सोमवार, १७ जुलै, २०१७

पावसाळी 'सोंडाई' दर्शन










कर्जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरं,  साधारणता  अकरा  एक किलोमीटर वर असलेला सोंडाई किल्ला, आता बर्यापॆकी तसा   सर्वांना परिचयाचा आहे. असं  म्हणालो तरीही,  त्यात काही  चूक ठरणार नाही. काल  भेटीदरम्यान तो अनुभव घेता आला.

 हा किल्ला म्हणायला छोटेखानी.. विस्ताराने तसा  लहान... 
सोंडेवाडी ह्या वस्तीपासून पासून.. साधारण १ तासाच्या , वळणदार  उभ्या आडव्या चढणीचा  , माथ्याशी पाण्याचं टाकं ( जोड टाकं  आणि एक खांब टाकं) एवढे  अवषेश , विशेष पाह्ण्यातले, आणिक सोंडाई देवीचं ते  मंदिर,





मोकळ्या आभाळाखाली ,   उन्हं  वाऱ्याच्या भिंतींनी उभं असलेलं आणि  वृक्ष राजीचं कळस लाभलेलं ,  तसेच पक्षी पाखरं आणि प्राणी मात्रांच्या   चौकी पहाऱ्यात निगा राखून असलेलं आणि  गावकऱ्याचं विशेष श्रध्द्स्थान असलेलं . मंदिर...






















 पाह्ण्यातलं इतकंच जरी असलं,  तरी सृष्टी सौन्दर्याने आसपासचा परिसर अगदी नटाटलेला आहे.
दूर आकाशी डोकावलेला  इर्शाळ गड - वेडा वळणाने विस्तारलेला मोरबे धरण..वावरले धरण ,  माथेरानचे पठार आणि घनदाट हिरवाईने पांघुरलेलं अवतीभोवतालच रानवन...आणि डोंगर कैचीतून वाहणारे शुभ्र फेसाळ धबधबे ...
काल हे सगळं अनुभवता आलं ....




























 सोंडे वाडीतून सुरु केलेली  आमची वाटचाल ...गडमाथा फिरून घेत, पुढे वावरले गावाशी  .. घनदाट वृक्ष राजींच्या कमान वेढीतून मार्ग काढत काढत पुढे ..हायवेपर्यंत स्थिरावली गेली.  पावसाच्या रिमझिम सरीत न्हाऊन .. मौज मस्तीचे क्षण गाऊन ...परतीचा आमचा प्रवास फार हा आनंदाने उधळला गेला.
म्हणेजच आम्हीच उधळून दिला....
त्याच कथन .



















 ***********************************************************************
पावसाळा म्हटलं कि  सर्वत्र हिरवाईचा रंग उधळलेला दिसून येतो.  पावसाच्या उन्ह खेळीमध्ये ,  इंद्रधनूच मिळणार ते अवचित  दर्शन,  कड्या~कपारींतुनि  कोसळणारे अवघळ धबधबे ...., खळखळून वाहत झुलणारी  नदी , ओहळ आणि वृक्षराजींच्या  पानां फुलांत  गर्द मिठीत  विसावलेली ,  मोत्यावाणी  टपोर थेंब  ...हे  कसं सगळं मनाला सुखवणारं असतं. मोहित करणारं असतं. 
आणि अश्या ह्या आल्हादायक सुखकारक आणि आनंदायी वातावरणात आपुल्या सह्याद्रीची  साद आपल्याला न  खुणावेल तर नवलच म्हणायला हवं .  म्हणूनच तर आपली पाऊलं वळतात ती  आपल्या सह्य वाटेकडे ...ह्या दुर्ग किल्ल्यांशी ...! मनात शिवप्रेरणा जागी करत ...
आणि त्याने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत... शिस्तीचं  बाळकडू  उगाळत . 

(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे .  )


प्रति - १ 
कर्जत पूर्वेकडून  ३५० / - च्या भाडयावर टमटमने आम्ही सोंडाई वाडी साठी रवाना  झालो . 
बोर फाट्याशी वळण घेत , पुढे सोंडाईवाडी कडे चढाई करताना  ..टमटम मधून टिपलेला फोटो . 
विस्तारलेला  मोरबे धरण आणि मंदिर ..




