बुधवार, ४ एप्रिल, २०१२

कळसुबाई ट्रेक - माझ्या शब्दात


"मनात केंव्हा पासून इच्छा होती' महाराष्ट्रातील सर्वात उंच , महाराष्टाची शान असलेला ''कळसुबाई शिखर सर करायचा. आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरच खूप अभिमान वाटतो आहे.
प्रत्येक ट्रेकर्स च स्वप्न असत महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपल पाउल ठेवायचं .

दिनांक ८/3/२०१२ म्हणजे गुरवार, होळीचा दिवस माझे दोन खास मित्र 'हेमंत कोयंडे' आणि 'ओंकार कदम' हे सहजच म्हणजे भेटण्यास अन ट्रेक विषयक बोलण्यास घरी येणार होते. घरातले सर्वजण त्यादिवशी दुपारीच गावी गेले होते, त्यामुळे घरी मी एकटाच होतो.
मित्र येणार म्हणून घरातील इतरत्र पसरलेल्या वस्तू आपआपल्या जागी ठेवत त्यांच्या येणाची मी वाट पाहत होतो. रात्री उशिरा १०:३० दरम्यान हे दोघे मित्र आले. आणि आमच्या गप्पांना उत आला. त्यामध्ये 11:३० झाले तेच कळलंच नाही.

घरातून निघताना हेमंत ने सहजच ''कळसुबाई ट्रेक' करण्याविषयी सांगितल '' आणि त्याच्या त्या सांगण्याला मी लगेचच होकार देखील देऊन टाकला. खर तर मी प्रबळगड किंवा घनगड करायच्या विचारात होतो. पण कळसुबाई च नाव येताच बाकी विचार मनातून काढून टाकल. कारण महाराष्ट्रातील ह्या सर्वात उंच शिखरावर जाण्याची केंव्हा पासून माझी इच्छा होती. आणि ती इच्छा आता पूर्ण होणार होती.

कळसुबाई शिखरावर शिक्कामोर्तब करून झाल्यावर त्याविषयी माहिती वगैरे गोळा करण्यास सुरवात मी केली .
सर्वप्रथम आमचा ग्रुप लीडर '' निलेश हळदणकर' ह्याला फोन करून माहिती मिळवली.
आणि त्यानंतर इंटरनेट च्या माध्यमातून अनेकांचे ब्लोग वाचून त्याविषयी माहिती मिळविली.
ह्या इंटरनेट ब्लोग चा खरच खूप उपयोग होतो.
कुठे अनोळखी ठिकाणी जात असता हे अनेकांचे ब्लोग आपल्याला खरच मार्गदर्शक ठरतात.

ट्रेक च्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी सर्व माहिती वगैरे मिळवून मी आणी माझे मित्र हेमंत, ओंकार , लक्ष्मन , किशोर, आम्ही कळसुबाई सर करण्यास सज्ज झालो.

ठाण्याहून रात्री १२:१० मिनिटांनी सुटणारी अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून आम्ही प्रवास करणार होतो. ठरल्याप्रमाणे सारे एकत्र आलो आणि अमृतसर एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशनला ठीक पहाटे २:३० ला पोहोचलो. ते श्वास मोकळा सोडूनच. डब्यामध्ये पाउल ठेवण्यासही जागा न्हवती. कसे डब्यात आम्ही शिरलो ते आमच आम्हालाच माहित. कोण एका पायावर उभा होता .त कोण कसा नि कसा वर्णन नाही करू शकत. त्यात पण एकाची धुलाई चालू होती. ठाण्यात दरवाजा उघडला म्हणून त्याला बिचार्या त्या म्हाताऱ्या (इतका हि न्हवता म्हातारा ) व्यक्तीला मारहाण चालू होती, खर तर त्या व्यक्तीमुळे आम्हाला आत शिरता आल. दरवाजा उघडला म्हणून .....नाहीतर सर्व पुढचा प्लान चौपट झाला असता.

असो , सुरवातीचाच प्रवास आमचा असा दमछाक करणारा झाला. पुढे इगतपुरीला उतरून आम्ही गरमा -गरम वडां पाव अन कांदाभजी फस्त करून ५-१० मिनिटे आराम करून इगतपुरी एसटी डेपोच्या दिशेन वाटचाल करू लागलो.
इगतपुरी स्टेशन च्या पश्चिमेला डांबरी रस्त्याने रेल्वे रुळाच्या समांतर नाशिकच्या दिशेने ५-१० मिनिटावर एसटी डेपो आहे.
रस्त्याने जात असता आपणास एक सुंदर देऊळ लागत. त्याच्या थोड्या पुढेच हा एसटी डेपो आहे .
नाव गाव काही नाही. सुरवातीला आम्हाला कळतच न्हवत. हाच आहे का डेपो ते .नूतनी करणाच काम हाती घेतलं असाव बहुदा.
सकाळी ५:०० ची पहिली एसटी आहे हे मी नेट वरूनही माहिती करून घेतलं होत.
पहाटेचे ३ वाजून ५ मिनिटे झाली होती अजून २ तास आम्हाजवळ होते. त्यामुळे आम्ही मस्तपैकी ताणून दिली म्हणजे झोपी गेलो. पण तेही काही वेळेसाठीच कारण राक्षस मच्छरांनी त्रास देण्यास सुरवात केली होती.आणि थंडीचा पारा देखील हळू हळू वाढला होता , मग झोप कसली येते.
पहाटेचे ५ वाजून गेले होते आता नि अजून एस टी चा पताच न्हवता. ५ चे ५:३० झाले तरीही नाही.
आम्ही मग कुठे चहा मिळतोय का ते पाहण्यसाठी निघालो नि एस टी डेपोच्या बाहेरच एक चहा च छोटास दुकान दिसलं. त्या कडकडीत थंडीत आम्हाला चहाची नितांत गरज होती. गरमा गरमा चहा पिऊन झाल्यावर १-२ मिनिटातच म्हणजेच ठीक ५:४५ मिनिटांनी आमची म्हणजेच बारी गावाकरिता बारीगाव दिशेने जाणारी एसटी stand समोर उभी होती.
पटापट एस टी मध्ये बसून निसर्गाच ते पहाटेच डोंगर दर्याचं सुंदर रूप पाहत पाहत आम्ही बारी गावात उतरलो ते ठीक ६:४५ मिनिटांनी .



सुरवातीची रस्त्यालगतची ती पाटी आमचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी सज्जच होती.
कळसुबाई शिखर - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर १६४६ मीटर . त्या पाटी जवळ ग्रुप फोटो काढून आमची पाउल बारी गावाच्या दिशेन कळसुबाई कडे पुढे पुढे सरसाऊ लागली.
वाटेत जाताना रस्त्याच्या उजवीकडे एक छोटस मंदिर दिसलं त्याच्या शेजारी काही दगडी शिल्प होती. ते सर्व कॅमेरा मध्ये कैद करून पुढे जात असता एक मोठी विहीर लागली.
गावातल्या काही काकू काकी मावशी पाणी भरत होत्या . त्यांच्या कडून आम्ही आमच्या रिकाम्या बॉटल्स भरून घेतल्या. आणि पुढे सरसावलो.

