शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

हडसर- दुर्गशास्त्रील एक अनोखं दुर्गरत्न ....!

सह्याद्री तसा नेहमीच भुलवतो , साद घालतो ..अन मग आपली पाऊलं हि न अडखळता त्याप्रेमापायी अन आपल्या आनंदापायी पुढे सरसावू लागतात. कधी नाशिक , कधी पुणे कधी रायगडच्या दिशेने ...त्याच्या मायेभरल्या कुशीत काही क्षण विसावण्यासाठी ..ध्यान- मग्न होण्यासठी ...गौरवशाली इतिहासाची पानेमुळे पुन्हा उजळवीण्यासाठी , हृदयाशी सारे क्षण टिपून घेऊन .. सह्याद्री जीवन अगदी जवळून अनुभवण्यासाठी ....


काल अशीच पाऊलं निघाली ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुकाच्या च्या दिशेने ..हडसर च्या वाटेने - दुर्गशास्त्रील एक अनोखं दुर्ग रत्न ....पहावयास !

समुद्र सपाटीपासून साधारण १००० मीटर उंच असलेला हा किल्ला दुर्ग बांधानितला एक वेगळंच वैशिष्ट्य आहे . एक वेगळंच अलंकार . कातळात कोरून काढलेले प्रवेशद्वार , बोग्देवाजा मार्ग , ती अंधारी कोठारं, शत्रूला हि कळणार नाही अशी केलेली दुर्ग बांधणीची रचना पूर्वीच्या लोकांची बुद्धिमत्ता अन कलागुणाची दाद देऊन जातं.

तसं सह्याद्री म्हटलं तर मला नाशिक आधी खुणावतो. एक वेगळं राकाटपनं अन सौंदर्यविष्कार येथे पाहायला मिळतं . पण त्या इतकंच पुणे हि माझं आवडीच ....इथल्या सह्याद्री रांगा वेडावून सोडतात . 
कधी मंद कधी बेभान गतीने वाहणारा उनाड वारा , अथांग पसरलेला निळेशार जलाशय , वर विस्तारलेलं मोकळं आभाळ, सभोवतालची हिरवी घनदाट झाडी , त्यावर बागडणारी इवली टीवली सुरेख रंगेवाली ना ना विविध प्रकारची फुलपाखरं, पक्षी पाखरांची भान हरपून टाकणारी मंजुळ शिळ , इथला रम्य सुखद परिसर , इथली माती इथली मनमिळावू , मदतीस तप्तर असणारी गोड - साधी भोळी माणसं ., त्यांचा पेहराव .., त्यांचा येथोच्छित पाहुणचार ...आठवणीच गाठोडं घरी जाता जाता अगदी भरभरून जातं . 
पुढे नक्कीच येऊ ..अशी मनाशी आर्त हाक देत .

ठाण्याहून पहाटे साडेचार वाजता , साईचरणी लीन होत .
आमच्या (म्हणजे हेमंत ची हो ) बजाज ct १०० ने आमची पुढील प्रवासी वाटचाल सुरु झाली . रस्त्यावरील निरव शांततेला छेदत..,पहाटी काळोखात ...वाऱ्याशी सलगी करत, अंगा खांद्याला बिलगणाऱ्या , कुडकुडवनाऱ्या गुलाबी थंडीचां आस्वाद घेत आम्ही निघालो. मधेच कुठे थांबत , थर्मास मधल्या वाफालेल्या चहाचे एक एक घुटके घेत . .कधी सेल्फी सेल्फी म्हणत स्वतःचे फोटो काढत .
माळशेज च्या नागमोडी वळणाने , सह्याद्रीचा राकट कणखरपणा नजरेत सामावत , आम्ही खुबी फाट्याजवळ आलो.
हरिश्चंद्रगड ची मनमोहक रांग समोरच खुणावत होती. पण पाउलं हडसर च्या दिशेने जी जाणार होती. 




थोडी पोटपूजा उरकून घ्यावी म्हणून एका हॉटेल मध्ये उतरलो . हॉटेल धारकास गरमागरम मिसळ पावची ऑर्डर देऊन मुक्त गप्पांत रंगून गेलो. बऱ्याच दिवसाने अशी चवदार मिसळ खावयास मिळाली. त्याने अतृप्त उदर मन हि तृप्त झालं. नंतर पुढे बराच वेळ त्या मिसळची चव जिभेवर तशीच रेंगाळत राहिली . .