                                                                                     
                                          प्रति - 2




                                                                 प्रति - 3
पावसाळा सुरु झाला नि शेत माळ्यातिल कामाला अशी सुरवात झाली. 
हिरवाईच्या रानझुल्यात सोनं  पिकवणारं ..शेतकरी 


















                                                                 प्रति - 4
साधारण  ९ च्या आसपास आम्ही सोंडेवाडीत पोहोचलो. 
(ह्या फलकापासून उजवीकडची वाट आपल्याला किल्ल्याशी घेऊन जाते .)



प्रति - 5
बरोबर ९:१० ला आम्ही ट्रेक ला सुरवात केली . तेंव्हा काळ्या  पांढुरक्या ढंगानी  गडाला  असा वेढा घातला होता . 





                                                                       प्रति - 6
सोंडेवाडीतूनच पुढे  ....

                                                           प्रति - 7
पावसाच्या रिमझिम आणि सरसर सरी अंगावर घेत आम्ही असं पुढे निघालो.  

























 
प्रति - 8
पावसाच्या  आगमनानं  रानोमाळ उधळलं गेलं  होतं . 
कातळ हि .. नितळ पाऊस सरींनी न्हाऊन ..लक्ख  तुकतुकीत झालेलं ,  त्यावर हळुवार पाय रोवत आम्ही पुढे निघालो . 


 
प्रति - 9

























 
प्रति - १0
एकीकडे मोरबे धरण आणि एकीकडे आकाशी उंचावलेला ईर्शाळचा सुळका नजरेच्या बरोबर टप्प्यात येत होता. त्यात गडाभोवती पसरलेली घनदाट वृक्ष राजींची हिरवाई मनाला सुखावून जात होती. .. 
























 प्रति - 11
शेतमळ्याच्या सहवासात गंधालेली हि खेडी पाडी ... 

























प्रति - 12
ढगांनी आच्छादलेला पठार ..


                                                           प्रति - 13
साधारण  तासाभरातच .. आम्ही गडाच्या माथ्याशी पोहोचलो . तेंव्हा टिपलेलं  सृष्टीचं हे  विहंगमय असं दृश्य ..



प्रति - 14


                                  प्रति - 15
 गडाशी पोहचताच  पाण्याचं जोड टाकं दिसलं ..पावसाच्या पाण्याने उतू जात असलेलं ..




.प्रति - 16
तिथूनच पुढे ... माथ्यावरच्या सोंडाई देवीशी घेऊन जाणारा हा डोंगर ...
इथेच लोखंडी  शिड्या बसविल्या आहेत ..

























 प्रति - 17
 गाव करयांच  विशेष  श्रध्द्स्थान..! गडाची देवता ...,! 

























                                         प्रति - 18
सोंडाई च्या माथ्याशी आम्ही क्षणभर विश्रांती घेतली आणि अवताल  भोवताल असा निरखू लागलो ..


                                                 प्रति - 19
अवती भोवतालचा  प्रदेश ...
  
                               प्रति - 20
येताना सोंडेवाडीतून कूच केले होते आता वावरले गावातून पुढे व्हायचे होते. 
समोर दिसत असलेल्या वावरले धरणापर्यंतचा टप्पा आता  गाठायचा होता.  घनदाट रानवनातून  .. त्यामुळे क्षणभर विश्रांती घेऊन  आम्ही लगेचच परतीच्या मार्गाला लागलो .  










                                                                    प्रति - 20
आल्या त्या वाटेने पुन्हा .....

























                            प्रति - 21

























                    प्रति - 22

























                     प्रति - 23

























            प्रति - 24
येताना सोंडेवाडी आणि जाताना वावरले  गाव हे आधीच  ठरलं असल्याने ..हि दुसरी वाट पकडली . 

घनदाट वृक्ष राजीनी व्यापलेली ...

प्रति - 25
काही अंतराच्या  पायपिटीने आपण  इथे येऊन पोहचतो .  डोंगराची हि  बेचकी लक्षात ठेवायची आणि  पुढे वळायचं ..



























