सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

मृगगड - एक तुफानी ट्रेक (१५ ऑगस्ट २०१२ )




आजवर इतके ट्रेक केले .....पण हा त्यात फारच निराळा ठरला .....
तस पाहयला गेले तर ...प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेग वेगळा आणि अविस्मरणीयच असतो .
पण आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच पण जरा त्याहुनी वेगळा अन अविस्मरणीय असा ठरला. 

वाट चुकण्यात जो आनंद असतो ना ...तो नेहमीच्याच रुळलेल्या वाटेने जाताना नाही मिळत ,
एक वेगळी वाट अन ते धाडस ......नेहमीच अविस्मरणीय अन ...तुफानी ठरत.

पहिल्यांदा घोरपडी सारख ....हात अन पाय दोघांचा उपयोग करून ....निसरड्या गवतातून आणि माखलेल्या चिखलातून . भर पावसात ....सरींचा मारा खात ...अन एक एक पावूल हळूच सावकाश ...टाकत ....मनाचा तोल सांभाळत ...ती उभी निसरडी ...आणि एक बाजूला खोल दरी असलेली ती चढण चंदू लागलो.

काही वेळातच कसे बसे माथ्य्वर पोहोचलो ....खरे ...........पण
वर पोहोचताच कळलं.....कि आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे .....चुकीच्या डोंगरावर ...
समोरून च मृग गड दिसत होता ...जिथे आम्हाला खरे जायचे होते .....

आमचा बरासचा वेळ आता वाया गेला होता . आणि महत्वाच म्हणजे आलो त्या वाटेने पुन्हा जाने म्हणजे
खूपच रिस्की वाटू लागल होत.कारण कुठूनही वाट न्हवती .....सगळीकडून उभी खोल दरी ...

चढण खूप सोप असत ...पण उतरण फार कठीण......
शेवटी नाईलाज म्हणून ...पुन्हा त्याच वाटेने .... उतरायचं ठरलं ...आणि
पुन्हा ते धाडस करून कसे बसे ...आम्ही खाली उतरलो.
अन दुसर्या वाटेने जाऊ लागलो ..एका डोंगराला वळसा घेत ...

पुढे काही वेळातच एक गुहा दिसली. एका वेळी एकंच माणूस त्यात जाईल अशी ती गुहा...
अशा गुहे मध्ये जाण्यात मला नेहमीच फार उत्सुकता असते. त्या उत्सुकतेतच मी त्या गुहेत जाण्याच ठरवले ....आणि एका हाती torch घेऊन .....पुढे पुढे जाऊ लागलो .
ती गुहा सरळ सरळ पुढे गेल्यावर उजवीकडे वळते आणि तिथून पुन्हा ती खाली जाते खालच्या दिशेने आणि 
तिथून पुन्हा सरळ ....आणि पुन्हा कुठे वळते ते ठाऊक नाही .....
कारण त्याच्याही पुढे जाण्यचे धाडस न्हावतेच ...कारण अचानक समोरून काही प्राणी म्हणा किंवा इतर काही आले तर त्वरित मागे फिरणे ......फारच कठीण आणि जीवावर बेतणार ठरू शकत. म्हणून पुन्हा मागे फिरलो .
अन गडाची वाट पकडू लागलो .
थोड्या वेळात पुन्हा एक चढण आली ....आणि त्या उभ्या दगड धोंड्यानच्या घळी मधून आम्ही वर आलो . आणि समोरच ते दृश्य पाहून .....त्या खडकात खोदलेल्या पायर्या पाहून तो आनंद आमचा गगनात मावेनासा झाला .....


कसे गेलो :
ठाणे ते खोपली - (२ तास )
लोकल ट्रेन (ठाण्याहून )
पहाटे : ५:११ ते ७:००

खोपोली ते परळी (अर्धा ते पाऊन तास )
एसटी
सकाळी : ७:२० ते ८:१० ते ८:१५

परळी ते भेलीव ( अर्धा तास )
टमटम :दहा आसनी रिक्षा
सकाळी : ९:३५ ते १०:०५

भेलीव(गडाच्या पायथ्याच गाव ) ते गडमाथा
सकाळी १०:०५ ते दुपारी 1:३०
आमचा बरासचा वेळ वाया गेला चुकीच्या वाटेने गेल्यामुळे त्यामुळे इथे अधिक वेळ लागला ,
अन्यथा १ तासात आपण गडाचा माथा गाठू शकतो.