काही वेळाने गावातून जात असताना एका दुकाना शेजारी काही विरगळ दगडी शिल्प दिसली .त्या शिप्लान्चा अर्थ मात्र समजू शकलो नाही .त्याचे फोटो काढून आम्ही पुढे जावू लागलो . आता आमच्या सोबत आणखीन एक नवीन पार्टनर सहभागी झाला होता तो म्हणजे रामू (गावातील एक प्रामाणिक कुत्रा )



आता कुठे चढण सुरु झाली होती. आणि सूर्यदेवाच हि आगमन झाल होत. आम्ही एक एक पाउल झप-झप पुढे पुढे टाकत मार्गीक्रमण करत होतो.

सकाळी ६:४५ ला आम्ही बारी गावातून सुरवात केली ते ठीक १०:३५ मिनिटाने आम्ही कळसुबाई ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पोहोचलो. एखाद्या लढाईत विजय मिळाल्यावर जो आनंद मिळतो. तसाच काहीसा विजयी आनंद आम्हाला झाला. वर येताना चार लोखंडी शिड्या लागल्या त्यातील तिसरी शिडी एका उंच अवघड वाटेवर आहे.


आणि ती बरीच लांब आहे. चौथी शिडी हि आपणास कळसुबाई मंदिरा जवळ नेते . मंदिरा शेजारीच एक लाब लचक लोखंडी साखळी अशीच खाली सोडून दिली आहे. ती ओढण्याचा आम्ही प्रत्येकाने पर्यंत केला . अस ऐकल आहे कि ती साखळी जो पूर्ण वर पर्यंत ओढतो त्याची इच्छा पूर्ण होते . 
(आता ते खर कि खोटं ते माहित नाही )





























कळसूआईच दर्शन घेत , आम्ही सर्वांनी ती साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात फक्त ओमकार नि पूर्ण वर पर्यंत साखळी ओढली . साखळी ओढण्याचा कार्यक्रम झाल्यावर अवतीभोवती च डोंगर दर्याचं ते सुंदर रूप डोळ्यात सामावून नि कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही तिथे असलेल्या मुलांन कडून लिंबू पाणीचे दोन ग्लास प्रत्येकी प्राशन करून थोडा वेळ विसावलो .


दुपारचे आता ठीक बारा वाजले होते . सूर्य हि माथ्यावर आला होता. आता निघायला हव होत. कारण वेळेच्या आत घरी परतून दुसर्या दिवशी (मी सोडून)प्रत्येकाला कामावर जायचं होत . त्या ह्याने मी बाकीच्यानां उठवलं. कळसू आईला प्रणाम करून बारी गावाच्या दिशेने त्याच लोखंडी शिडी मार्गे आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
साधारण २:३० पर्यंत आम्ही बारी गावात उतरलो. आमच्या सोबत कळसुबाई शिखर सर करणारा रामू ह्याचा निरोप घेऊन आम्ही काळ्या निळ्या जीपने शेंडी गावात आलो . बारी ते शेंडी हे साधारण २० मिनीटाच अंतर आहे . प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे काळ्या निळ्या जीपने इथवर येता येत. इथून पुढे काही अंतर चालत गेल्यावर भंडारदराच विहंगमय सुंदर अस रूप आपणास न्हाह्यालाता येत. त्याच बरोबर बोटिंगची हि मजा लुटता येते एका फेरीची २०० रुपये .
आम्ही साधारण दुपारी ३:०५ दरम्यान शेंडी गावात उतरलो . सकाळपासून फक्त चटर फटर जे घरून आणल होत त्यावरच आम्ही आमची भूख भागवत होतो . शेंडी गावात उतरताच अगोदर पोट पूजा उरकून घ्यायचं ठरवलं नि त्याप्रमाणे एका हॉटेल मध्ये जावून बसलो , गरमा गरम मेंदू वडा, वडा उसळ , पाव भाजी आणि सोबत कॉल्ड ड्रिंक्स वर ताव मारत आमची भूख आम्ही शामिवली .
शेंडी गावातून संध्याकाळी ५ ची कसारा करिता एसटी आहे. पण ती वेळेवर कधी असते किंव्हा नाही आणि आलीच तरी त्या मध्ये बसण्याकरिता जागा मिळेलच अस नाही . कारण येताना भरगच्च भरूनच ती येते शेंडी गावातून काळी निळी (काला नीला रंगाचा पट्टा म्हणून काळी निळी ) जीप देखील आहे ती तुम्हाला घोटी गावापर्यंत नेते . प्रत्येकी २५ ते ३० रुपयांमध्ये . तिथून पुढे मग एसटी ने कसारा गाठता येत.

आमची पोट पूजा उरकून वेळ अधिक असल्यामुळे आम्ही भंडारदरा Dam च्या दिशेने निघालो.

गावात रविवारचा बाजार भरला होता. त्यामुळे रस्त्यावर माणसाची वर्दळ होती . बाजारातील एक एक वस्तू पाहत पाहत आम्ही भंडारदरा Dam वर पोहचलो. भंडारदरयाच ते भव्य मोहक रूप पाहून माझ मन आवरेना मी लगेच मित्राला माझा एक फोटो काढण्यास सांगितल .


उन्हाची ती पांढरी शुभ्र किरण आणि जलाशयातील ते निळेशार तरंगमय पाणी यांच्या संगमाने डोळे दिपवून जात होते . समोरच रतनगड खुणावत होता . काही वेळ आम्ही तसेच स्तब्ध उभे होतो निसर्गातील ते रमणीय दृश्य पाहत .
मग हळू हळू आमचे पाउल त्या किनार्याकडे जावू लागले , समोरच एक प्रवाशी बोट जलाशयाची एक रमणीय फेरी मारून परतत होती . आम्ही काही वेळ जवळील कातळा जवळ बसलो , निखळ स्वच्छ निळेशार ...पाण्यातल ते आपल स्वतःच प्रतिबिंब पाहत . ..

काही वेळाने घड्याळाकडे लक्ष गेल, सायंकाळचे चाडे चार वाजले होते मग काय आमची पावलं पुन्हा झप झप त्याच मार्गे शेंडी गावातल्या एस टी स्टेन्ड जवळ येऊन थांबली .
५ वाजता कसारा साठी एस टी आहे हे आम्हाला बर्याच लोकां कडून कळल होत म्हणजे विचारपूस करतेवेळी.
परतीचा प्रवास म्हणजे मरगळ एक प्रकारची ....हा परतीचा प्रवास नेहमीच नकोसा वाटतो .
५ ला येणारी कसारा एस टी येता-येता पावणे सहा झाले. एस टी येते कि नाही ह्याने आमचा जीव खाली वर होत होता कारण दुपारी ३ वाजल्यापासून आम्ही शेंडी गावात होतो . आणि लवकरात लवकर घरी परतायचं होत . एव्हाना आमचा चहा पाण्याचा कार्यक्रम देखील उरकला होता.

एसटी समोर येताना दिसताच सारे जण आप आपल्यां साधन सामुग्रीनिशी सज्ज झाले. एका नव्या युद्धा साठी. हो नवं युद्धच कारण कासारया पर्यंत प्रवास करणारे प्रवाशी खूप होते. आणि एस टी हि येताना अगोदरच प्रवाशांनी भरून आली होती . त्यामुळे एस टी मध्ये उभं राहण्याकरिता जागा मिळण फारच मुश्कील झाल होत. नि आम्हाला काही हि करून ती एस टी पकडन भाग होत .
कसे बसे धक्का बुक्की करून बऱयाच हाल अपेष्टा सहन करत आमचा प्रवास झाला तो सगळा उभ्यानेच .


