सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

मृगगड - एक तुफानी ट्रेक (१५ ऑगस्ट २०१२ )




आजवर इतके ट्रेक केले .....पण हा त्यात फारच निराळा ठरला .....
तस पाहयला गेले तर ...प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेग वेगळा आणि अविस्मरणीयच असतो .
पण आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच पण जरा त्याहुनी वेगळा अन अविस्मरणीय असा ठरला. 

वाट चुकण्यात जो आनंद असतो ना ...तो नेहमीच्याच रुळलेल्या वाटेने जाताना नाही मिळत ,
एक वेगळी वाट अन ते धाडस ......नेहमीच अविस्मरणीय अन ...तुफानी ठरत.

पहिल्यांदा घोरपडी सारख ....हात अन पाय दोघांचा उपयोग करून ....निसरड्या गवतातून आणि माखलेल्या चिखलातून . भर पावसात ....सरींचा मारा खात ...अन एक एक पावूल हळूच सावकाश ...टाकत ....मनाचा तोल सांभाळत ...ती उभी निसरडी ...आणि एक बाजूला खोल दरी असलेली ती चढण चंदू लागलो.

काही वेळातच कसे बसे माथ्य्वर पोहोचलो ....खरे ...........पण
वर पोहोचताच कळलं.....कि आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे .....चुकीच्या डोंगरावर ...
समोरून च मृग गड दिसत होता ...जिथे आम्हाला खरे जायचे होते .....

आमचा बरासचा वेळ आता वाया गेला होता . आणि महत्वाच म्हणजे आलो त्या वाटेने पुन्हा जाने म्हणजे
खूपच रिस्की वाटू लागल होत.कारण कुठूनही वाट न्हवती .....सगळीकडून उभी खोल दरी ...

चढण खूप सोप असत ...पण उतरण फार कठीण......
शेवटी नाईलाज म्हणून ...पुन्हा त्याच वाटेने .... उतरायचं ठरलं ...आणि
पुन्हा ते धाडस करून कसे बसे ...आम्ही खाली उतरलो.
अन दुसर्या वाटेने जाऊ लागलो ..एका डोंगराला वळसा घेत ...

पुढे काही वेळातच एक गुहा दिसली. एका वेळी एकंच माणूस त्यात जाईल अशी ती गुहा...
अशा गुहे मध्ये जाण्यात मला नेहमीच फार उत्सुकता असते. त्या उत्सुकतेतच मी त्या गुहेत जाण्याच ठरवले ....आणि एका हाती torch घेऊन .....पुढे पुढे जाऊ लागलो .
ती गुहा सरळ सरळ पुढे गेल्यावर उजवीकडे वळते आणि तिथून पुन्हा ती खाली जाते खालच्या दिशेने आणि 
तिथून पुन्हा सरळ ....आणि पुन्हा कुठे वळते ते ठाऊक नाही .....
कारण त्याच्याही पुढे जाण्यचे धाडस न्हावतेच ...कारण अचानक समोरून काही प्राणी म्हणा किंवा इतर काही आले तर त्वरित मागे फिरणे ......फारच कठीण आणि जीवावर बेतणार ठरू शकत. म्हणून पुन्हा मागे फिरलो .
अन गडाची वाट पकडू लागलो .
थोड्या वेळात पुन्हा एक चढण आली ....आणि त्या उभ्या दगड धोंड्यानच्या घळी मधून आम्ही वर आलो . आणि समोरच ते दृश्य पाहून .....त्या खडकात खोदलेल्या पायर्या पाहून तो आनंद आमचा गगनात मावेनासा झाला .....


कसे गेलो :
ठाणे ते खोपली - (२ तास )
लोकल ट्रेन (ठाण्याहून )
पहाटे : ५:११ ते ७:००

खोपोली ते परळी (अर्धा ते पाऊन तास )
एसटी
सकाळी : ७:२० ते ८:१० ते ८:१५

परळी ते भेलीव ( अर्धा तास )
टमटम :दहा आसनी रिक्षा
सकाळी : ९:३५ ते १०:०५

भेलीव(गडाच्या पायथ्याच गाव ) ते गडमाथा
सकाळी १०:०५ ते दुपारी 1:३०
आमचा बरासचा वेळ वाया गेला चुकीच्या वाटेने गेल्यामुळे त्यामुळे इथे अधिक वेळ लागला ,
अन्यथा १ तासात आपण गडाचा माथा गाठू शकतो.