गडाकडे जाणारी वाट:
गडाकडे जाणारी खरी वाट हि भेलीव गावाच्या थोड्या वर असलेल्या कातकरी वाडीतून जाते . हि वाट थेट आपणास एका घळी पर्यंत पोहचवते मग तिथून वर आलो कि समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात . त्या पायऱ्या चढत आपण गडावर प्रवेस करतो .

गडावर प्रवेस करत असताना आपणास थोडी फार तटबंदी दिसते .
आपण जिथून प्रवेश करतो तिथेच त्याच्या उजव्या हाताला महिशासुर्वार्दिनी च एक शिल्प आहे आणि मधेच एक तडा गेलेली शिवपिंड दिसते . आणि त्याच्या बाजूला हाती डमरू आणि त्रिशूल असलेल एक शिल्प.
तिथून सरळ पुढे पुढे जात आपण २ टाक्यां जवळ पोहोचतो. त्या दोन टाक्याच्या मधून थोडा पुढे आलो कि समोरील सुंदर परिसर न्ह्याहालाता येतो .

संकेत य.पाटेकर
२७.०८.२०१२

परळीत पोहोचल्यावर थोडी पोट पूजा करत असताना आम्ही
डावीकडून हेमंत.. मी ..आणि लक्ष्मण



मृगगड आणि एकीकडे मोराडीचा सुळका...

मृगगड...




आम्ही चौघे ....आणि पाठीमागे मोराडीचा सुळका...




























मी ..




























दगड धोंड्यातून उभी चढ चढत असताना ....


मोराडीच्या सुळक्याकडे ..........लक्ष्मन आमचा लक्षा उर्फ मेन इंजिन..


























डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य..

गडाकडे कूच करताना ...मृग गडाचा map पाहताना...

हेमंत ...किशोर आणि लक्ष्या उर्फ बाळू दा...

एका बाजूला खोल दरी ....आणि निसरड्या ओल्याचिंब गवतातून त्या मातीतून सावकाशपणे पाउल ठेवत खाली उतरताना .....
गडाकडे जाणारी वाट..

हीच ती..............वेडी वाकडी ....गुहा..




























गुहेच्या आत जात असताना .......मी...
ह्या घळी तून वर गेल्यावर ...समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात ..तिथूनच गडावर जाता येते. 





































ओसंडून वाहणारा आनंद ..............

गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या...

पायऱ्या चढत असताना ............दगडात कोरलेले एक शिल्प दिसत. 

महिषासुर्वार्धिनी देवी.




































महिषासुर्वार्धिनी देवी ....शिवपिंड आणि एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 

एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 



































पाण्याच दोन टाकं..

समोरील दृश्य..

मृगगड

अंबा नदीच्या पात्रात ,…

अंबा नदीवरील अरुंद पूल...



अंबा नदीवरील अरुंद पूल..



मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते ( भेलीव पासून काही अंतर पार केल्यावर माणगाव लागते )

सकाळ वृत्त पत्रात आलेली मृगगडाची/ भेलीवचा किल्लाची माहिती. 












शनिवार, ३० जून, २०१२

सह्याद्री ...सह्याद्री ..सह्याद्री !!!


सह्याद्री ..सह्याद्री ..सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप ,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग ....

सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज...
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा ....
रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ....,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ...
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ...

सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा ....हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .

असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग''
मला नेहमीच वेडं लावतं .