 प्रति - 26
 वावरले  गावाशी जाताना , झुळझुळ वाहणारे असे लहान सहाण प्रवाह .. आपल्या आडवे येतात. किंव्हा आपणच  त्याच्या आडवे येतो. ...
त्यातही मनसोक्त आनंद लुटायचा ..वेळेचं भान ठेवून . 



























            प्रति - 27
जिथे आपण ..काही क्षण आधी होतो ...तोच 'माथा' पायथ्यापासून,  असा वेगळ्या अंगाने असा पाहणं. 
हा अनुभव सोहळा ज्ञानात भर टाकणारा असतो.   म्हणूनच वेगवेगळ्या वाटा जाणुनी घ्याव्यात . 

    
                                                           प्रति - 28
रानवनातून बागडलं  कि सृष्टीतल्या अश्या लहान सहाण गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांच्या त्या आकर्षक , सर्वांग सुदंर... अश्या आकार रूपानं.  
























 पाऊस पाण्याने मुरलेल्या मातीतून आणि गर्द हिरव्या वृक्ष  वेलीतून असा मार्ग काढत जाणे. ...हा आनंद  काही  और असतो..... 
  


प्रति - 30
जवळ जवळ  दोन तासाची पायपीट करत..  आम्ही घनदाट अरण्यातून एका पठाराशी दाखल झालो.  तेंव्हा क्षणभर घेतलेली विश्रांती ..
 प्रति - 31

सोंडाई वेगळ्या अंगाने ...
 प्रति - 32
सोंडाई वेगळ्या अंगाने ..
























                   
पावसाळा असल्याने रानावनातील पायवाटांनी , आपलं अस्तित्वच  काही ठिकाणी पूर्णतः  मिटवलं होतं. त्यामुळे मार्ग काढत आम्ही योग्य ठिकाणी पोहचते झालो . आणि क्षणभर विश्रांती घेऊन असे विसावलो . सृष्टी सौन्दर्याचा नजारा डोळ्यात सामावून घेतं...

(समोर दिसतोय तो इर्शाळ सुळका ..)

  
               प्रति - 34
दोनच्या आसपास आम्ही  (वावरले )ठाकूरवाडी गावाशी होतो . तिथून पूढे अर्धा पाऊन  तास ..पावसाच्या संगीतानं ...ओलंचिंब होत ....काळ्या डांबरी रस्त्यावरंन हायवेशी स्थिरावलो. 

तिथून मग टमटम करत कर्जत .


















हा एकंदरीत आमचा प्रवास.. पावसाच्या संगीतानं त्याचं कृपेने  आनंदाने बागडत खेळत झाला.  
***************************************************************************88
सोंडेवाडीतून वर माथ्याशी जाईपर्यंत धो धो कोसळणारा हा वेडाळ पाऊस ..माथ्याशी  गेलो तेंव्हा अगदीच चिडीचूप म्हणजे शांत झाला होता. 
हि सारी सृष्टी हि जणू त्याच्या मोहरत्या स्पर्शाने धुंदमंद होंऊन डवरली गेली होती . मी हि आपला तो निवांत झाल्याने कॅमेरा च्या मोहात सृष्टीचे ते भाव चित्र सामावून घेतं होतो...
निसर्गाचीच हि उब मायेच्या ममत्वेसारखीच मायाळू असते बघा...

परतीच्या प्रवासातही वावरले ठाकूरवाडीपासून ते हायवेपर्यंत त्याने पुन्हा मुसंडी मारल्याने  आम्ही त्याच्याच मस्तीत दंग ओलेचिंब होतं आनंदात न्हाऊन गेलो.  सुखावलो . 



*************************************************************
एकूण खर्च प्रति व्यक्ती : २१० /- 
(अर्थात येताना ...व्हेज -नॉनव्हेज हे खाण्याचे प्रकार झाल्याने  खर्चात जरा वाढ झाली. )
टमटम (सात सीटर)  : कर्जत ते सोंडेवाडी - ३५०/- (एकूण प्रवाशी ७ ) 
लागणार वेळ : अर्धा पाऊण तास ..
सोंडेवाडी ते गडमाथा - १ तास 
गडमाथा ते पायवाट (सोंडेवाडी ते वावरले एकत्रित जुळणारी पायवाट  ) - पाऊण  एक तास 
पायवाट ते वावरले ( रानावनांतून  ) - २ तास 
वावरले (ठाकूरवाडी ) ते हायवे - पायपीट - एखाद तास 
वावरले (हायवेपासून ) - कर्जत ( टमटम ने ) 
प्रत्येकी १० रुपये ...