साधारण ९:३० दरम्यान गणेश खिंडीतून , गणेशाला वंदन करत , खामगावातून वळसा घेत , माणिकडोह च्या रम्य परिसरात आम्ही दाखल झालो. अन भान हरपून गेलो. सृष्टी सौन्दर्याचं जितकं कौतक करू तितकंच कमीच आहे. सौंदर्यलांकाराने नट- नटलेली अन प्रेमाने ओतपोत अशी हि सृष्टी नेहमीच भान हरपून टाकते. खरंच निसर्ग सारखा जादुगार नाही अन त्याच्यासारखा मित्रगुरु हि ...


वळणा वळणाच्या अरुंद रस्तावर , मोकळ्या वातारवणात ,. ..हडसर अन बाजूचा हटकेश्वर डोळ्यासमोर ठेवत ...
आम्ही हडसर गावाशीपाशी पोहचते झालो.



सकाळची नेहमीचीच गावकरयांची दिनचर्या , कामाची लगभग सुरु झाली होती . कुणी इस्टी खांब्या जवळ जुन्नर इस्टी ची वाट पाहत होते. तर आया - बहिणी - विहिरीवर पाणी भरण्यास गर्क झाल्या होत्या .
हडसरला पहिल्यांदाच आलो असल्याने हडसर कडे जाणारी वाट विचारावी म्हणून ..विहिरीवर पाणी भरावयास आलेल्या एका ताई ला मी विचारलं . ' ताई ' हडसर ला जाणारी वाट कुणीकडून जाते?
तेंव्हा माझ्या 'ताई' ह्या शब्दाने ती गालातल्या गालात हसली अन लाजली ..तेंव्हा वाटलं कि ' ताई' म्हणून मी चुकलो कि काय ? असो हा गमतीचा भाग ...
तसे संस्कारच आहे आम्हावर ...बहिणीचं नात हळूच गुंफून घ्यायचं .

हडसर ला जाणारी एक पायवाट विहिरी जवळून जाते . पच्छिम दिशेने तो किल्ल्याचा राजमार्ग तर दुसरी वाट बुरूजा जवळून जाते पूर्वेकडचा उभा कातळ कडा चढून ..खुंटीच्या वाटेने, थर थरार अनुभवून , कमी वेळेत (नवख्याने येथून अजिबात जावू नये )

सुरवातीला आम्ही राजमार्गाने जायचं ठरवत होतो पण नंतर खुंटीच्या वाटेनेच माथा गाठायचा ठरवलं. अन आमची ' बाईक' एका ठिकाणी घरी सोपावत , आम्ही खुंटी च्या वाटेने निघालो .
गावातल्या एकाने आम्हास रस्ता दाखवला नि आम्ही पुढे होत हळूहळू त्या पाउलं वाटे संगे निघू लागलो.
सुरवातीला पायथ्याशी एक मंदिर लागलं . त्याच दर्शन घेतलं. अन पुढे वाटचाल सुरु ठेवली .

आता मोकळ्या आभाळाशी ' खुंटीची उभी' पहाडी वाट आमचं लक्ष वेधून घेत होती .


खालून मुंग्यासारखी दिसणारी काही माणसं ती वाट हळूच सर करत होती. .ते पाहून आमच्या साहसी मनाला हि उत्सुकतेची नवी बहर आली . तनामनात नवा जोश नवा आत्मविश्वास फडफडू लागला .
त्यातचं पायाखालची वाट तुडवत तुडवत आम्ही नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे चुकीच्या वाटेने कधी निघालो ते आमचच आम्हाला कळल नाही .
आजवरचे बरेच ट्रेक असे सीध्या मार्गाने न होता असे हटकेच झालेत . काट्या कुट्यातून उभ्या घासार्या मधून स्वतः ला सावरत मार्ग काढत.
आठवणीचा तो अनमोल ठेवा कायम स्मृतीत जागे ठेवून ...
तर असो ...
हाता खांद्यावर काट्यांचे ओरबडे उमटवत त्याची ती खून आठवण म्हणून ठेवत आम्ही खुंटी च्या उभ्या पहाडा जवळ बुरूजा जवळ आलो.
उभ्या कातळातल्या त्या खोबण्या आता उराशी धडकी देत होत्या . नवा थ्रील अनुभवायला मिळणार होता. पण जरासाही हलगर्जीपणा आमचा .....नवं संकट ओढवणारा होता .
त्यामुळे मनाशी पक्का निर्धार करून ..सावधगिरी बाळगून , नव्या दमाने हळुवार आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला.



आणि मोकळं श्वास टाकला.

आता एका गुहेपाशी येउन आम्ही पोहचलो ...