संकेत य पाटेकर

३० जून २०१२












सोमवार, १८ जून, २०१२

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

प्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार

पाउस - जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही ...जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो ..आणि मग शब्दांचा भडीमार आपल्यावर ओढावून घेतो बहुदा त्याला दुसर्याचा राग ओढावून घेणे आवडत असाव. ...
असो प्रबळ गडास जाण्याच मुहूर्त जानेवारी पासून शोधत होतो. पण मुहूर्तच सापडेना .
 जेंव्हा जेंव्हा ठरवायचो तेंव्हा तेंव्हा काही ना काही अडचण येत असे.
















पण ह्या वेळेस मात्र मुहूर्त सापडला . आणि प्रबळगड सर सुद्धा केला . पण पाऊसाने नको त्यावेळी येऊन आमची फार निराशा केली .
गडावर फक्त पावसाच थैमान,घनदाट रान, ती शांतता , त्यात आम्ही फक्त तिघे , मधेच माणसाने शिटी वाजवी तश्या आवाजात ओरडणार्या त्या पक्षाचे सुंदर आवाज , एक वेगळाच आनंदीय क्षण

समोरचं परिसर काळ्या पांढर्या ढगांनी व्यापून गेला होता. समोरच दृश्यच दिसत न्हवत . फक्त काळ्या पांढर्या रंगाचे थर आणि झोंबणारा थंडगार वारा आणि सोबत पाउस

आमची सुरवात मात्र दमदार झाली......
पहाटे लवकर ठाण्याहून पहिल्या वाशी ट्रेन ने आम्ही निघालो. पनवेल एस टी डेपो तून सकाळी ७ वाजता सुटणारी ठाकूरवाडी एस टी ने जायचं होत. (ठाकूरवाडी हे गडाच्या पायथ्याच गाव, त्यापुढे हि प्रबळ माची म्हणून गाव आहे.) .

आम्ही तिघे म्हणजे मी किशोर आणि आमचा बाळू दादा म्हणजेच लक्ष्मण आम्ही ७ च्या अगोदर पाच - दहा मिनिटे पनवेल डेपोत पोहोचलो . नि एसटी ची चौकशी करण्यास चौकशी खिडकी कडे गेलो. तेंव्हा मास्तर कडून कळले कि . ठाकूरवाडी करता जाणारी एस टी तीन दिवस झाले बंद आहे . तीन दिवसापूर्वी एस टी वाहन चालकाला तिथे मारहाण केली त्याबद्दल त्यांनी एस टी बंद केली होती. आम्ही मनात म्हणालो कि ह्याच वेळेस का अस झाल .
आता कसे जाणार ? हा प्रश्न देखील पडला होता ? तेंव्हा मग किशोर म्हणाला आपण शेडुंग फाट्या पर्यंत एस टी ने जावू तिथून मग रिक्षा ने ठाकूरवाडी पर्यंत .
आम्ही वडगाव हि एस टी ने शेडुंग फाट्या पर्यंत पोहोचलो. तिथून रिक्षाने ठाकूरवाडी ....शेडुंग ते ठाकूरवाडी त्या तीन आसनी रिक्षावाल्याने आम्हाकडून ८० रुपये घेतले . अंतर अवघ ८ किलोमीटर होते . पण आम्ही देऊ केले . कारण आमच्या मध्ये तसे भाव कमी जास्त करणं ....कोणाला पटवण जमत नाही जे आहे ते द्यायचं ......ह्या वृत्ती पायी रिक्षा वाल्याने ८० रुपये होतील ...हे सांगितल्यावर काही कमी जास्त न करता सरळ रिक्षात बसलो. नि १५ मिनिटा मध्ये ठाकूरवाडी गावात पोहोचलो.

ह्या पूर्वी म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही इथेच आलो होतो .कलावंतीण चा सुळका सर करण्यास , त्यामुळे प्रबलमाची गावा पर्यंत जाणारी वाट आम्हास माहित होती. आम्ही त्या वाटेने पुढे पुढे सरसू लागलो .

पावसाचे तसे चिन्हे काही दिसत न्हवती . डोंगरांनी मात्र हिरवाईचा पांघरून अंगावर ओढावून घेतला होता, वातावरण पण कस थंडगार होत.हवा खेळती होती , डोंगरातील खळ्या मात्र अजून पांढर्या शुभ्र धवल धबधब्याने खळखळ नारया झरया ने स्पर्शित न्हवती.