सहभागी मित्रावळीची नावे : यतीन 
कला 
रश्मी 
तेजा 
रोहन 
रुपेश 

आणि मी ....







(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे .  नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे.  

वेबसाईट : पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन



रविवार, ९ एप्रिल, २०१७

कावल्या बावल्या खिंड - ऐतिहासिक रणभूमी

 

 पहाटे चार च्या प्रहारास थंडगार झुळकेने जाग आली . मी खिडकीतून जरा बाहेर डोकावून  पाहिलं.
उजळ ताऱ्यांनी काळेभोरं  आकाश दिव्य शक्ती एकवटून जणू  नटून सजलं होतं. 
त्याने मन सुखावलं. 





















  दादर हुन रात्री साडे दहाच्या आसपास निघालेली  आमची  दुर्गवीरांची गाडी आता पाचाड हुन    पुढे सरली होती. आणि हळुवार एक पदरी कच्च्या रस्त्याने कावळ्या बावल्या खिंड  कडे तिची चाकं भिरभिरू लागली. त्याने तन- मन  अतिउत्साहिक नजरेने भोवताल परिसर न्याहाळू लागलं . रायगडाच्या प्रभावळीत आमचा केंव्हाच प्रवेश झाला होता. खुद्द रायगड/ दुर्गदुर्गेश्वर , आमचं प्रेरित स्थान , हृदयी मंदिर  ,आणि जिजाऊंचा  वाडा , हाकेच्या अंतरी होता. मनातूनच  कुर्निसात केलं. आणि इतिहासाची उजळणी करत , वळ्णावराचे घाट उतरत आम्ही ऐतिहासिक सांदोशी गावाशी पोहचते झालो.

पहाटे साडे चारचा तो प्रहर ..
गाडी एका ठिकाणी ,रस्त्या कडेला लावून धरली . एक एक  जण त्यातला पायउतार होतं. गावातल्या देवळाशी आता शिरू लागला. दिवस उजळण्यास , सूर्य देवतेचे आगमन  होण्यास , अजूनही दोन अडीच तासाचा अवधी होता. थकले भागलेले मंडळी विश्रंतीसाठी मिळेल त्या जागी पांघरून घेऊ लागले.  आणि काही जण मात्र देऊळा   बाहेर पडले. मोकळ्या उजळ भरल्या आकाशी .  नक्षत्रांचा  ते सुखद लेणं अनुभवण्यासाठी .  माझा हि त्यात समावेश होता .

रवळ्या जवळ्या  नंतर  जवळ जवळ तीन चार महिन्याने , मी असं सुख अनुभवत होतो. मोकळ्या आभाळाखाली  मी  एकटक उभा  होतो. चहू बाजूनी  सह्य कड्यांनी आपली टेहळणी  नजर एकजुटीने रोखत एक चौकट उभारली होती. हाती हात,  गुंफत साखळ दोरीनं , त्यांनी इथला परिसर  जणू आपल्या ताब्यात घेतला होता . त्यांच्या हा नित्यनेमाने सुरू असलेला जागर मनास भोवत  होता .  रात्रीच्या उजळ चांदण्यात अश्या पहाडी दृश्यांन  मात्र नजरेचं पारंण  फिटत होतं.   संमोहित व्हावं असाच काहीसा तो क्षण सुखदतेणे  गालाशी  हसत  होता. मनातूनच आरोळी फुटत होती. हरहर महादेव...जय शिवराय ..!

