सफाळे ( विरारच्या २ स्थानक
पुढे ) ह्या पच्छिम रेल्वे स्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची
हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड ,
तांदूळगड.
एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीच नागमोडी वळनाच
नयनरम्य दृश्य , मनाला सुखद अनुभव देतो. मन कस त्या निसर्गाशी एकरूप होवून जातं .
सफाळे स्थानका पासून एसटीने
..दुर्तफा दाट भरगच्च झाडीच्या हिरवळीतून , वळणदार नागमोडी डांबरी रस्त्याने .. घाट माथा चढत १५ मिनिटात आपण पोहोचतो ते तांदुळवाडी ह्या गावात.
गावातूनच एक वाट ..शाळेजवळून .... कॉनक्रिट च्या रस्त्याने ...आनंद दिघे
साहेबांची प्रतिमा असलेल्या अन विविध पारितोषिकांनी सजलेल्या त्या कार्यालया जवळून पुढे होत जाते . तिथून साधारण १ तासात गड माथा गाठता येतो.
सुरवातीला दगडांच्या राशी पार करत आपण पुढे पुढे चालू लागतो . १५- २०मिनितात आपण एका पठारावर येऊन पोहोचतो . येथून आपल्याला 'सुळक्याच
अन त्यावरील मळलेल्या वाटेचं सुंदर दृश्य दिसत'. ते नजरेत टिपत पुढे व्हायचं. . काही वेळेतच त्या सुळक्यावर जाणारी चढण सुरु होते.
हळू हळू पाउल
टाकत अन निसर्गाच विस्तीर्ण मनमोहक दृश्य पाहत , थंड हवेचा जोरदार मारा खात पाऊलं पुढे सरत राहतात.
पुढे अजून दोन - तीन चढणीचे टप्पे पार करून . ५ फुटापेक्षा उंचावलेल्या गवती पात्यांपासून , मळलेल्या पाय वाटेने आपण गडावर
पोहोचतो.
गडावर '' सप्त हंडी म्हणून ओळखल्या जाणर्या ...७ पाण्याच्या टाके आहेत.
तसेच काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत.
पावसाळ्यात गडावर आजुबाचुच दृश्य दिसन खर तर भाग्याच असत ...कारण
पांढऱ्या शुभ्र धुक्यानी . गड नेहमीच काबीज केलेला असतो. पण ते भाग्य आम्हाला काही
लाभल नाही.
काही वेळ गडावर फिरून जेथून आम्ही आलो त्या वाटेने न जाता
त्याच्या दुसर्या वाटेने त्या घनदाट जंगलातून मार्ग शोधत शोधत २ तासात गडाला एक
वळसा घालत तांदुळवाडी - चावरेपाडा ह्या गावाच्या विहिरीजवळ पोहोचलो.
अन तिथून मग गावातून ...रस्त्यामार्गे तांदुळवाडी गावात आलो .
जेथून
आम्ही चढण्यास सुरवात केली.
तिथून मग पुढे एसटी ची वाट पाहत ....उभे असता ....गावातल्याच एका चार
चाकी गाडीतून त्याकडे लिफ्ट मागून '' राजेश नाव असलेल्या त्या प्रेमळ मुलाशी (
त्याने प्रवासाचे पैसे काही घेतले नाही आम्हाकडून ) बोलत बोलत सफाळे स्थानकात
पोहोचलो.
मोठा ग्रुप वगैरे असेल तर दिवाळीत यायचं ... गावातले सगळे जण गडावर
जातात दिवाळीत . अस त्याने आम्हास सांगितले.
सफाळे स्थानकातून मग ३:०५ ची शटल पकडून आम्ही विरार ला पोहोचलो नि
तिथून दादर मार्गे थेट ठाणे गाठले आणि अशा तर्हेने आमचा तांदूळ वाडीचा प्रवास
यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
संकेत य पाटेकर
११.०९.२०१२
११.०९.२०१२
सफाळे रेल्वे स्थानक ...........
तांदूळ वाडी एसटी थांबा ....सफाळे स्थानका पासून अवघ्या १५ मिनिटात आपण एसटी ने येथे पोहोचतो.
तांदुळवाडी गावातली शाळा..
डावीकडची वाट आपणास गडावर पोहोचवते ...येथून
साधारण १ तासात आपण गडावर पोहोचतो.
आनंद दिघे साहेबांची प्रतिमेला वंदन करून पुढे
वाटचाल करायची ....
पंधरा वीस मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो
....येथून ह्या सुळक्याच सुंदर दृश्य दिसत.
आमच्या चौघांची छबी...
हे लाल रंगाचे हे फुलझाड इथे बरयाच प्रमाणात
आढळतात ...कुणी ह्याच नाव सांगू शकेल का ?
स्वताहा :...
माथ्यावर वर नेणारी वाट..
मनमोहक दृश्य : माथ्यावर नेणारी वाट...
दरी न्याहाळताना...
शेवटचा टप्पा ...
कुतूहल ..सृष्टीचे ..
वैतरणा नदी...
वैतरणा नदी...
गवतातून मार्ग काढत जाताना...
धु कं...
दोन धड एक शिर ..
खादाडी ..
पाणी हेची जीवन
...
लक्ष्या अन किशोर ह्यांची जोडी...
किशोर अन मी
स्वताहा ....
धुक्यात हरवलेलं झाड...
झाडावरच भूत .....
गडावरच्या ''सात'' पाण्याच्या टाक्या ...सप्त
हंडी म्हणून ओळखल्या जातात.
तांदूळ वाडी किल्ला .....