पहिल्या पावसातल्या पहिल्या सरीत उगवणारी आणि अवघे १० -१५ दिवस राहणारी शेवला (भाजी )जागोजागी चालताना इथे तिथे दिसत होती .


















प्रबळमाची गावात शिरताच आमच तिथल्या गावकी कुत्र्याने भुंकत भुंकत स्वागत केल.
एक छोटा मुलगा आणि त्याची मोठी बहिण कुठला तर खेळ खेळत होते.
पुढे एक छोटस खोपट होत. त्याच्या जवळ एक फलक लावला होता.
आमच्या इथे जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था केली जाईल . त्या फलकाला माझ्या कॅमेरात बंदिस्त करून आम्ही पुढे निघालो .
आता मात्र पाउस पडण्याची चिन्हे उभी होती . कलावंतीण सुळका आणि प्रबळ गडाला ढगांनी आपल्या पंखात लपवलं होत. त्यात कलावंतीण चा सुळका त्या पंखातून हळूच बाहेर पडत आमच्या कडे जणू डोकावून पाहत होता अस जाणवत होत. मला तेंव्हा राहावल नाही आणि तो क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी कॅमेरा चालू केला आणि क्लिक करायच्या आत कसला तरी आवाज आला नि कॅमेराच्या पडद्यावर मेसेज आला.....''लेन्स एरर ''
ह्या पूर्वी २ वेळा लेन्स बदलून आणली होती ....आता पुन्हा लेन्स प्रोब्लेम ....मन निराश झाल.
कारण माझ्याशिवाय दुसर्या कुणाकडे कॅमेरा न्हाव्ताच.
आणि त्यात ते वातावरण इतक आल्हादायक होत ...........कस सांगू.

कॅमेराच दुख मनात ठेवून पुढे चालत राहिलो . एव्हाना पावसाच आगमन झाल होत . तो आमच्या वर बरसत होता अगदी रिमझिम करत ......,
गावातून जात असता गावाच्या उजवीकडच्या वाटेने आपणास प्रबळ गडाकडे जाता येते .
मळलेली वाट आहे ...तरी सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते ...कारण एकाच वाटेतून १-२ वाटा फुटतात आणि तिथेच आपण फसलो जातो.
आम्ही सुरवातीलाच फसलो नि प्रबळगडाच्या उभ्या सरळ सोट कड्या खाली आलो उभा चढ चढत एका वेगळ्याच अनवट वाटेने...

























तिथून आसपासचा परिसर किती मोहक दिसत होता .त्यात आम्हास पावसाच्या सरीने न्हावू घातले होते . काळ्या कातळावरील ते खेकडू कड्यावरून ओसर्णारे पाणी पिण्यासाठी चिटकून बसले होते.

आम्ही कातळ कड्याच्या कडे कडे ने वाट काढत पुढे सरलो ...काही वेळाने आम्हास नेहमीचीच रुळलेली वाट दिसली जी गडाकडे जाणारी होती .. आम्ही एकदम RIGHT TRACK वर आहोत ह्याचा आनंद झाला. पुढे ती वाट पकडत आम्ही दगड धोंड्यावरून झाडी- झुडपातून पांढर्या ढगातून आणि रिमझिम नारया पावसाच्या सरीतून थंडगार वारा अंगावर घेत पुढे जावू लागलो .

प्रबळगडावर घनदाट रान आहे. उंच उंच दाटी दाटीचे झाडे झुडपे त्यातून ती मळलेली वाट, निरव शांतता , त्या शांततेत अजून तल्लीनता आणणारे , आपल्या गळ्यातून वेग वेगळा आवाज काढणारे पक्षी , पावसाने केलेला काळोख ... तो जो तिथला अनुभव, तो आनंद मनाला स्पर्शून जातो कायमचा.