रात्री ८:०५ च्या दरम्यान आम्ही कसारा रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलो .
८:१५ मिनिटांनी CST करीता जाणारी ट्रेन फलाटावर उभीच होती. हेमंत ने पटापट रेल्वे तिकिटे काढली आणि धावत पळत पुन्हा आम्हास ती ट्रेन पकडावी लागली . आणि तिथून मग सगळे आप आपल्या घरी परतले .
आजचा कळसुबाई ट्रेक खरच अविस्मरणीय असाच होता . तो कायम लक्षात राहील माझ्याही आणि माझ्या मित्रांच्याही !!




संकेत पाटेकर
०४ एप्रिल २०१२
  
खर्च आणि वेळ :
1) ठाणे ते इगतपुरी (अमृतसर एक्स्प्रेस ) साधारण डबा
वेळ :- १२:१० pm ते २:३० am
३५ रुपये प्रत्येकी
2) इगतपुरी रेल्वे स्टेशन ते इगतपुरी डेपो (पायी चालत )
वेळ : २:५० ते ३:०० am
3) इगतपुरी डेपो ते बारी गाव (ST)
वेळ: ५:४५ am ते ६:४५ am
4) बारी गाव ते कळसुबाई माथा
वेळ:- ६:४५ ते १०:३५
5) कळसुबाई ते बारी गाव
वेळ:- १२:१५ pm ते २:३० pm
6) बारी गाव ते शेंडी
वेळ :- २:४५ pm ते ३:०५ pm
जीपने - १० रुपये प्रत्येकी
7)शेंडी गाव ते कसारा (ST)
वेळ:- ५:४५ ते ८:०५
8) कसारा ते ठाणे (लोकल ट्रेन)
वेळ:- ८:१५ ते



मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

सांदण दरी - माझा अनुभव

SANDHAAN VALLY - माझा अनुभव





































दोन दिवसाचा SANDHAAN VALLY प्रवास खरच खूप भन्नाट झाला , अजून अंग दुखतंय ,
पूर्णतः त्या VALLY तून प्रवास झाला , एक रात्र त्या VALLYT काढली, टपोर चांदण्यात , मन
कस खुश झाल, नाहीतर आपल त्या घरात कसल काय दिसतंय चांदन ?
कॉंक्रीट च छत ते , त्यात कुठे काय दिसणार ?
घराच छत कस चांदण्यांनी भरलेलं असाव , सुंदर काळे - निळे ढग , चांदो मामा, लुक लुक नारे तारे , सार काही दिसावं त्या छता मधून ...........
शनिवारी सकाळी ठीक ८ वाजून १५ मिनिटांनी आमचा प्रवास सुरु झाला.
वर उंच उंच कडे ...खाली लहान मोठाले दगड - मधेच कुठेतरी कमरे इतक पाणी, आणि त्या पाण्यातून डोक्यावर SACK घेत पुढे पुढे मार्ग काढणारे आम्ही....सार काही कस निराळाच ,मनाला ताज तवान करणार , हूरहुरी आननार ,
मधल्या त्या बेअर ग्र्यल्ल्स ची आठवण करून देणार , भन्नाट एकदम ..!!



VALLY उतरताना आम्हास तीन ROCK PATCH उतरावे लागले , ROPE च्या सहायाने , त्यातल्या दुसरा ROCK PATCH उतरताना मी दगडावर आदळलो, (दत्ता ने सांगितल होत कुठेही पाय ठेवू नको सरळ पाय खाली टाक म्हणून कुठेही पाय न टेकवताच ....सरळ धुडूम ) थोडी फार हाताला जखम करून घेतली. ...बस तितकंच,

VALLY च ते सुंदर दृश्य मनाला मोहित करत होत. निसर्ग हा निसर्ग खरच किती सुंदर आहे विविध अंगांनी तो फुललेला आहे. त्याच रुपच किती अनोख आहे , नुसत पाहत राहावं , त्याकडे टक मक टकमक बस , अप्सरा देखील त्याच्या पुढे मान झुकवेल आपली अस त्याच ते भव्य मनमोहक रूप मनाला एकदम फ्रेश करत.
निसर्गाशी खरच जवळीक साधावी , त्याच्याशी बोलाव , त्याकडून शिकावं , खूप काही दडलंय त्यात ,

सायंकाळी आम्ही दरी उतरलो आणि एका ठिकाणी थांबायचं म्हणजेच रात्र तिथे काढण्याच ठरवलं ,
त्या प्रमाणे एक जागा निवडली , आणि तिथे लाकड वगैरे गोळा केली, आणि प्रत्येकाच्या SACK मधील जेवनाच सामान बाहेर काढू लागलो , रात्रीच जेवण जे बनवायचं होत.
हळू हळू काळोख वाढू लागला तसं तसं थंडी हि वाढू लागली होती ,

जेवनाच सामान एकत्र करून जेवण हि तयार झाल .....आणि मग मस्त पैकी आमटी आणि भाताच चवदार एक एक घास पोटात जावू लागला . खूपच चवीस्ट स्वादिस्त जेवण केल होत.
पोट कस तृप्त झाल.
जेवून खावून रात्री टपोर्या चांदण्या पाहण्यात मी हरवून गेलो , आणि तिथेच झोपी हि गेलो ,
पहाटे लवकरच जाग आली तेंव्हा सारे कसे शांत झोपले होते.. थंड गार वारा सोडून, पाण्याचा खल खालाट आवाज (पुढे एक तलाव होता )सोडून कसलाच आवाज येत न्हवता .
मी थोडा वेळ उठून बसलो , आणि ते निसर्गाच रात्रीच मोहक रूप डोळ्यात साठवू लागल, असे हे क्षण क्वछितच येतात.
सकाळच मस्तपैकी पाय घसरून दगडावर पुन्हा आपटलो , आणि दुसर्या हाताला जखम करून घेतली, (ह्या वेली ब्रश करण्याकरीता गेलो होतो आणि चुकून पाय ओलसर जागेतून घसरला ).

कडक चहा - आणि चाविस्त फोडणीच भात खावून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला ,
आणि आमचा हा ट्रेक .........यादगार झाला ,
संकेत य. पाटेकर
दि. १९.१२.११




ट्रेन मधले आम्ही ..


Gang:-


मी आणि माझी बहिण ..


पाण्यातली वाट ...


चिडवताना ...दीप्ती


छोटे मोठे दगड धोंडे ...त्यातून मार्ग काढताना..