गडाकडे जाणारी वाट:
गडाकडे जाणारी खरी वाट हि भेलीव गावाच्या थोड्या वर असलेल्या कातकरी वाडीतून जाते . हि वाट थेट आपणास एका घळी पर्यंत पोहचवते मग तिथून वर आलो कि समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात . त्या पायऱ्या चढत आपण गडावर प्रवेस करतो .

गडावर प्रवेस करत असताना आपणास थोडी फार तटबंदी दिसते .
आपण जिथून प्रवेश करतो तिथेच त्याच्या उजव्या हाताला महिशासुर्वार्दिनी च एक शिल्प आहे आणि मधेच एक तडा गेलेली शिवपिंड दिसते . आणि त्याच्या बाजूला हाती डमरू आणि त्रिशूल असलेल एक शिल्प.
तिथून सरळ पुढे पुढे जात आपण २ टाक्यां जवळ पोहोचतो. त्या दोन टाक्याच्या मधून थोडा पुढे आलो कि समोरील सुंदर परिसर न्ह्याहालाता येतो .

संकेत य.पाटेकर
२७.०८.२०१२

परळीत पोहोचल्यावर थोडी पोट पूजा करत असताना आम्ही
डावीकडून हेमंत.. मी ..आणि लक्ष्मण



मृगगड आणि एकीकडे मोराडीचा सुळका...

मृगगड...




आम्ही चौघे ....आणि पाठीमागे मोराडीचा सुळका...




























मी ..




























दगड धोंड्यातून उभी चढ चढत असताना ....


मोराडीच्या सुळक्याकडे ..........लक्ष्मन आमचा लक्षा उर्फ मेन इंजिन..


























डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य..

गडाकडे कूच करताना ...मृग गडाचा map पाहताना...

हेमंत ...किशोर आणि लक्ष्या उर्फ बाळू दा...

एका बाजूला खोल दरी ....आणि निसरड्या ओल्याचिंब गवतातून त्या मातीतून सावकाशपणे पाउल ठेवत खाली उतरताना .....
गडाकडे जाणारी वाट..

हीच ती..............वेडी वाकडी ....गुहा..




























गुहेच्या आत जात असताना .......मी...
ह्या घळी तून वर गेल्यावर ...समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात ..तिथूनच गडावर जाता येते. 





































ओसंडून वाहणारा आनंद ..............

गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या...

पायऱ्या चढत असताना ............दगडात कोरलेले एक शिल्प दिसत. 

महिषासुर्वार्धिनी देवी.




































महिषासुर्वार्धिनी देवी ....शिवपिंड आणि एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 

एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 



































पाण्याच दोन टाकं..

समोरील दृश्य..

मृगगड

अंबा नदीच्या पात्रात ,…

अंबा नदीवरील अरुंद पूल...



अंबा नदीवरील अरुंद पूल..



मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते ( भेलीव पासून काही अंतर पार केल्यावर माणगाव लागते )

सकाळ वृत्त पत्रात आलेली मृगगडाची/ भेलीवचा किल्लाची माहिती. 












शनिवार, ३० जून, २०१२

सह्याद्री ...सह्याद्री ..सह्याद्री !!!


सह्याद्री ..सह्याद्री ..सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप ,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग ....

सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज...
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा ....
रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ....,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ...
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ...

सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा ....हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .

असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग''
मला नेहमीच वेडं लावतं .

संकेत य पाटेकर

३० जून २०१२












सोमवार, १८ जून, २०१२

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

पाउस - जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही ...जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो ..आणि मग शब्दांचा भडीमार आपल्यावर ओढावून घेतो बहुदा त्याला दुसर्याचा राग ओढावून घेणे आवडत असाव. ...
असो प्रबळ गडास जाण्याच मुहूर्त जानेवारी पासून शोधत होतो. पण मुहूर्तच सापडेना .
 जेंव्हा जेंव्हा ठरवायचो तेंव्हा तेंव्हा काही ना काही अडचण येत असे.
