पुढे एक मळलेली वाट पकडून आम्ही एका सपाट पठाराच्या टोकावर आलो . इथून मला वाटत कलावंतीण चा पूर्ण सुळका दिसत असावा. पावसा मुळे आणि पांढर्या काळ्या थरामुळे आम्हास ते दृश्य दिसू शकले नाही. त्या ढगांनी सारा परिसर आपलासा केला होता.
आम्ही थंडीने कुड कुडत होतो . पावसाने ओलेचिंब झालो होतो. त्यात हा वारा अजून आमची चेष्टा करू पाहत होता . काही वेळ आम्ही तिथे पाउस कमी होईल नि सगळा परिसर स्वच्छ होईल ह्या आशेने तिथे थांबून होतो . पण पावसाचे चिन्ह कमी होत नाही हे पाहून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो .
येताना एका वाटेने आलो म्हणून जाते वेळी जरा दुसर्या वाटेने जायचे ठरविले . त्या वाटेने पुढे जात असता एक पाण्याच टाक लागल.पावसाने ते टाक भरलं होत.


थोड्या वेळाने 'त्याच वाटेने आम्ही आलो तेथून पुन्हा उतरलो . वर येताना झरे वगैरे ह्याच नाव हि कुठेच दिसत न्हवत पण खाली उतारते वेळी जागो जागी छोटे मोठे धब-धबे...
मन आवरेना तेंव्हा त्या झर्याच पाणी अंगा खांद्यावर घेत त्याचा मन मुराद आनंद लुटावयास लागलो. नि पुन्हा नेहमीच्या मळलेल्या वाटेने गड खाली उतरू लागलो.
पावसाने ह्या वेळेस खूप झोडपले आम्हास . आसपासच परिसर पाहण्यास सक्त मनाई केली होती त्याने आज ...

पण त्यातही आम्ही खूप आनंद घेतला ...निसर्गाच्या अद्भुत चमत्कारिक क्षणांचा .

संकेत य पाटेकर
१९.०६.२०१२




गडावरील हिरवळ :






















धुक्यात हरवलेली पायवाट :





















पावसाचा... निसर्गाचा आनंद घेत असताना मी ..

सोमवार, २८ मे, २०१२

लोहगड- विसापूर ट्रेक































ह्या आकड्यांची गंम्मतच असते खूप ....
सुरवातीस ट्रेक ला येणार्यांचा आकडा जरा जास्त असतो ...पण हळू हळू ..तो घसरू लागतो ...जसा शेअर बाझारात्ला निर्देशांक पटकन खाली यावा ......तसा .
ह्या ट्रेक बाबतीतही तसंच झाल. सुरवातीला बरेच आकडे होते ...पण आदल्या दिवशी पर्यंत आकडा ३ वर आला .
पण काय एकदा का मनात ठरवलेली गोष्ट हि पूर्ण करायची  म्हणून आम्ही तिघे मी लक्ष्मण आणि किशोर निघालो . ...रविवारी पहाटे ४:३० वाजता घरातून,निघालो एक वेगळी वाट पकडून ...

नेहमीप्रमाणे ठाण्याहून पहाटे ६:१५ मिनिटाची इंद्रायणी एक्स्प्रेस न पकडता पहाटे ५:१० मिनिटाने सुटणारी खोपोली ह्या लोकल ट्रेन ने आम्ही जाणायच ठरवलं .....कारण सुखकर प्रवास करायचा होता . 
मागच्या प्रवासाचा दांडगा अनुभव होता ...

खोपोली हून मग राज्य परिवहन एस टी ने लोणावळा तिथून मग लोकल ट्रेन ने मळवली अन मळवली हून पायी चालत ... गडाच्या माथ्यावर ..!
सकाळी ११:०० वाजे दरम्यान आम्ही त्या खिंडीत पोहोचलो. 
तिथून मग एक वाट विसापूर ला जाते अन दुसरी लोहगड कडे , लोहगड ह्या पूर्वी केला असल्यामुळे मी अगोदर विसापूर करायचे ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही मग विसापूर कडे धावू लागलो .