वसंत ऋतूच आगमन होऊन , दिवसाचे लोळ उठले होते .
उन्हाचे दिवस असल्याने पहाटेचा  गारवा  अंगा खांदयाशी  झुलू लागलेला.  मनाला शिवशिवत करत,  तो   हि हवा हवासा वाटतं होता. अवतीभोवतीच्या साऱ्या परिसराला त्याने आपल्या जादुई कुशलतेने व मायेच्या ममत्वेने थोपटवत जणू  शांत पहुडवल होतं. सारा परिसर अजूनही शांततेतं निवांत  निजलं होतं.
हसऱ्या उजळ ताऱ्यानी  मन मात्र एकीकडे मोहरत गेलं.  रायगडच्या  दर्शनांन ते अधिकच सुखावलं  जात होतं.  कोकण  दिव्याच्या पहाडी छातीनं अन   तिथल्या घडलेल्या अनन्य साधारण पराक्रमानं मनाभोवती प्रेरित वलय उमटलं  जात होतं . बस्स आता काही क्षणांचा अवधी बाकी होता. त्या जागेशी नतमस्तक होण्यास तन मन आतुरलेलं . कावळ्या बावल्या खिंड , तिथला रणसंग्राम अन ते एकूण वीर .....नजरेसमोर आपला पराक्रम दाखवून  देत होते . कोकणदिवा ते सर्व कथन करत होता. टप्प्याटप्प्याने .पहाटे पहिल्या  प्रहरी ...



कोवळं सूर्य किरण हळूहळू सर्वत्र निथळू  लागलं . पाखरांचं  किलबिलनं तर आधीच सुरू झालेलं. क्षितिजावरची काळोखी रेघ आता  उजळून तेजधुंद झाली  होती. दुर्गदुर्गेवर रायगड , कोकण दिवा , एकूणच सारा पट्टा प्रकाश गर्दीत न्हाऊन निघाला  होता.  ते पाहून

सुधीर मोघांच्या ओळी हळूच ओठी स्वराने गाऊ लागल्या .

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास....

सृष्टीच्या ह्या नवं लाईने   मन अधिक प्रसन्न झालं होतं.

  प्रति १ 
  उजव्या हाताला दिसतोय तो कोकण दिवा आणि खिंड आणि  गर्द झाडीत पहुडलेलं  सांदोशी गाव



गावातली थोरी मोठी माणसं  आप-आपल्या कामाशी हातभार लावत , मग्न झालेली दिसत होती.   आजचा दिनक्रमच  त्यांचा जरा वेगळ्या वहिवाटेवरचा  ठरला होता.  कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्रामात  वीरमरण आलेल्या त्या शूरवीरांना  अभिवादन करण्यासाठी,   आजची खास अशी मोहीम आखण्यात आली  होती. २६ मार्च हि तारीख इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदिवली  गेली. त्यालाच धरून , आजचा हा  कार्यक्रम होतं होता. त्यानिमित्तानेच  सारी व्यवस्था करण्यास त्यांचे हात एकत्रितपणे  जुंपले जात होते . सांदोशी गाव अभिमानाने पुरा एकवटला होता .  भगवं वादळ मना मनात मोठ्या  डौलाने अन अभिमानानं फडकत होतं. छत्रपती शिवरायांचा  गजर  मना मनातून उमटत होता .
आता वाट पायदळी घ्यायची होती इतकीच . तिथली माती ललाटी लावल्याची होती इतकीच....
बस्स काही क्षणाचा अवधी...

प्रति २ 
कोकणदिवा

दोन एक तासाच्या विश्रांतीतनंतर  शहराकडून आलेली मंडळी,  फ्रेश वगैरे होतं चहा नाष्टा  करण्यात मग्न झाली.  कांद्यापोह्याचा खमंग सर्वत्र असा  घमघमलेला. दुर्गवीरचे  संतोष दादा प्रेमानं आणि आवर्जून सर्वांची विचारपूस करत ,  कांदेपोह्याची थाळी हाती ठेवत होते. बस्स काही क्षणांचा अवधी आता  त्या रणभूमी कडे  रवाना व्हायचे इतकेच .