Rappelling Karatanaa....mi





मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

तोरणा

तोरणा ट्रेक अनुभव :- दि :- १०-११ डिसेंबर


















काही दिवसांपूर्वी ठरवल होत....१० डिसेंबर ला नाणेघाट ला जायचं, त्याप्रमाणे माहिती काढत होतो, काही मित्रांना वगैरे सांगून पाहिलं,त्यांनी सांगितल कि जाताना तुम्ही जाऊ शकाल ,पण येताना st. वगैरे मिळणे मुशकील होईल. 'स्वताहाच वाहन असेल तर उत्तम... आम्ही st ने जाणार होतो, त्यामुळे सकाळी लवकर जावून रात्री पर्यंत आम्हाला घरी परतायचं होत....., स्वताहाच वाहन हि न्हवत , त्यामुळे तेथे जान रद्द केल.
एक एक दिवस पुढे जात होता. आत्ता फक्त ४-५ दिवसच शिल्लक होते, अजून आमचा ट्रेक final झाला न्हवता, माझ्या मनात २, ३ किल्ले होते, त्यातला तोरणा हा किल्ला पाहायचं मी ठरवलं. पण तो एका दिवसात करता येईल का ? हा प्रश्न मनात घोळू लागला
कुठेही जाण्या अगोदर मी नेत वरून ...पुस्तकातून अनेक ब्लोग वाचून त्या संबंधित माहिती काढतो ....आणि मगच पुढे जाण्याच निच्छित करतो. आणि किल्ल्यावर जाताना त्या किल्ल्याची माहिती असंन गरजेच आहे. नुसतं नावाला जायचं म्हणून किल्ल्यावर कृपया जावू नये. तोरणा किल्ला सर करायचं अस मी मनात ठरवून टाकल. आणि त्याप्रमाणे तिथे जाण्या विषयी माहिती गोळा केली.
रात्री ११ वाजून २० मिनिटांनी ठाण्याहून सुटणारी सीद्धेश्वर एक्स्प्रेस पकडायची अस मी ठरवलं. आणि त्या प्रमाणे शनिवारी रात्री आम्ही निघालो. ठाण्याहून आम्ही ५ जण होतो, मी ,लक्ष्मन , किशोर , मिलिंद , आणि अंकुश, पुण्याहून दोघे मित्र येणार होते ....ते सकाळी स्वारगेट ला भेटणार होते.
ठरल्या प्रमाणे सिद्धेश्वर एक्स्प्रेस ने आम्ही निघालो. reservation न्हवत त्यामुळे general डब्यातूनच प्रवास करावा लागला. तो हि उभ्याने पुणे स्टेशन येई तोपर्यंत. त्यातही लोकांची उभं राहण्याकरिता, बस्न्याकारीता भांडण सुरु होत. मारा मारी पर्यंत मजल गेली होती. मुंबई तली ती आपली लोकल ट्रेन परवडली. तिथे चौथ्या seat वर जागा तरी मिळते बसायला आणि passage मध्ये लोकांना उभं हि राहता येत. पण ह्या मेल मध्ये इकडच तिकडे अजिबात कोण होत नाही. जो तो आपल्याला राजा समजतो. इतकी लोक रेंगाळत उभी असताना. पाय ठेवण्यास जागाही नसताना. थोडी तरी दया माया दाखवावी ह्याच काही नाही. अडीच - पावणे तीन दरम्यान आम्ही पुणे स्टेशन ला उतरलो. ते श्वास मोकळा करून. खूप बर वाटलं. ३ तास उभ्याने प्रवास केला कस ते आम्हालाच माहित.
थोडस फ्रेश होवून आम्ही पुणे st डेपोत पोहोचलो. तिथे चौकशी केली, तेंव्हा समजल कि सकाळी ६ वाजता वेल्हे करीता पहिली st आहे. पहाटेचे ३.१५ झालेले. वेळ मुबलक होता आम्हाजवळ. पण लवकरात लवकर आम्हास वेल्हे ह्या गावी पोहोचायचं होत. कारण तिथे पोहोचण्यास आमचे दोन तास जाणार होते.
अन पुन्हा तेथून गडावर पोहोचण्यास दोन ते अडीच तास जाणार होते. गडावर फिरण्यास ३ तास आणि पुन्हा उतरण्यास तितकाच वेळ. आणि शेवटची st वेल्हे गावातून सायंकाळी ५ ची. त्यामुळे सकाळी लवकरात लवकर वेल्हे गावात पोहचण काहीही करून आम्हाला इष्ट होत.
मग जवळच असलेल्या हॉटेल मध्ये जावून गरमा गरम चहा प्यायलो. आणि पुढे स्वारगेट ला जाण्याच ठरवलं. सकाळचे ३:३० वाजले होते. त्यामुळे रिक्षा शिवाय पर्याय न्हवता. पुणे ते स्वारगेट त्यांनी आम्हा कडून दोन रिक्षा चे १६० रुपये आकारले. अगोदर १८० सांगितले होते. पण आम्ही येत नाही पाहून अवघे वीस रपये कमी केले . आम्हाला देखील लवकर जायचं होत. आणि दुसरा काही पर्याय न्हवता. त्यामुळे जाणं भाग पडल.
स्वारगेट ला गेल्यावर चौकशी केली . तेंव्हा कळलं कि ६:३० ची स्वारगेट - धिसार ST आहे. आम्हा कडे २ तास होते. आणि दोघे मित्र हि भेटणार होते. स्वारगेट पासून अवघ्या ३ किलो मीटर वर त्यांच घर होत. त्यामुळे त्यांच्या घरी जावून फ्रेश वगैरे होण्याच ठरवलं.
मित्राच्या घरी थोड आराम करून चहा वगैरे घेऊन , आम्ही पुन्हा स्वारगेट ला ६:३० च्या अगोदर येऊन पोहोचलो.
मिनिट काटा पुढे पुढे धावत होता, तास काटा हि हळू हळू पुढे पुढे सरसावत होता. पण ह्या ST चा अजून पत्ता न्हवता. ६:३० चे 7 झाले, ७ चे ७;३० , पावणे आठ होत आले तरी ST नाही. वेळ खूप महत्वाची होती. कारण घरी आम्हास परतायचं होत. एक माणूस आम्हा जवळ येऊन विचारू लागला कुठे जायचं आहे म्हणून ? आम्ही सांगितल वेल्हे ला , तो म्हणाला मी सोडतो तुम्हाला प्रत्येकी ६० रुपये होतील . चालेल तर बघा?
आम्ही थोड विचार करून म्हटल अजून १५ मिनिटे थांबूया. आठ वाजेपर्यंत वाट पाहुया ST ची . मग काय ते ठरवू नंन्तर . ८ वाजले होते. आणि तेंव्हाच कोणाची तरी हाक ऐकू आली वेल्हे ST आली ते. पटापट सारे जण ST त चढलो. म्हटल नशीब आली एकदाची ST
आता खरा प्रवास सुरु झाला आमचा. ७ तिकिटे घेतली ३२९ रुपये . प्रत्येकी ४७ रुपये. प्रत्येकाने विंडो सीट पकडल्या होत्या , आणि सारे बाहेरील दृश्य पाहण्यात मग्न होते काही वेळाने ST ने पुणे सातारा एक्स्प्रेस हायवे क्रोस केला. आणि ST नरसापूर मार्गी पुढे पुढे धावू लागली. काही वेळ गेल्यावर अनेक डोंगर रांगा दिसू लागल्या. .. आणि पुढे राजियांचा गड '' गडांचा राजा '' राजगड '' ह्याच सुंदर मनमोहक दृश्य समोर दिसू लागल. मन स्वतःशीच म्हणू लागल .
हाच तो गड , जिथे महाराज २५ वर्ष राहिले , इथूनच त्यांनी अनेक मोहिम्या आखल्या. इथूनच त्यांनी अफजल खान विरुद्ध मोहीम आखली. हाच तो गड, हाच तो पवित्र गड, हीच ती स्वराज्याचाची पहिली राजधानी. ''राजगड.'' डोळे दिपवून गेले, मन हर्षून गेले.
पुढे काही वेळाने आम्ही जिथे जाणार होतो. तो गड '' म्हणजेच तोरणा ' स्वराज्याच तोरण '' शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जो गड आपल्या ताब्यात घेतला. आणि स्वराज्याच तोरण बांधलं.
तो तोरणा किल्ल्याच मन मोहक दृश्य समोर दिसू लागल. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा . महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.
सकाळी ठीक १० वाजता बरोबर २ तासांनी आमची ST वेल्हे गावात पोहोचली. गावात हॉटेल्स बरेच आहेत. त्यामुळे जेवणाची वगैरे व्यवस्था इथे होते. आम्ही स्वारगेट हूनच काही पदार्थ घेतले होते जेवणाकरिता, त्यामुळे इथे काहीहि न घेता. सरळ गडाच्या दिशेने मार्गी क्रमण करू लागलो.
सरळ सोपी वाट आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा इथे प्रश्न येत नाही. वाटेत एक फलक तोरणा किल्ल्याविषयी माहिती दर्शवित होता.तो वाचत पुढे सरसावलो. पुढे एका वळणावर रहाट असलेली एक विहीर दिसली ,काही बायका माणस तिथे पाणी भरत असताना दिसले...तिथून पुढे पुलावरून जी वाट जाते ती आपल्याला थेट गडाच्या बिनी दरवाज्यापर्यंत नेते. सरळ सोपी वाट आहे.
वाटेत पुढे काही अंतर पार केल्यावर काही पायर्या लागतात . त्या रेलिंग च्या सहाय्याने चढून आपण एक एक पाऊल पुढे टाकू लागतो. तोच समोर नयनरम्य धबधबा लागला (आम्ही गेलो तेंव्हा कोरडा होता ) . तिथे फोटो सेशन झाल्यावर आम्ही थोड्याच वेळेत बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचलो. १ तास ४५ मिनिटे इतका अवधी आम्हास लागला. बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचण्यास. वेल्हे गावातून बिनी दरवाजा पार केल्यावर गोमुखी पद्धतीचा कोठी दरवाजा लागला. ..आणि गडाच्या अंगणात आमचा प्रवेश झाला. डाव्या हाता कडे वळून आम्ही एक एक वस्तू पाहत पाहत ''दारू कोठार'' जवळ आलो. आणि तेथून मग बुरूजा जवळ. बुरुजावरून झुंजार माचीच सुंदर रूप आपल लक्ष वेधून घेत. राजगड च सुंदर मनोरम्य दर्शन सुद्धा येथूनच होत.
झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर. इथून राजगड च रूप आणि आजूबाजूचा परिसर न्ह्याहालत आम्ही झुंजार बुरुजाजवळ आलो. इथे काही वेळ बसून आम्ही निघालो ते थेट मेंगाई मंदिर च्या दिशेने . इथे आपली राहण्याची व्यवस्था होते. मंदिराच्या समोर एक छोटस गणेश मंदिर हि आहे . मेंगाई देवीच दर्शन घेऊन आम्ही एक एक पाऊल पुढे टाकू लागलो.
घड्याळाचे काटे कसे पटापट पुढे पुढे पडत होते . दुपारचे तीन वाजले होते. अजून दोन तासांनी म्हणजेच ५ वाजता गावातून शेवटची ST होती. ती काहीही करून पकडायचीच होती. अजून बराच काही पाहायचं राहील होत.
बुधला माची तिथला तो सुळका खुणावू लागला होता . दुपारचे ३ वाजले होते. एक तास आम्हा जवळ अवघा होता. त्यात जे काही पाहायचं ते पाहायचं होत. बुधला माची पर्यंत जावून येऊन खूप उशीर होणार होता. त्यामुळे बाकी मित्राचं मत घेतलं . काय करायचं ? कारण पुढे शेवटची ST जी पकडायची होती.
दोघा मित्रांनी पुढे जाण्याच नाकारलं. बाकींनी पुढे जायचं ठरवलं . इथपर्यंत आलो आहोत तर ते पाहूनच जावू. अस माझाही निर्णय होता. त्यामुळे जराही वेळ न दवडता आम्ही बुधला सुळक्याच्या दिशेने निघालो.
वाटेत कोकण दरवाजा लागला. इथून पुढे खाली उतरत आम्ही पुढे जावू लागलो . ते दोघे मित्र कोकण दरवाज्या इथे थांबले. जवळ जवळ १५ ते २० मिनिटात आम्ही त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून पुढे वाट घसरणीची आहे. एक एक पाउल हा जपूनच टाकावा लागतो. .... आम्ही एक एक करत पुढे जावू लागलो, आणि काही वेळेतच अर्धा सुळका पार केला. पुढे टोकावर जाण्यास वाट न्हवती. त्यामुळे तिथपर्यंतच आम्हास समाधान मानव लागल. वेळ हा न्हावताच. त्यामुळे पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
बिनी दरवाज्यापर्यंत येण्यास आम्हास ४ वाजून ५ मिनिटे झाली होती. एका तासात आम्हाला काहीही करून गावात पोहोचायचं होत. पटापट पावले टाकत आम्ही पोहोचालोही.
पण काहीही उपयोग झाला नाही. आम्ही येण्या अगोदरच ST निघून गेली होती. आता पुढे काय हा प्रश्न उभा होता. ?????
सायंकाळचे ५ वाजले होते. ST निघून गेली होती, ST साठी आम्ही एका तासात गड उतरलो होतो , पण त्याचा आता काहीही उपयोग न्हवता. आम्ही मग चहा घ्यायचं ठरवलं आणि मग पुढे काय ते बघू म्हणून एका हॉटेल मध्ये बसलो. चहा वगैरे पियुन झाल्यावर सारे बाहेर आलो, पुढे एक PRAIVATE गाडी उभी होती. ST नाही पकडता आली तरी आपणास येथून PRIVATE गाड्या मिळतात. पण त्यातल्या काहीच स्वारगेट पर्यंत नेतात. काही पुणे सातारा हायवे पर्यंत सोडतात. तिथून मग पुढे कसरत करतच एखादी गाडी वगैरे पकडावी लागते स्वारगेट पर्यंत पोहोचण्यास. ST थांबली तर थांबते. आम्ही हि त्याप्रमाणे PRIVATE गाडी केली. प्रत्येकी ३० रुपये. त्यांनी आम्हाला पुणे सातारा हायवे पर्यंत सोडलं. तेंव्हा सायंकाळचे ६:३० झाले होते. पुणे सातारा हायवे वर स्वारगेट व इतर ठिकाणी जाण्यासाठी लोकांची तुडूंब गर्दी होती. एक हि ST थांबत न्हवती. जो तो मिळेल ती गाडी पकडून , हातवारे करून , गाडी थांबवून ,ज्याच्या त्याच्या मुक्कामी जात होते.
आम्हला बरोबर ७:१५ ला स्वारगेट करीता ST मिळाली. ती हि भरगच्च, त्यामुळे स्वारगेट पर्यंत उभ्यानेच प्रवास करावा लागला. रात्री ८:१५ ला म्हणजेच एका तासाने आमची ST स्वारगेट डेपोत पोहोचली.
सर्व जण खूप थकले होते, आणि त्यातच ST तून उभ्याने प्रवास, आणि प्रचंड भूकही लागली होती. त्यामुळे आम्ही अगोदर ''ठाणे ST करीता चौकशी करून'' एखाद्या हॉटेल मध्ये जेवण करायचं ठरवलं. दोघे मित्र हे पुण्याचेच होते, स्वारगेट पासून काही अंतरावर त्याचं घर होत, त्यामुळे त्यांनी आमचा निरोप घेतला, आणि ते त्यांच्या घराच्या दिशेन निघाले.
आम्ही जवळच असलेल्या एका उपहार गृहात शिरलो. आणि VEG बिर्याणी ची ओर्डर दिली. अजून दिलेली ओर्डर आली न्हवती त्यामुळे डोळे इकडे तिकडे पाहत होते, तेंव्हा समोर एक पुणेरी बोर्ड दिसला "" आमच्या कडे बाल कामगार काम करत नाहीत '' कृपया ह्यांची नोंद घ्यावी"" ती पाटी पाहून क्षणभर हसायला आल '' पुणेरी पाट्या म्हणजे एक एक मजेशीर असतात. गंम्मतच असते एक , जिथे अस लिहल होत, तिथेच समोर एक बाल कामगार काम करताना दिसला...आहे ना गंमत..!!! थोड्याच वेळात एक जण गरमां गरम बिर्याणी घेऊन आला. ती पाहूनच वाटलं हि खूप तिखट असणार. लालभडक असा रंग होता, एक चमचा खातोय तोच लगेच पाणी....एक चमचा खातोय तोच लगेच पाणी....वेटरला विचारलं ''इतना तिखा क्यू है ?
त्याने म्हटलं ''आपने ओर्डर दिया वैसा हि है'' मी म्हटल '' हमने तो खाली veG बिर्याणी बोला था इतना तिखा कभी रहेता है क्या बिर्याणी '' कोणीच खाल्ली नाही ती बिर्याणी...!!! तो ती ओर्डर cancel हि करत न्हवता तो म्हणाला : एक बार ओर्डर दिया तो cancel नाही होता .
मी म्हटल वा ...सही ..!! मनात म्हटल उगाच आलो इथे भुखा तर सार्यांनाच लागल्या होत्या, पण असली तिखट बिर्याणी घशा खाली उतरत न्हवती. आम्ही पुन्हा मग RICE PLATE ची ओर्डर दिली. आणि आमची भूख भागीवली.
आता वेळ होती ती BILL देण्याची ,सगळ मिळून ५१० रुपये bill झाला होता. ५ जनांचा त्यात ती VEG बिर्याणी चे हि पैसे पकडले होते त्याने . आम्ही मालका पाशी जावून भांडू लागलो. कि आम्ही फक्त RICE PLATE चे च पैसे देऊ. बिर्याणी इतकी तिखट असते का कधी ?
जवळ जवळ १५ मिनिटे आम्ही त्याच्याशी भांडत होतो. तो पैसे काही कमी करत न्हवता. त्याच म्हणन होत कि तुम्ही खाण्या अगोदरच ओर्डर CANCEL करायला होती. खाण्या नंतर नाही. आम्ही म्हटल त्याला : खाल्ल्याशिवाय कस कळणार ती तिखट आहे का कशी ते ' आणि आमच्या नि ती अर्धी सुद्धा संपली न्हवती. संपूर्ण परत पाठविली आम्ही.
तो मालक काहीही ऐकून घ्यायला तयार न्हवता. तो ५१० रुपये वरच ठाम होता. १५ मिनिटा नंतर त्याने त्यातले १०० रुपये कमी केले. मी मित्रांना म्हटल जावू दे रे आपल्याला सुद्धा घरी लवकर जायचं आहे . देऊन टाक पैसे
पैसे देऊन आम्ही स्वारगेट डेपो च्या दिशेने निघालो, १०:१५ ची ST होती , स्वारगेट - ठाणे '' म्हटलं मस्त पैकी आरामात बसून जावू , त्यामुळे ट्रेन ने जाणं आम्ही टाळल, १० वाजले होते समोर एक महाराष्ट्र राज्य परिवाहन ची वोल्व्हो उभी होती, स्वारगेट ते ठाणे तिकीट २५० रुपये. १०:२० दरम्यान आमची ST च डेपोत आगमन झाल, तसं आम्ही पटापट आत शिरलो , जागा पकडण्यासाठी .....तेवढ्यात खाली उभा असलेला मास्तर ओरडला , दोन- तीन सीट सोडून बाकी सारे सीट रिसर्व्ह आहेत . त्यामुळे पुन्हा आम्हास खाली उतरावं लागल , उभ्याने प्रवास झेपणार न्हवता , आत्ता पुढे काय ? हा प्रश्न समोर राहिला ? १०:१५ नंतर शेवटची ११:०० ची sT होती पण तिलाही अस RESERVATION असलं तर ....म्हणून आम्ही पुणे स्टेशन गाठलं आणि तिथून मग तिकीट काढून रात्री १२ वाजता सुटणारी EXPRESS पकडली आणि शेवटी पुन्हा उभ्यानेच ठाण्यापर्यंत प्रवास केला . सकाळी ३:३० वाजता आम्ही ठाणे स्टेशन ला पोहचलो.
असा हा आमचा प्रवास झाला . तोरणा किल्ला पाहण्याचा आनंद झाला
संकेत य. पाटेकर
२१.१२.२०११ मंगळवार
https://picasaweb.google.com/103982240392890367738/TREKTORANA?authkey=Gv1sRgCNWm9InhhejdggE