पण ह्या वेळेस मात्र मुहूर्त सापडला . आणि प्रबळगड सर सुद्धा केला . पण पाऊसाने नको त्यावेळी येऊन आमची फार निराशा केली .
गडावर फक्त पावसाच थैमान,घनदाट रान, ती शांतता , त्यात आम्ही फक्त तिघे , मधेच माणसाने शिटी वाजवी तश्या आवाजात ओरडणार्या त्या पक्षाचे सुंदर आवाज , एक वेगळाच आनंदीय क्षण

समोरचं परिसर काळ्या पांढर्या ढगांनी व्यापून गेला होता. समोरच दृश्यच दिसत न्हवत . फक्त काळ्या पांढर्या रंगाचे थर आणि झोंबणारा थंडगार वारा आणि सोबत पाउस

आमची सुरवात मात्र दमदार झाली......
पहाटे लवकर ठाण्याहून पहिल्या वाशी ट्रेन ने आम्ही निघालो. पनवेल एस टी डेपो तून सकाळी ७ वाजता सुटणारी ठाकूरवाडी एस टी ने जायचं होत. (ठाकूरवाडी हे गडाच्या पायथ्याच गाव, त्यापुढे हि प्रबळ माची म्हणून गाव आहे.) .

आम्ही तिघे म्हणजे मी किशोर आणि आमचा बाळू दादा म्हणजेच लक्ष्मण आम्ही ७ च्या अगोदर पाच - दहा मिनिटे पनवेल डेपोत पोहोचलो . नि एसटी ची चौकशी करण्यास चौकशी खिडकी कडे गेलो. तेंव्हा मास्तर कडून कळले कि . ठाकूरवाडी करता जाणारी एस टी तीन दिवस झाले बंद आहे . तीन दिवसापूर्वी एस टी वाहन चालकाला तिथे मारहाण केली त्याबद्दल त्यांनी एस टी बंद केली होती. आम्ही मनात म्हणालो कि ह्याच वेळेस का अस झाल .
आता कसे जाणार ? हा प्रश्न देखील पडला होता ? तेंव्हा मग किशोर म्हणाला आपण शेडुंग फाट्या पर्यंत एस टी ने जावू तिथून मग रिक्षा ने ठाकूरवाडी पर्यंत .
आम्ही वडगाव हि एस टी ने शेडुंग फाट्या पर्यंत पोहोचलो. तिथून रिक्षाने ठाकूरवाडी ....शेडुंग ते ठाकूरवाडी त्या तीन आसनी रिक्षावाल्याने आम्हाकडून ८० रुपये घेतले . अंतर अवघ ८ किलोमीटर होते . पण आम्ही देऊ केले . कारण आमच्या मध्ये तसे भाव कमी जास्त करणं ....कोणाला पटवण जमत नाही जे आहे ते द्यायचं ......ह्या वृत्ती पायी रिक्षा वाल्याने ८० रुपये होतील ...हे सांगितल्यावर काही कमी जास्त न करता सरळ रिक्षात बसलो. नि १५ मिनिटा मध्ये ठाकूरवाडी गावात पोहोचलो.

ह्या पूर्वी म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही इथेच आलो होतो .कलावंतीण चा सुळका सर करण्यास , त्यामुळे प्रबलमाची गावा पर्यंत जाणारी वाट आम्हास माहित होती. आम्ही त्या वाटेने पुढे पुढे सरसू लागलो .

पावसाचे तसे चिन्हे काही दिसत न्हवती . डोंगरांनी मात्र हिरवाईचा पांघरून अंगावर ओढावून घेतला होता, वातावरण पण कस थंडगार होत.हवा खेळती होती , डोंगरातील खळ्या मात्र अजून पांढर्या शुभ्र धवल धबधब्याने खळखळ नारया झरया ने स्पर्शित न्हवती.



पहिल्या पावसातल्या पहिल्या सरीत उगवणारी आणि अवघे १० -१५ दिवस राहणारी शेवला (भाजी )जागोजागी चालताना इथे तिथे दिसत होती .


