निघण्यापूर्वी दुर्गवीर चे अजित दादांकडून इथल्या  परिसराची अंत्यभूत माहितीची देवाणघेवाण  झाली.   आणि एकमेकांचा थोडक्यात परिचय सत्र घेत आम्ही सगळे कावल्या बावल्या खिंडीकडे  रवाना झालो.
****************************************************************
मळलेल्या पायवाटेतुन , लाल उधळ मातीतून पाउलं आता पुढे होऊ लागली. 
एक नवी ऊर्जाच जणू अंगभर संचारली होती प्रत्येकात.  पाउलं झपझप  करत पुढे पडत  होती .
सांदोशी गाव हि आता हळुवारं  नजरेआड होऊ  लागलं. रानावनातील  गर्द सावलीत आम्ही  प्रवेश करते झालो. उन्हाची पांढरुकी किरणं इंद्रधनूवानी जणू रंग बदलत , आकाशी उंचावलेल्या  वृक्षराजीतुन हळूच डोकावू लागली. आमचा मागोवा घेत जणू..., त्यांचा हि आपापसात लपंडाव सुरु होता.

इतरत्र पसरलेली 'सुकली पाने' मातीशी जिव्हाळ्याचं नातं सांगत 'प्रेममीठीने' पहुडली होती.
त्यावरून बळंच चालता चालता  नादब्रम्ह उमटू लागला. जवळ जवळ दोन एक तासांचं अंतर  कापलं गेलं होतं.
त्या 'पवित्र' ठिकाणी माथा टेकण्याचं केवळ क्षणांचा तो अवसर उरला होता .  
नजर आतुरलेली  ..स्वर चैन्याचा श्वास घेत .. इतिहासाची उजळणी करीत..
शरीर मात्र  घामजलेलं..काहीसं थकलेलं. 
घामाजल्या आणि थकल्या ह्या शरीरास , क्षणभर विश्रांती म्हणून थांबलो. नजर अवतीभोवती पसरली .

पहाडी छातीनं उभा ठाकलेला ‘कोकण दिवा’ ..गगनी उंचावला होता . आसपासच्या परिसरावर अजूनही जागता पहारा देत . आजही त्याच हे कार्य निष्ठेनं सुरु होतं. अन ते राहणार. काळ कितीही पुढे गेला तरीही.

"सह्याद्री नामा नग हा प्रचंड
हा दक्षिणेचा अभिमानदंड।
हाती झळाळे परशु जयाच्या..
स्कंधावरी दुर्गम दुर्ग तयाच्या...॥ 

उन्हाच्या तिरीप किरणांनं त्याचं  सौदर्य उजळून निघत होतं .   त्याकडे पाहता नजर आळवली गेली.
पहाडी मनाचा तो, आपलं सुख दुःख  मोकळ्या मनानं आता उघड करू लागला.
''आलात ..या...
केंव्हा पासून तुमची वाट पाहत होतो. आजोबांच्या सहवासात बागडायला अखेर आज वेळ मिळाला तुम्हास्नी, होय ना ? चला, आलात ते एक बरं केलंत... 
इतकं वर्ष मनाशी झाकोळलेला, एकवटलेला  हा इतिहास मला कुणाशी कथन करायचाच होता.  त्याला आज तुमची जोड मिळाली.
आजचा हा दिवस फार मोलाचा ..महत्वाचा. शूरत्वाचा , स्वराज्यातील निष्टेचा आणि प्राणप्रणाणे लढलेल्या त्या वीरांचा आहे . आजच्या ह्या दिवशीच  मराठ्यांच्या आपुल्या ह्या इतिहासात एक सुवर्णपान  सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलं . ते मला सांगायचं होतंच कुणाशी , तुम्ही आलात तर तुम्हास्नीच ते कथन करतो..चला..
मनात कुठेतरी असं संवादिक चक्र सुरु झालं.
तो इतिहास तो रणसंग्राम नजरेशी उतरू लागला. पायाखालची  वहिवाट हि आता अंतर ध्यानी झाली.


क्रमश :-
संकेत पाटेकर 
********************************************************************
 प्रति ३ 
 रम्य परिसर  

  प्रति ४
  दुर्गदुर्गेश्वर रायगड







































वेबसाईट : कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी


सोमवार, ९ जानेवारी, २०१७

रोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे

किल्ले घोसाळगड - तटबंदीयुक्त माची 
सालाबादप्रमाणे , म्हणजेच  नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या  कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात  , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा  वैभव लाभलेल्या आपल्याच  दुर्ग मंदिरात  , सह्य माथ्याशीच , त्याच्या सहवासात रंगून मिसळूनच होते.
नवी ऊर्जा ,  जगण्याची नवी प्रेरणा ,नवी उमेद हि ह्या गतवैभवातूनच सहजी  अशी मिळून जाते. 