क्रमश :- पुढील भाग लवकरच ..
संकेत य पाटेकर

०७.१०.२०१४



सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

देवगिरीच्या ' शोभा मावशी ' अन वेरूळचा ' शाहरुख '

मी आज किल्ल्याविषयी लिहणार नाही.
देवगिरी किल्ला तर अप्रतिमच आहे . अद्भुत आहे. वैशिष्टपूर्ण अगदी ..बळकट्ट त्याला तोड नाही.
वेळ काढून मी ह्यावर पुढे नक्कीच लिहेन ...कारण लिह्ण्यासारख खूप काही आहे.
पण आज मी इथे लिहिणार आहे ..दोन व्यक्तीवर जे ह्या प्रवासात भेटले . अन मनावर कायम घर करून राहिले .

'
देवगिरीच्या मनमिळावू अश्या शोभा मावशी ..अन कानातल्या कुड्या विकणारा निर्मळ हास्याचा झरा 'शाहरुख'


वेरूळचा ' शाहरुख '

अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त .
बघा तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल . गर्ल फ्रेंड साठी तरी घ्या हो .
नको नको म्हटले तरी तो माझा पिच्छा काही सोडत न्हवता .
नाव विचारले तर म्हणे शाहरुख .
हेअर स्टाईल वरून तर तसा तो शाहरुखच वाटत होतां. :असो त्याच्या चेहर्या वरच हास्य मात्र अगदी निखळ होतं.त्यात स्वार्थपणा अजिबात नव्हता .

सांजवेळ होती , सहा वाजून काही एक मिनिटे झाली होती . कैलाश लेणे पाहून नुकताच गेट बाहेर पडलो आणि तिथल्या एका स्थायिक फेरीवाल्याने गाठलं.
हाती मार्बल ची सुंदर पेटी आणि हत्तीचे कोरीव काम केलेले ती सुबक मूर्ती . त्याने दाखवायला सुरवात केली . आणि मी सहज म्हणून ह्याचे किती असे प्रश्न करू लागलो .
आणि त्याने त्यावर लगेचच उत्तर द्यायला सुरवात केली . ह्या पेटीचे २५० रुपये , ह्या हत्तीचे २०० रुपये.
ते ऐकून मी नकारार्थी मान फिरवली . खरं तर ती नक्षीकाम केलेली सुंदर मार्बल पेटी घेऊसी वाटत होती. पण २५० रुपये जरा जास्तच वाटत होते .

कुठे हि बाहेर जाताना मग तो ट्रेक असो किंव्हा पिकनिक ठरवलेल्या पैशात सर्व भागवायच किंव्हा शक्यतो कमी खर्च करायचं .ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील असतो .
कुणास ठाऊक कुठे आणि कशी पैशाची गरज भासेल ? ते काही सांगता येत नाही ना ?

तरी हि काही गोष्टी अशा असतात कि मनाचा मोह काही केल्या आवरत नाही .
नाही नाही म्हणता त्याची किंमत कमी करून , ती सुंदर नक्षीकाम केलेली मार्बल पेटी मी औरंगाबादची आठवण म्हणून विकत घेतली . आणि पुढे चालू लागलो.
तोच पुन्हा एक इसम पुढे येत त्याजवळ असलेली अजिंठा वेरूळची पुस्तके आणि काही CD's विकत घ्या असे विनवू लागला . त्याला नाही म्हटल . आणि पुन्हा पुढे चालू लागलो.
आणि तोच समोर उभा राहिला तो शाहरुख . शाळेतल्या मुलांच्या वयाचा , हेअर स्टाईल तर अगदी शाहरुख सारखीच. बोलन मात्र अस्सल मराठी .तिथल्या स्थानिक भाषेतलं

चेहरा कसा तर हसरा .त्याच्याकडची ती वस्तू मी नक्कीच विकत घेईन अशा खात्रीचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव . हाती एक प्लास्टिक पिशवी , त्यात विक्रीसाठी ठेवलेलं सामान .
मला पाहून लागलीच त्याने बोलायला सुरवात केली . हाती असलेल्या पिशवीतून एक वस्तू काढून मला त्याने दाखविली . ज्याचा मला काहीच उपयोग न्हवता . म्हणून मी सरळ नाही म्हटलं.
आणि ती वस्तू घेऊन तरी मी काय करणार होतो ? मुलींच्या कानातल्या त्या कुड्या . पण तरीही नाही म्हटल्या वर
अरे सर घ्याना घ्या ? तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल.
अस कळकळीने तो म्हणू लागला .
माझी कुणी गर्ल फ्रेंड नाही रे ? अस मी तितक्याच स्पष्टपणे म्हणू लागलो .
अहो गर्ल फ्रेंड नाही तर बहिणी साठी घ्या ? बहिणीला होईल ?
ह्यवर मी काय बोलणार ,अनुत्तर झालो . म्हटलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावू .
आवडल्या तर नक्कीच खुश होतील . तेवढंच भावावरच प्रेम अधिक दृढ होईल .
आणि म्हणून मी त्या कानातल्या कुड्या सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी करून त्याच्याकडून विकत घेतल्या .
आणि तोच त्याच्या मनाची पुन्हा लगभग सुरु झाली .
माझ्या मित्रांना तो विनवू लागला .
तुम्ही सुद्धा घ्या ना एखादं ?