जाताना अनेक करवंदाच्या जाली पहावयाच मिळत होत्या आणि त्यावरील काळी काळी गोड रसाळ अशी करवंद ,ती खाता खाता आम्ही गडावर जाणारी मुख्य वाट सोडून आम्ही दुसर्याच दिशेने पुढे जावू लागलो .
ती गोष्ट काही वेळाने ध्यानात आली ...कारण वाट गडाकडे न जाताच दुसरी कडे जात होती .
आम्ही  मग मागे फिरलो. ..पुन्हा त्याच वाटेने ..पुन्हा ती टपोरी टपोरी छोटी मोठी गोड गोड करवंद खात
एका पायवाटेने रानातल्या त्या गर्द झाडीमध्ये त्यांच्या सावली मधून वाट पुढे काढत दगडांच्या राशी एक एक पार करत एका ढासळ लेल्या बुरुजापर्यंत आम्ही पोहोचलो.




























फार फार २० ते २५ मिनिटे लागली तिथपर्यंत पोहोचण्यास . वाट तशी लक्षात येत नाही . कारण उभाच असा कडा आणि ते गर्द दाटीचे रान .
ढासळ लेल्या त्या बुरुजापर्यंत पोहोचलो म्हणजे आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलो अस समजायला काहीच हरकत नाही .
पूर्ण गडाला प्रदिक्षणा मारण्यास अन गड पाहण्यास  आम्हाला २ तास लागले अन  अर्धा तास जेवायला म्हणजे अडीच तास . गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत . पण त्या बहुतेक कोरड्याच . गडावर मला आवडली वास्तू म्हणजे तटबंदी . एकदम भक्कम आणि अजून सुद्धा जशीच्या तशी शाबूत . 




दुसरी गोष्ट म्हणजे हनुमांचे शिल्प .
गडावर एक शिवमंदिर  आहे. पण तेही पडझड झालेलं .



पण मंदिर हे मंदिर असत . नेहमीच चैतन्य निर्माण करत .
गड पाहून झाल्यावर आम्ही दुपारी ३ दरम्यान पुन्हा त्याच लोहगड विसापूर खिंडीपाशी आलो . अन तिथून पुन्हा मग लोहगड कडे मार्गीस्थ झालो .
थोडा लिंबू पाणी वगैरे घेऊन आम्ही गड सर करण्यास सज्ज झालो . सुरवातीस गणेश दरवाजा मग नारायण दरवाजा , हनुमान दरवाजा अस करत आम्ही महादरवाजा पार केला .
वर यता येता अस कळलं कि गडाचा दरवाजा हा संध्याकाळी ५:३० दरम्यान बंद होतो .
त्यामुळे आम्ही पटापटा पाउल पुढे टाकू लागलो.
सुरवातीच मंदिर अन मशीद पाहून झाल्यावर आम्ही विचू काट्याच्या दिशेन निघू लागलो .




















तिथे गेलो तेंव्हा एक जोडी उगाच नको ते चाळे करत बसले होते आमची चाहूल लागताच ....... गप्प बसले .
अशा  लोकांना अशीच जागा का मिळते . पवित्र जागेची पवित्रता घालवतात. ...नको ते चाळे करून, 
विचू काटा येथे जाण्यागादोर मी माझ्या निकोन कॅमेराचा कव्हर कुठेतरी विसरलो ...
कुठे पडला कि कुठे ठेवला लक्षातच नाही . त्यामुळे एक मोठ नुकसान झाल .

एक गोष्ट मात्र ह्यातून शिकलो ते म्हणजे स्वतःच्या वस्तू स्वताहा सांभाळायला हव्यात .
गड पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा खाली उतरलो आता सायंकाळचे ठीक ५:३० झाले होते . 
थोडा वेळ आम्ही पायर्यांजवळ बसलो सकाळपासून चालतच होतो चालतच हतो . म्हणून जरा पाय दुखावले होते .
अजून एक ते दीड तास मळवली स्थानकापर्यंत पायी जायचे होते .

त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन . आम्ही ५:४५ ला निघालो अन ६:४५ ला मळवली स्थानकात पोहोचलो ते धावत पळत कारण ट्रेन फलाटावर आली होती आणि अजून आम्हाला तिकिटे काढायची होती . अन अजून माही स्थानकापर्यंत पोहोचलो न्हाव्तो म्हणून ट्रेन दिसताच पळत सुटलो. 

