होता. ५ जनांचा
त्यात ती VEG बिर्याणी चे हि पैसे पकडले होते त्याने .
आम्ही मालका पाशी जावून भांडू लागलो. कि आम्ही फक्त RICE PLATE चे च पैसे देऊ.
बिर्याणी इतकी तिखट असते का कधी ?
जवळ जवळ १५ मिनिटे आम्ही त्याच्याशी भांडत होतो. तो पैसे काही कमी करत न्हवता.
त्याच म्हणन होत कि तुम्ही खाण्या अगोदरच ओर्डर CANCEL करायला होती. खाण्या नंतर नाही.
आम्ही म्हटल त्याला : खाल्ल्याशिवाय कस कळणार ती तिखट आहे का कशी ते ' आणि आमच्या नि ती अर्धी सुद्धा संपली न्हवती. संपूर्ण परत पाठविली आम्ही.
तो मालक काहीही ऐकून घ्यायला तयार न्हवता.
तो ५१० रुपये वरच ठाम होता.
१५ मिनिटा नंतर त्याने त्यातले १०० रुपये कमी केले.
मी मित्रांना म्हटल जावू दे रे आपल्याला सुद्धा घरी लवकर जायचं आहे . देऊन टाक पैसे
पैसे देऊन आम्ही स्वारगेट डेपो च्या दिशेने निघालो,
१०:१५ ची ST होती , स्वारगेट - ठाणे ''
म्हटलं मस्त पैकी आरामात बसून जावू , त्यामुळे ट्रेन ने जाणं आम्ही टाळल,
१० वाजले होते समोर एक महाराष्ट्र राज्य परिवाहन ची वोल्व्हो उभी होती, स्वारगेट ते ठाणे तिकीट २५० रुपये.
१०:२० दरम्यान आमची ST च डेपोत आगमन झाल, तसं आम्ही पटापट आत शिरलो ,
जागा पकडण्यासाठी .....तेवढ्यात खाली उभा असलेला मास्तर ओरडला , दोन- तीन सीट सोडून बाकी सारे सीट रिसर्व्ह आहेत .
त्यामुळे पुन्हा आम्हास खाली उतरावं लागल , उभ्याने प्रवास झेपणार न्हवता ,
आत्ता पुढे काय ? हा प्रश्न समोर राहिला ? १०:१५ नंतर शेवटची ११:०० ची sT होती
पण तिलाही अस RESERVATION असलं तर ....म्हणून आम्ही पुणे स्टेशन गाठलं आणि तिथून
मग तिकीट काढून रात्री १२ वाजता सुटणारी EXPRESS पकडली आणि शेवटी पुन्हा
उभ्यानेच ठाण्यापर्यंत प्रवास केला .
सकाळी ३:३० वाजता आम्ही ठाणे स्टेशन ला पोहचलो.
असा हा आमचा प्रवास झाला .
तोरणा किल्ला पाहण्याचा आनंद झाला
संकेत य. पाटेकर
२१.१२.२०११
मंगळवार
https://picasaweb.google.com/103982240392890367738/TREKTORANA?authkey=Gv1sRgCNWm9InhhejdggE