प्रबळमाची गावात शिरताच आमच तिथल्या गावकी कुत्र्याने भुंकत भुंकत स्वागत केल.
एक छोटा मुलगा आणि त्याची मोठी बहिण कुठला तर खेळ खेळत होते.
पुढे एक छोटस खोपट होत. त्याच्या जवळ एक फलक लावला होता.
आमच्या इथे जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था केली जाईल . त्या फलकाला माझ्या कॅमेरात बंदिस्त करून आम्ही पुढे निघालो .
आता मात्र पाउस पडण्याची चिन्हे उभी होती . कलावंतीण सुळका आणि प्रबळ गडाला ढगांनी आपल्या पंखात लपवलं होत. त्यात कलावंतीण चा सुळका त्या पंखातून हळूच बाहेर पडत आमच्या कडे जणू डोकावून पाहत होता अस जाणवत होत. मला तेंव्हा राहावल नाही आणि तो क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी कॅमेरा चालू केला आणि क्लिक करायच्या आत कसला तरी आवाज आला नि कॅमेराच्या पडद्यावर मेसेज आला.....''लेन्स एरर ''
ह्या पूर्वी २ वेळा लेन्स बदलून आणली होती ....आता पुन्हा लेन्स प्रोब्लेम ....मन निराश झाल.
कारण माझ्याशिवाय दुसर्या कुणाकडे कॅमेरा न्हाव्ताच.
आणि त्यात ते वातावरण इतक आल्हादायक होत ...........कस सांगू.

कॅमेराच दुख मनात ठेवून पुढे चालत राहिलो . एव्हाना पावसाच आगमन झाल होत . तो आमच्या वर बरसत होता अगदी रिमझिम करत ......,
गावातून जात असता गावाच्या उजवीकडच्या वाटेने आपणास प्रबळ गडाकडे जाता येते .
मळलेली वाट आहे ...तरी सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते ...कारण एकाच वाटेतून १-२ वाटा फुटतात आणि तिथेच आपण फसलो जातो.
आम्ही सुरवातीलाच फसलो नि प्रबळगडाच्या उभ्या सरळ सोट कड्या खाली आलो उभा चढ चढत एका वेगळ्याच अनवट वाटेने...

























तिथून आसपासचा परिसर किती मोहक दिसत होता .त्यात आम्हास पावसाच्या सरीने न्हावू घातले होते . काळ्या कातळावरील ते खेकडू कड्यावरून ओसर्णारे पाणी पिण्यासाठी चिटकून बसले होते.

आम्ही कातळ कड्याच्या कडे कडे ने वाट काढत पुढे सरलो ...काही वेळाने आम्हास नेहमीचीच रुळलेली वाट दिसली जी गडाकडे जाणारी होती .. आम्ही एकदम RIGHT TRACK वर आहोत ह्याचा आनंद झाला. पुढे ती वाट पकडत आम्ही दगड धोंड्यावरून झाडी- झुडपातून पांढर्या ढगातून आणि रिमझिम नारया पावसाच्या सरीतून थंडगार वारा अंगावर घेत पुढे जावू लागलो .

प्रबळगडावर घनदाट रान आहे. उंच उंच दाटी दाटीचे झाडे झुडपे त्यातून ती मळलेली वाट, निरव शांतता , त्या शांततेत अजून तल्लीनता आणणारे , आपल्या गळ्यातून वेग वेगळा आवाज काढणारे पक्षी , पावसाने केलेला काळोख ... तो जो तिथला अनुभव, तो आनंद मनाला स्पर्शून जातो कायमचा.

पुढे एक मळलेली वाट पकडून आम्ही एका सपाट पठाराच्या टोकावर आलो . इथून मला वाटत कलावंतीण चा पूर्ण सुळका दिसत असावा. पावसा मुळे आणि पांढर्या काळ्या थरामुळे आम्हास ते दृश्य दिसू शकले नाही. त्या ढगांनी सारा परिसर आपलासा केला होता.
आम्ही थंडीने कुड कुडत होतो . पावसाने ओलेचिंब झालो होतो. त्यात हा वारा अजून आमची चेष्टा करू पाहत होता . काही वेळ आम्ही तिथे पाउस कमी होईल नि सगळा परिसर स्वच्छ होईल ह्या आशेने तिथे थांबून होतो . पण पावसाचे चिन्ह कमी होत नाही हे पाहून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो .
येताना एका वाटेने आलो म्हणून जाते वेळी जरा दुसर्या वाटेने जायचे ठरविले . त्या वाटेने पुढे जात असता एक पाण्याच टाक लागल.पावसाने ते टाक भरलं होत.