अन 'विदाउट तिकीट फुल टाईम पास' ने लोणावळा स्थानकात हजार झालो . 
आसपास नजर इकडे तिकडे फिरवत कुणी टीसी नाही ना ह्याची खात्री करत आम्ही लोणावळा स्थानकातून बाहेर निसटलो ते थेट लोणावळा एस टी स्थानकात .

तिथून मग रात्री ८:०५ ला ठाणे एस टी ने खोपोली ला उतरलो अन मग खोपोली हून रात्री १० च्या लोकल ट्रेन ने रात्री उशिरा १२ च्या नंतर घरी पोहोचलो .
असा हा ट्रेक ........एका दिवसात दोन किल्ले पाहून झाले .

संकेत य पाटेकर
२८.०५.२०१२
सोमवार







बुधवार, ४ एप्रिल, २०१२

कळसुबाई ट्रेक - माझ्या शब्दात


"मनात केंव्हा पासून इच्छा होती' महाराष्ट्रातील सर्वात उंच , महाराष्टाची शान असलेला ''कळसुबाई शिखर सर करायचा. आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरच खूप अभिमान वाटतो आहे.
प्रत्येक ट्रेकर्स च स्वप्न असत महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपल पाउल ठेवायचं .

दिनांक ८/3/२०१२ म्हणजे गुरवार, होळीचा दिवस माझे दोन खास मित्र 'हेमंत कोयंडे' आणि 'ओंकार कदम' हे सहजच म्हणजे भेटण्यास अन ट्रेक विषयक बोलण्यास घरी येणार होते. घरातले सर्वजण त्यादिवशी दुपारीच गावी गेले होते, त्यामुळे घरी मी एकटाच होतो.
मित्र येणार म्हणून घरातील इतरत्र पसरलेल्या वस्तू आपआपल्या जागी ठेवत त्यांच्या येणाची मी वाट पाहत होतो. रात्री उशिरा १०:३० दरम्यान हे दोघे मित्र आले. आणि आमच्या गप्पांना उत आला. त्यामध्ये 11:३० झाले तेच कळलंच नाही.

घरातून निघताना हेमंत ने सहजच ''कळसुबाई ट्रेक' करण्याविषयी सांगितल '' आणि त्याच्या त्या सांगण्याला मी लगेचच होकार देखील देऊन टाकला. खर तर मी प्रबळगड किंवा घनगड करायच्या विचारात होतो. पण कळसुबाई च नाव येताच बाकी विचार मनातून काढून टाकल. कारण महाराष्ट्रातील ह्या सर्वात उंच शिखरावर जाण्याची केंव्हा पासून माझी इच्छा होती. आणि ती इच्छा आता पूर्ण होणार होती.

कळसुबाई शिखरावर शिक्कामोर्तब करून झाल्यावर त्याविषयी माहिती वगैरे गोळा करण्यास सुरवात मी केली .
सर्वप्रथम आमचा ग्रुप लीडर '' निलेश हळदणकर' ह्याला फोन करून माहिती मिळवली.
आणि त्यानंतर इंटरनेट च्या माध्यमातून अनेकांचे ब्लोग वाचून त्याविषयी माहिती मिळविली.
ह्या इंटरनेट ब्लोग चा खरच खूप उपयोग होतो.
कुठे अनोळखी ठिकाणी जात असता हे अनेकांचे ब्लोग आपल्याला खरच मार्गदर्शक ठरतात.

ट्रेक च्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी सर्व माहिती वगैरे मिळवून मी आणी माझे मित्र हेमंत, ओंकार , लक्ष्मन , किशोर, आम्ही कळसुबाई सर करण्यास सज्ज झालो.