माझ्या मित्रांनी काही ते घेतल नाही . पण त्याची छबी मात्र त्यांनी कॅमेरात बंदिस्त केली .
आणि जाता जाता त्याला विचारल , ' फेसबुक वर आहेस का रे ?
त्याला त्यातल काही कळल नाही. पण चेहर्यावर त्याच्या निखळ हास्य उमललं अन मुखातून शब्द बाहेर पडलं ते पुन्हा शाहरुख .
असा हा शाहरुख ..प्रवासात भेटलेला ..मनावर हळूच आपला ठसा उमटवणारा .
प्रवास हा अशा व्यक्ती रेखांनीच यादगार होतो नाही का ? त्यातूनच खरी संस्कृती समजते . पोटासाठी चाललेली जीवाची तगमग कळते.
- संकेत य .पाटेकर


________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

शोभा मावशी

आता पुन्हा याल ते एकत्रच जोडीने या, बर का ? (म्हणजे लग्न करून बायको सोबत )
देव तुम्हाला सदा हसत ठेवो.
जाता जाता मावशीचा आशीर्वाद आणि तिचे प्रेमळ शब्द मनाशी बिलगून आम्ही आमच्या परतीच्या मार्गी लागलो.
देवगिरी किल्ल्याला निरोप देत २ दिवसाची आमची हि संभाजीनगर (औरंगाबाद) सफर आता पूर्ण होणार होती.

जवळ जवळ पाऊन ते एक तास , आम्ही देवगिरी किल्याच्या बालेकिल्ल्यावर स्थित, ' पेशवेकालीन गणेश मंदिराच्या ओट्यावर, ' त्या शांत वातावरणात स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या , शांत तितक्याच बोलक्या असणारया शोभा मावशीची बोलण्यात अगदी दंग झालो होतो .
त्याही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत होत्या . स्वतःबद्दल तसेच इथला इतिहासाबद्दल मुक्त कंठाने आम्हास सांगत होत्या.

त्यांची हि तिसरी पिढी . नाव - शोभा खंडागळे .
सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ ते सवा सहा वाजेपर्यंत ते बालेकिल्ल्यावर स्थित पेशवेकालीन '' गणेशाची'' भक्ती भावाने पूजाअर्चा करतात .येणाऱ्या भाविकास साखरेचा प्रसाद देऊन, दमलेल्या थकलेल्या मनास पाणी देऊन त्यांच मनशांत करतात . त्यांची विचारपूस करतात अगदी मनोभावे .

अगदी कधी कुणास स्वतःसाठी बनवून आणलेला जेवणाचा डबा देखील ते प्रेमाने देतात . खाऊ घालतात .
त्यांची गणेशावर खूप श्रध्दा आहे . जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने असे ते समजतात.

त्यांना पगार वगैरे अस काही हि नाही . जे भाविक देवापाशी श्रद्धेने जो काही पैका ठेवतील तोच त्यांचा पगार .
दौलताबाद गावातच त्याचं मोठ घर आहे.
त्यात त्यांची सासू , तीन मुले - त्यांची सून- नातवंड असे सारेजण एकत्रित राहतात.

साऱ्यांच नेहमीच चांगल चिंतनारया मावशी स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या आहेत.
आणि अशा मोकळ्या मनाच्या बोलक्या व्यक्ती क़्वचितच भेटतात आपल्या जीवन प्रवासात.

मनावर आपली छाप उमटविणारे हे दोघ , निरागस , निर्मळ मनाचे ....
संभाजीनगर (औरंगाबाद) ची सफर यादगार ठरली ती ह्यांच्यामुळेच. :)
- संकेत पाटेकर
०४.१०.२०१३


________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

देवगिरीचे काही फोटो ...




________________________________________________________________________________
________________________________________________________________________________


वेरूळची वैशिष्टपूर्ण अन अचंबित करणारी अशी कैलास लेणी ...