थोड्या वेळाने 'त्याच वाटेने आम्ही आलो तेथून पुन्हा उतरलो . वर येताना झरे वगैरे ह्याच नाव हि कुठेच दिसत न्हवत पण खाली उतारते वेळी जागो जागी छोटे मोठे धब-धबे...
मन आवरेना तेंव्हा त्या झर्याच पाणी अंगा खांद्यावर घेत त्याचा मन मुराद आनंद लुटावयास लागलो. नि पुन्हा नेहमीच्या मळलेल्या वाटेने गड खाली उतरू लागलो.
पावसाने ह्या वेळेस खूप झोडपले आम्हास . आसपासच परिसर पाहण्यास सक्त मनाई केली होती त्याने आज ...

पण त्यातही आम्ही खूप आनंद घेतला ...निसर्गाच्या अद्भुत चमत्कारिक क्षणांचा .

संकेत य पाटेकर
१९.०६.२०१२




गडावरील हिरवळ :






















धुक्यात हरवलेली पायवाट :





















पावसाचा... निसर्गाचा आनंद घेत असताना मी ..

सोमवार, २८ मे, २०१२

लोहगड- विसापूर ट्रेक































ह्या आकड्यांची गंम्मतच असते खूप ....
सुरवातीस ट्रेक ला येणार्यांचा आकडा जरा जास्त असतो ...पण हळू हळू ..तो घसरू लागतो ...जसा शेअर बाझारात्ला निर्देशांक पटकन खाली यावा ......तसा .
ह्या ट्रेक बाबतीतही तसंच झाल. सुरवातीला बरेच आकडे होते ...पण आदल्या दिवशी पर्यंत आकडा ३ वर आला .
पण काय एकदा का मनात ठरवलेली गोष्ट हि पूर्ण करायची  म्हणून आम्ही तिघे मी लक्ष्मण आणि किशोर निघालो . ...रविवारी पहाटे ४:३० वाजता घरातून,निघालो एक वेगळी वाट पकडून ...

नेहमीप्रमाणे ठाण्याहून पहाटे ६:१५ मिनिटाची इंद्रायणी एक्स्प्रेस न पकडता पहाटे ५:१० मिनिटाने सुटणारी खोपोली ह्या लोकल ट्रेन ने आम्ही जाणायच ठरवलं .....कारण सुखकर प्रवास करायचा होता . 
मागच्या प्रवासाचा दांडगा अनुभव होता ...

खोपोली हून मग राज्य परिवहन एस टी ने लोणावळा तिथून मग लोकल ट्रेन ने मळवली अन मळवली हून पायी चालत ... गडाच्या माथ्यावर ..!
सकाळी ११:०० वाजे दरम्यान आम्ही त्या खिंडीत पोहोचलो. 
तिथून मग एक वाट विसापूर ला जाते अन दुसरी लोहगड कडे , लोहगड ह्या पूर्वी केला असल्यामुळे मी अगोदर विसापूर करायचे ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही मग विसापूर कडे धावू लागलो .


जाताना अनेक करवंदाच्या जाली पहावयाच मिळत होत्या आणि त्यावरील काळी काळी गोड रसाळ अशी करवंद ,ती खाता खाता आम्ही गडावर जाणारी मुख्य वाट सोडून आम्ही दुसर्याच दिशेने पुढे जावू लागलो .
ती गोष्ट काही वेळाने ध्यानात आली ...कारण वाट गडाकडे न जाताच दुसरी कडे जात होती .
आम्ही  मग मागे फिरलो. ..पुन्हा त्याच वाटेने ..पुन्हा ती टपोरी टपोरी छोटी मोठी गोड गोड करवंद खात
एका पायवाटेने रानातल्या त्या गर्द झाडीमध्ये त्यांच्या सावली मधून वाट पुढे काढत दगडांच्या राशी एक एक पार करत एका ढासळ लेल्या बुरुजापर्यंत आम्ही पोहोचलो.




