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

हरिश्चंद्रगड -harishchandragad













हरिश्चंद्र गडावरच तो तुफान वारा ...रिमझिम नारा ..खेळकर असा पाऊस..,वाऱ्याच्या लहरी स्वभावामुळे ..सतत मागे पुढे जाणारे ..अंगाला झोंबणारे...दाट असे..धुके ,मन मोहून ..हर्षून टाकणारे सुंदर असे ..शुभ्र धवल..धबधबे...पावसामुळे झालेला चिखल...वाहत्या झऱ्यानमुळे..होणारा तो पाण्याचा ..नाद .,खलखलाट हिरवीगार झाडे-वेली..तेथील पुरातन मंदिर..त्यातील शिल्प... केदारेश्वर मंदिरातील भलीमोठी सुंदर सुबक अशी शिवलिंग शिवलिंग भोवती बाराही महिने असलेल थंडगार कमरे इतकंच ते पाणी ..आणि त्यातून घातलेली ती प्रदक्षिणा....







दाट धुके असताना..पुढची वाट दिसत नसताना..वाट हरवलेली असताना... अचानक दृष्टीपथास दिसणारे ..जणू काही पुढची वाट- मार्ग दाखवणारे ..ते छोटस..पण सुरेख सुंदर मंदिर सायंकाळी कोकण कड्यावर जाताना ..दाट धुक्यामुळे तेथील जाण्याची वाट दृष्टीपथास न दिसल्यामुळे लीडर्स ने घेतलेला तो परतीच निर्णय ..गुहेत परतत असताना ..काळोख दाटत असताना...अन वाट हरवलेली असताना...अचानक एका व्यक्तीच आम्हापासून दूरवर कुठेतरी जान ..त्याला शोधण्यासाठी लीडर्स ने घेतलेला तो अचूक..त्वरित निर्णय...तो थ्रिल .. सर्व काही अनोख ... रात्रीच ते सुग्रास ..चवदार जेवण...गमती जमती... दुसर्या दिवसाच..सकाळी त्या पुरातन मंदिराविषयी ..तेथील शिल्पानविषयी दीप्ती..संपदा ने दिलेली ..ती सुंदर पुरेपूर माहिती अनेकां सोबत काढलेले ते गमतीदार पण ..छान सुंदर फोटो... वाईल्ड लाईफ बद्दलची सौरभ ने दिलेली ती सुंदर माहिती .. विरगळ ...सतीशीला ह्या बद्दल निलेश अन सौरभ ने दिलेली सखोल तितकीच ..उपयोगी माहिती... अन घरी परतत असताना गाडीमध्ये केलेली ती संगीतमय धमाल ........ सार सार काही अनोख ..नवीन ..शिकण्यासारख ..हर्षून जाणार .. मनाला ताजतवान...फ्रेश करणार....
असा हा पावसाळी ट्रेक ...हरिश्चंद्रगड
संकेत य . पाटेकर


कलावंतीण सुळका - kalavantin sulakaa

कलावंतीण ट्रेक अनुभव : सोमवार पासून ठरवलेलं येत्या रविवारी कुठेतरी जायचच ट्रेकला त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची ,
पण काहीच सुचत न्हवत कुठे जायचं शनिवार उजाडला तरी काही ठरल नाही ....कलावंतीणदुर्ग येथे जायचं अस मी बुधवार का गुरवारी मित्रांना सांगितल होत तितकंच...पण पक्क न्हवत ... शेवटी शनिवार रात्री ९:३० वाजता कलावंतीण ला जायचं आहे हे मी ठरवून टाकल. आणि मित्रांना लगेच फोन फिरवले. सकाळी ९:४५ वाजता असणारी पनवेल s.t डेपो मधून सुटणारी ठाकूरवाडी s.t पकडायची अस निच्छित झाल.