यंदाचं म्हणावं तर हे वर्ष  देखील  असंच , २०१६ च्या डिसेंबर महिन्याच्या एक आठवडाभर आधीच एक दोन दिवसाची मोहीम आम्ही उरकली होती .  रवळ्या जवळ्या आणि  मार्कंड्या ...  त्यानंतर आठवड्या भरानंतर  लगेचच हि ..आमची पुढील  मोहीम....
किल्ले घोसाळगड आणि  कुडा लेणी ...

रायगड जिल्ह्यातील , निसर्ग संपन्न अश्या  , कुंडलिका नदीच्या सानिध्यात  नितळपणे खळखळत हसत असलेलं  रोहा , त्या जवळील हि  मुशाफिरी ...

दिवा -  सावंतवाडी : 
दिवा-सावंत वाडीच्या नेहमीच्याच वर्दळ असणाऱ्या गाडीने प्रवास करणं म्हणजे दिव्यत्वेचा साक्षात्कार जणू  ,   ह्याचा प्रत्यय तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलाच असेल  एकदा....

अफाट गर्दी , आणि त्या दिव्य अफाट  गर्दीतून मार्ग काढत , सुरू असलेली विक्रेत्यांच्या सामानांची खरेदी  विक्री,गोंगाट  जणू आक्खी ट्रेन हि  एक स्वतंत्र चालतं बोलतं मार्केटच आहे जणू  ,असा  भास नाही तर  प्रत्यक्षदर्शी जाणीव आपल्याला तिथे होते .
वेगवेगळ्या स्तरातील , आवाजातील  लयबद्द ,अभिनय अश्या शैलींनी सादर केलेली विक्रेत्यांची ती 'आरोळी' ...मनाला वेगळ्याच तंद्रीत, भावनगरीत  खेचून घेते . 
करमणूक तर होतेच पण त्या शब्दांची जादू ,  चेहर्यावरचे विविध रंगभाव ह्याकडे आपलं बारीकशी लक्ष लागून राहतं.  

कुणी 'शिरा उपमा कांदा पोहे' घ्या असं म्हणता म्हणता ..
''घाऊन घ्या ताई मी परत येणार नाही ..'' हे पुढचं वाक्य शक्कल लढवून सहज  बोलून  जातं. (आणि खरंच पुन्हा येत नाही )
कुणी , मामीने बनविलेले , चुलीवरचे  वडापाव , १० ला दोन असं म्हणतं , भाव खाऊन जातं .
कुणी बोरं घ्या, चमेली बोरं  म्हणतं,
कुणी कारली , मेथी पावटा , पासून , कचोरी भाकरवाडी , वेफर्स , ते गावठी केळी पर्यंत येऊन पोहोचतं. 
कुणी 'माझ्या तर्फे खाऊन घ्या, पैसे  अजिबात देऊ नका' इथपर्यंत मजल मारतं. 
तर कुणी आप आपसात 'आजचा दिवस जाऊ देत सोन्याचा , उद्याचा दिवस जाऊ देत चांदीचा' ...असं
गमतीनं, पण आपलेपणान  म्हणतं ..एकमेकांनच्या  व्यवसायाला हातभार लावतं. 
इतक्या भाव छटा , इतके भावतरंग , शब्दोली सहज आपल्याला ह्या दिवा सावंतवाडी प्रवासात  मिळून जातात.
असाच प्रवास करत आम्ही  रोह्याला पोहचलो . 