फार फार २० ते २५ मिनिटे लागली तिथपर्यंत पोहोचण्यास . वाट तशी लक्षात येत नाही . कारण उभाच असा कडा आणि ते गर्द दाटीचे रान .
ढासळ लेल्या त्या बुरुजापर्यंत पोहोचलो म्हणजे आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलो अस समजायला काहीच हरकत नाही .
पूर्ण गडाला प्रदिक्षणा मारण्यास अन गड पाहण्यास  आम्हाला २ तास लागले अन  अर्धा तास जेवायला म्हणजे अडीच तास . गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत . पण त्या बहुतेक कोरड्याच . गडावर मला आवडली वास्तू म्हणजे तटबंदी . एकदम भक्कम आणि अजून सुद्धा जशीच्या तशी शाबूत . 




दुसरी गोष्ट म्हणजे हनुमांचे शिल्प .
गडावर एक शिवमंदिर  आहे. पण तेही पडझड झालेलं .



पण मंदिर हे मंदिर असत . नेहमीच चैतन्य निर्माण करत .
गड पाहून झाल्यावर आम्ही दुपारी ३ दरम्यान पुन्हा त्याच लोहगड विसापूर खिंडीपाशी आलो . अन तिथून पुन्हा मग लोहगड कडे मार्गीस्थ झालो .
थोडा लिंबू पाणी वगैरे घेऊन आम्ही गड सर करण्यास सज्ज झालो . सुरवातीस गणेश दरवाजा मग नारायण दरवाजा , हनुमान दरवाजा अस करत आम्ही महादरवाजा पार केला .
वर यता येता अस कळलं कि गडाचा दरवाजा हा संध्याकाळी ५:३० दरम्यान बंद होतो .
त्यामुळे आम्ही पटापटा पाउल पुढे टाकू लागलो.
सुरवातीच मंदिर अन मशीद पाहून झाल्यावर आम्ही विचू काट्याच्या दिशेन निघू लागलो .




















तिथे गेलो तेंव्हा एक जोडी उगाच नको ते चाळे करत बसले होते आमची चाहूल लागताच ....... गप्प बसले .
अशा  लोकांना अशीच जागा का मिळते . पवित्र जागेची पवित्रता घालवतात. ...नको ते चाळे करून, 
विचू काटा येथे जाण्यागादोर मी माझ्या निकोन कॅमेराचा कव्हर कुठेतरी विसरलो ...
कुठे पडला कि कुठे ठेवला लक्षातच नाही . त्यामुळे एक मोठ नुकसान झाल .

एक गोष्ट मात्र ह्यातून शिकलो ते म्हणजे स्वतःच्या वस्तू स्वताहा सांभाळायला हव्यात .
गड पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा खाली उतरलो आता सायंकाळचे ठीक ५:३० झाले होते . 
थोडा वेळ आम्ही पायर्यांजवळ बसलो सकाळपासून चालतच होतो चालतच हतो . म्हणून जरा पाय दुखावले होते .
अजून एक ते दीड तास मळवली स्थानकापर्यंत पायी जायचे होते .

त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन . आम्ही ५:४५ ला निघालो अन ६:४५ ला मळवली स्थानकात पोहोचलो ते धावत पळत कारण ट्रेन फलाटावर आली होती आणि अजून आम्हाला तिकिटे काढायची होती . अन अजून माही स्थानकापर्यंत पोहोचलो न्हाव्तो म्हणून ट्रेन दिसताच पळत सुटलो. 

अन 'विदाउट तिकीट फुल टाईम पास' ने लोणावळा स्थानकात हजार झालो . 
आसपास नजर इकडे तिकडे फिरवत कुणी टीसी नाही ना ह्याची खात्री करत आम्ही लोणावळा स्थानकातून बाहेर निसटलो ते थेट लोणावळा एस टी स्थानकात .

तिथून मग रात्री ८:०५ ला ठाणे एस टी ने खोपोली ला उतरलो अन मग खोपोली हून रात्री १० च्या लोकल ट्रेन ने रात्री उशिरा १२ च्या नंतर घरी पोहोचलो .
असा हा ट्रेक ........एका दिवसात दोन किल्ले पाहून झाले .

संकेत य पाटेकर
२८.०५.२०१२
सोमवार