कल्याण हून एक मित्र येणार होता...वाशीवरून दोघे येणार होते..आणि ठाण्याहून आम्ही तिघे मित्र. असे सहाजन होतो आम्ही.  सकाळी जायचं होत. म्हणून आपोआपच जाग आली..तयारी वगैरे करून पाठीवर sack घेऊन मी आणि माझा मित्र आम्ही दोघे निघालो. ठाणा station ला आलो. एक मित्र अजून येणार होता. त्याची वाट पाहत बसलो... सकाळची ८: ०१ ची पनवेल ट्रेन होती. ८:०० वाजण्यास फक्त ५ मिनिटे शिल्लक होती..गाडी सुटायची वेळ आली होती ..अन मित्राचा अजून पत्ता न्हवता. शेवटी १ मिनिटाचा अवधी शिल्लक असताना तो आला ...तेंवा कुठे बर वाटल....
९:१५ च्या सुमारास आम्ही s.t डेपो तिथे पोहोचलो. इतर मित्रांना भेटलो . त्यातला एक मित्र दीड तास अगोदरच तिथे पोहोचला होता...त्यामुळे ...s.t कुठून कोणत्या फलाटा वरून ..सुटते ..किती वाजता सुटते ...वगैरे सर्व माहिती त्याने काढली होती. त्यामुळे काही प्रश्न न्हवता. frndship day त्याच दिवशी होता त्यामुळे ...एकत्र भेटलो तेंवा एकमेकांच्या हाताथ रीब्बिंस बांधल्या. अन frndship day.साजरा केला. सकाळच कोणी काहीही खाऊन न्हवत आल ..त्यामुळे ...वडापाव वर ताव मारला..पाण्य्च्या बॉटल्स भरल्या. आणि s.t येण्याची वाट पाहत बसलो. ९:४५ ची ती s.t त्यादिवशी १०.०० च्या सुमारास आली. गर्दी इतकी न्हवती ...त्यामुळे लगेच बसण्यास जागाही मिळाली. सर्वांच एकदाच तिकीट काढाल. सहाजानाचे ७२ रुपये झाले ...एकाचे १२ रुपये. साडे दहा - पावणे अकरा च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. समोरच V आकाराचा कलावंतीण अन प्रबळ गड दिसू लागला होता. s.t तून खाली उतरल्यावर वारदोली-ठाकूरवाडी अशा नावाची पाटी वाचली . अन समोर असणार्या डांबरी वाटेने पुढे जावू लागलो.
पावसामुळे सर्व काही हिरवागार झाल होत. मन अगदी प्रसन्न झाल त्या हरित अशा वातावरणाने....मस्त शुभ्र धवल ते धोधो वाहणारे धबेधबे पाहून मन हरवून जात होत. ... आम्ही पुढे पुढे जात होतो त्या वाटेने. वाट पुढे एका धबधब्याजवळ जात होती ,एका माणसाने आम्हा स सांगितले ...मग तसाच पुन्हा माघारी फिरलो ..अन दुसर्या डांबरी वाटेने पुढे जावू लागलो. जाता येता काही माणसे दिसत होती, रस्त्यावर त्यांना विचारल कलावंतीण ला कस जायचं...त्यानाही काही व्यवस्थित सांगता नाही आल. आम्ही पुढे पुढे जाताच होतो . वाट काही सापडत न्हवती. एक तास आमचा असाच वाया गेला. कुणीतरी आम्हास सांगितल. कि जिथे तुम्ही उतरलात त्या गावातून मागच्या रस्त्यावरून गडाकडे जाणारी सरळ वाट आहे. आम्ही त्याच गावात पुन्हा १ तासाने परतलो. एक तास वाया गेल्यानंतर आमचा खरा प्रवास सुरु झाला कलावंतीणला जायचा. गावाच्या त्या मागच्या रस्त्याने जाताना एक SPA REsort लागतो ..त्याच्या बरोबर समोरून एक वाट आहे ती सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवते.
रस्त्याने मस्त रमत गमत - सुंदर धो धो वाहणार पांढरे शुभ्र धबधबे पाहत. हिरवळीने नटलेल्या त्या डोंगर दरयांकडे पाहत आम्ही पुढे जात होतो.














गावातून जाणारी वाट हि जरा घसरणीचीच आहे. बारीक बारीक - मोठे मोठे असे दगडी..चिखल....त्यात पावसामुळे वाढलेले गवत... ह्यामुळे जरा जपूनच जावे लागते...
असा हा पावसाळी एक दिवशीय ट्रेक कलावंतीण सुळका 
आमच्या हमेशा स्मरणात राहील !!
Add caption

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

कोरीगड - कोराईगड - korigad

अनुभव ट्रेक चा : -












मागील रविवारी वसई किल्ल्याला भेट देऊन आलो होतो, आणि त्या अगोदरच माझ ठरल होत. पुढच्या रविवारी कोरीगड सर करायचं. त्याप्रमाणे मी कोरीगडाची माहिती गोळा केली होती. कस जायचं, कोणती st पकडायची, कोणत्या मार्गाने जायचं ह्याची माहिती मित्रांन कडून तसेच नेट वरून हि घेतली होती.

ट्रेक च्या आदल्या दिवशी सर्व मित्रांना मी कळवलं होत. कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं. माझा एक जुन्या ओफ्फिचे मित्र देखील येणार होता. आणि तो पहिल्यांदा येणार होता आमच्या सोबत ट्रेकला ,आणि त्याचा हा पहिलाच ट्रेक होता. ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी ५ मित्र एकत्र आलो होतो. एक अजून आला न्हवता, सकाळच्या ६:१५ ची इंद्रायणी express ने आम्ही जाणार होतो. ६;२० मिनटे झाली तरी एक मित्र अजून आला न्हवता, call सुद्धा तो उचलत न्हवता. शेवटी तो मित्र आलाच नाही. ६:१५ ची ती ट्रेन १०-१५ मिनिटे उशिराने आली. गर्दीही होतीच. कसा बसा चढलो ट्रेन मध्ये. ट्रेन च्या डब्यापेक्षा माणसाची संख्या जास्त असल्याने उभ राहूनच प्रवास करावा लागला. आणि नेहमीच लागतो.