तेंव्हा साधारण पावणे दहा झाले होते. नित्य नेहेमीच्या दिनक्रमानुसार आजही  अर्धा पाऊण  तासाचा फरक पडला होता.  दिवा सावंतवाडी उशिरा  पोहोचली होती .
त्यामुळे आता घाई करणं आम्हाला  भाग होतं. पुढची मोहीम वेळेवर अवलंबून होती.
रोह्याला उतरून , लगेचच पायीच  आम्ही एसटी डेपो  गाठलं .
त्यात   कुंडलिका नदीचं सुंदर पात्र  अन गावाच्या वळणवाटेतून येता येता , चकचकीत अशी नवी कोरी भांडी दिसली ती  कॅमेरात बंदिस्त करून घेतली.


कुंडलिका ....























आणि एकमेकांकशी  चालता बोलता  पंधरा ते वीसेक मिनिटात , आम्ही एसटी स्थानकात दाखल  झालो .  पुढील पाच एक मिनिटात घोसाळगड मार्गी (मुरुड - भालेगाव ) जाणाऱ्या एसटीने ,

वळणावळणाच्या त्या हिरवाईने घेरलेल्या दाट  घाटवाटातून, (आंब्यांचे कलम , तंटामुक्त गाव  पाहत  ) आम्ही अर्धा तासात  घोसाळगड च्या पायथ्याशी पोहोचलो .  समोरच हिरवाईने वेढलेला सुंदरसा छोटेखानी किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आम्हाला साद देत होता. 
क्रमश : 

--------------------------------------------------------------------

कुडा लेणी ...
 





 


 

वेबसाईट : रोह्यातील मुसाफिरी – किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे

रवळ्या जवळ्या - मार्कंड्या अन...

रवळ्या जवळ्या वरील मंतरलेली रात्र अन मार्कंड्या च अध्यात्मिक महात्म्य... 

(रवळ्या जवळ्या पठारावरून , किल्ले जवळ्या कडे प्रस्थान करताना , नजरेत भरलेला राजबिंडा असा देखणा धोडप किल्ला ...)




नाशिक हे माझं सर्वात आवडतं ठिकाण ,
ते त्याच्या उंचच उंच अश्या कातळकोरीव रौद्र भीषण पण तितक्याच सौन्दर्यपूर्ण अश्या सह्य कड्यांमुळे, ऐतिहासिक तसेच पावित्र्य अश्या अध्यात्मिक महतीमुळे..
गेले दोन दिवस अश्या ह्या आपल्या सह्य मंदिरात आम्ही मुक्काम धरून होतो.
रवळ्या जवळ्या पठारावरील लुकलुकणाऱ्या असंख्य तारका समूहा सोबत , त्या नभो मंडळात , गूढ अश्या शांत वलयात अनुभवलेली/ मंतरलेली ती रात्र , कदापि विसरता येणार नाही. 
तारका समूहांच ते पांघरून अंगावर घेऊन निजनं किंव्हा नजर उघडी ठेवत नक्षत्रांच ते देणं अनुभवणं ह्यासारखं सुख नाही.
भर दिवसा अन सांज समयी , रवळ्या जवळ्या वरील गूढ वलय, तो सौम्य(आनंद देणारं) थरार , त्या वास्तू अन एकूण रम्य असा सभोवताल... मन अगदी प्रसन्नतेत खळखळत होतं.

वणी दिंडोरी/ कांचंनबारी ची लढाई मनाच्या तळघरात दौड करत होती.
भेटलेले गावकरी ,अध्यात्मिक गुरू , त्यांच्या सोबत जुळलेली आपलेपणाची नाळ, अन सप्तशृंगी मातेचं दैवी वलय मनाला एक आगळं वेगळं वळण देत होतं.

नाशिक ची सौन्दर्य सृष्टी अन ऐतिहासिक , अध्यात्मक दृष्टी हि अंतःकरण उजळून देणारी आहे.
महिपत सुमार रसाळ ह्या त्रिकुटा नंतर ह्या वर्षाअखेरीसच हे त्रिकुट आमच्या साठी अविस्मरणीय असंच ठरलं.
मित्रावळ , मित्रावळातील संघटन अन प्रेम असंच चीरतरुण राहो...
लवकरच इतर फोटोस अपलोड करेन, अन विस्तृत असं (ब्लॉग) लिहेनच...

    
     (मार्कंड्यावरून ...सप्तशृंगी दर्शन ..)
























वेबसाईट : रवळ्या जवळ्या – मार्कंड्या अन…