सकाळी ८:१० मिनटाने आम्ही लोणावळा स्थानका वर उतरलो . तिथून पुढे सरळ आम्ही १०-१५ मिनटात लोणावळा ST डेपोत पोहोचलो. मी माहिती मिळवल्याप्रमाणे सकाळी ९:१५ ची पेठ शहापूर मार्गे जाणारी भांबुर्डे हि पहिली ST होती. पण चौकशी केली तेंवा मास्तराने सांगितले '' ती काय समोर उभी भांबुर्डे - पेठ शहापूर मार्गे जाणारी ST. आमच्या पैकी कुणीच जेवणाचे डबे आणले न्हवते, आणि भूख हि लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी वडा- पाव घेतले गडावर जावून खाण्यासाठी. आणि एक एक वडा पाव तिथे हि फस्त केला. आणि स्तानाकात उभ्या असलेल्या भांबुर्डे ST मध्ये जाऊन बसलो.

बरोबर ८.३५ ला भांबुर्डे ST सुटली डेपोतून. ९५ रुपये तिकिटाचे झाले. एकाचे आंबीवने गावापर्यंत १९ रुपये तिकीट. सकाळच छान अस वातावरण त्यात धुक, गार गार हवा चुहू बाजूंची हिरवळ , वळणा वळणाचे, खड्डे बिलकुल नसणारे, सुंदर पट्ट्या पट्ट्यांचे डांबरी रस्ते, ह्यांने मन मोहून गेले होते. प्रसन्न झाले होते. ८;३५ ला डेपोतून सुटलेली आमची ST पेठ शहापूर ला ठीक ९:१० वाजता पोहोचली. ST तून उतरत असतांनाच समोरच कोरीगड च सुंदररूप नजरेस पडलं. ST तून उतरलो तेंवा त्याच ST मध्ये एक असाच किल्ल्यांची आवड असणारा, इतिहासाची माहिती असलेला आणि कोरीगडला एकटाच आलेल्या त्या माणसाची ओळख झाली. दिनेश कदम त्यांच नाव. पुढे त्यांनी त्यांचा DG CAM आमच्याच हाती सोपावला. फोटो काढण्याकरिता. 

वाट चुकू नये म्हणून रस्त्या पलीकडल्या त्या एका दुकानातल्या मुलीला आम्ही विचारल गडावर जाणारा मार्ग '' तिने सांगितल पुढे एक लाल अशी मळलेली छोटी पायवाट आहे . तिथून जायचं. 
ST थांब्याहून पुढे १ मिनिटावर डाव्या बाजूला मळलेली पायवाट आहे. तिथून गडावर जाणारा मार्ग आहे. तिथून साधारण पाऊन तास लागतो. गडाच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यास.
पावसाळ्याचे दिवस असल्याने ती वाट घसरणीची झाली होती. तिथून आम्ही थोड्याच वेळात म्हणजे २० मिनिटात पाय्र्याशी येऊन पोहोचलो. पायऱ्या पासून गडाच्या दरवाजा पर्यंत जाण्यास पुन्हा २० मिनिटे लागतात. तिथून म साऱ्या निसर्गाची उधळण आपल्या नजरेस पडते. खाली आंबे व्हेली च सुंदर दृश्य दिसत. समोरच तिकोना खुणावतो. गडावरील तिळाची फुल मन वेधून घेतात. मन रहावत नाही त्यांच्या सोबत एखाद फोटो काढल्याशिवाय.

गडाच वैशिष्ट म्हणजे तटबंदी वरून संपूर्ण गड फिरता येतो. गडावरील तोफा आपल लक्ष वेधून घेतात. तटबंदी वरून चालत चालत पुढे बुरुज,चिलखती बुरुज,चोरवाटा पाहून आम्ही लक्ष्मी तोफे जवळ आलो. लक्ष्मी तोफे जवळ शिव गर्जनेने आम्ही सारा आसमंत दणाणून सोडला. पुढे कोराई देवीच दर्शन घेऊन. आम्ही मंदिराच्या चौथर्या पाशी थोडी विश्रांती घेतली. गडावर माकडं सुद्धा बरीच आहेत. आपल्याजवळ एखाद काही खाद्य वगैरे दिसलं कि ते आपला पिच्छा सोडत नाही. मागे मागे धावतात. थोड्या वेळेच्या विश्रांती नंतर आम्ही पुन्हा गड पाहण्यास सुरवात केली. गडावर दोन मोठी तलाव आहेत. गड चढण्यास खूपच सोप असल्याने इथे पर्यटक येताच राहतात. मौज मजा करण्यासाठी. मोठ मोठ्या किंकाळ्या मारण्यासाठी. इतिहासाच त्यांना काही घेण- देण नसत. आपल मन मुराद मस्ती करायची आणि निघून जायचं बस तितकंच.

गड पाहून झाल्यावर थोड पोट पूजा करून झाल्यावर आम्ही आंबीवने मार्गे गड उतरण्यास सुरवात करणार होतो. गडावर दोन वाटा असल्यास एकीकडून सुरवात करावी चढण्यास आणि दुसऱ्या वाटेने उतरावे. म्हणजे कस संपूर्ण गड पाहल्यासारख होत. आणि दोन्ही वाटा माहित होतात. अस मी पुस्तकात वाचल होत आणि आमच्या सरांनी( मिलिंद चाळके ) देखील गोरखगडाच्या ट्रेक दरम्यान सांगितल होत. 
नव्या लोकांसाठी आंबीवने मार्गी वाट थोडी अवघड आहे. आम्ही त्या दिशेने उतरण्यास सुरवात केली खरी . पण पुढे दहा पंधरा मिनिटानंतर पुढची वाटच दिसेनासी झाली. खाली नुसता सरळ उभा कडा दिसत होता. पावसामुळे गवत- झाडी वगैरे सुद्धा वाढली होती. त्यामुळे पुन्हा आम्ही आलो त्याच वाटेने म्हणजे पेठ शहापूर मार्गी उतरण्यास सुरवात केली.

आम्ही सकाळी १०:०० वाजता गडाच्या मुख्य राजमार्ग असलेल्या दरवाजापाशी पोहोचलो. आणि गड फिरून वगैरे पुन्हा तिथेच दुपारी १२:४५ ला आलो आणि गड उतरण्यास सुरवात केली. चोहीबाजूंनी हिरवाईने, डोंगर-दर्यांनी, सुंदर फुलांनी नटलेला हा गड पाहताना खरच मन हरवून जात. एका दिवसात हा ट्रेक करता येतो . पेठ शहापूर गावात हॉटेल सुद्धा आहे . त्यामुळे गड वगैरे फिरून झाल्यावर आपली इथे भोजनाची व्यवस्था होऊ शकते. घरूनच डबा आणल तर उत्तमच.

संकेत य .पाटेकर
२४.०९.२०११
ठाणे ते लोणावळा - इंद्रायणी एक्ष्प्रेस्स( सकाळी ६:१५ मिनिट ) तिकीट दर : ४१ रुपये लोणावळा डेपोतून : लोणावळा ते भांबुर्डे (पेठ -शहापूर मार्गे ) तिकीट दर १९ रुपये (सकाळी ८:३० ची पहिली st)


अधिक फोटो साठी येथे क्लिक करा :
http://www.facebook.com/media/set/?set=a.264089606947290.62249.100000387574764&type=3

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

गड-कोट-किल्ले

मराठीमधे सर्वसाधारणपणे गड- किल्ले आणि दुर्ग हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. कोट हा शब्द जास्त करून भुईकोट किंवा स्थल दुर्ग किंवा गढ़ी या संधार्भात वापरला जातो.
सर्वसाधारणपणे गड शब्दामधे चढ़ावाचा अवघडपना , दुर्ग शब्दामधे प्रवेशाची कठिनाई आणि कोट शब्दामधे सभोवाराची तटबंदी याचा बोध होतो.