ठाण्याहून रात्री १२:१० मिनिटांनी सुटणारी अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून आम्ही प्रवास करणार होतो. ठरल्याप्रमाणे सारे एकत्र आलो आणि अमृतसर एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशनला ठीक पहाटे २:३० ला पोहोचलो. ते श्वास मोकळा सोडूनच. डब्यामध्ये पाउल ठेवण्यासही जागा न्हवती. कसे डब्यात आम्ही शिरलो ते आमच आम्हालाच माहित. कोण एका पायावर उभा होता .त कोण कसा नि कसा वर्णन नाही करू शकत. त्यात पण एकाची धुलाई चालू होती. ठाण्यात दरवाजा उघडला म्हणून त्याला बिचार्या त्या म्हाताऱ्या (इतका हि न्हवता म्हातारा ) व्यक्तीला मारहाण चालू होती, खर तर त्या व्यक्तीमुळे आम्हाला आत शिरता आल. दरवाजा उघडला म्हणून .....नाहीतर सर्व पुढचा प्लान चौपट झाला असता.

असो , सुरवातीचाच प्रवास आमचा असा दमछाक करणारा झाला. पुढे इगतपुरीला उतरून आम्ही गरमा -गरम वडां पाव अन कांदाभजी फस्त करून ५-१० मिनिटे आराम करून इगतपुरी एसटी डेपोच्या दिशेन वाटचाल करू लागलो.
इगतपुरी स्टेशन च्या पश्चिमेला डांबरी रस्त्याने रेल्वे रुळाच्या समांतर नाशिकच्या दिशेने ५-१० मिनिटावर एसटी डेपो आहे.
रस्त्याने जात असता आपणास एक सुंदर देऊळ लागत. त्याच्या थोड्या पुढेच हा एसटी डेपो आहे .
नाव गाव काही नाही. सुरवातीला आम्हाला कळतच न्हवत. हाच आहे का डेपो ते .नूतनी करणाच काम हाती घेतलं असाव बहुदा.
सकाळी ५:०० ची पहिली एसटी आहे हे मी नेट वरूनही माहिती करून घेतलं होत.
पहाटेचे ३ वाजून ५ मिनिटे झाली होती अजून २ तास आम्हाजवळ होते. त्यामुळे आम्ही मस्तपैकी ताणून दिली म्हणजे झोपी गेलो. पण तेही काही वेळेसाठीच कारण राक्षस मच्छरांनी त्रास देण्यास सुरवात केली होती.आणि थंडीचा पारा देखील हळू हळू वाढला होता , मग झोप कसली येते.
पहाटेचे ५ वाजून गेले होते आता नि अजून एस टी चा पताच न्हवता. ५ चे ५:३० झाले तरीही नाही.
आम्ही मग कुठे चहा मिळतोय का ते पाहण्यसाठी निघालो नि एस टी डेपोच्या बाहेरच एक चहा च छोटास दुकान दिसलं. त्या कडकडीत थंडीत आम्हाला चहाची नितांत गरज होती. गरमा गरमा चहा पिऊन झाल्यावर १-२ मिनिटातच म्हणजेच ठीक ५:४५ मिनिटांनी आमची म्हणजेच बारी गावाकरिता बारीगाव दिशेने जाणारी एसटी stand समोर उभी होती.
पटापट एस टी मध्ये बसून निसर्गाच ते पहाटेच डोंगर दर्याचं सुंदर रूप पाहत पाहत आम्ही बारी गावात उतरलो ते ठीक ६:४५ मिनिटांनी .



सुरवातीची रस्त्यालगतची ती पाटी आमचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी सज्जच होती.
कळसुबाई शिखर - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर १६४६ मीटर . त्या पाटी जवळ ग्रुप फोटो काढून आमची पाउल बारी गावाच्या दिशेन कळसुबाई कडे पुढे पुढे सरसाऊ लागली.
वाटेत जाताना रस्त्याच्या उजवीकडे एक छोटस मंदिर दिसलं त्याच्या शेजारी काही दगडी शिल्प होती. ते सर्व कॅमेरा मध्ये कैद करून पुढे जात असता एक मोठी विहीर लागली.
गावातल्या काही काकू काकी मावशी पाणी भरत होत्या . त्यांच्या कडून आम्ही आमच्या रिकाम्या बॉटल्स भरून घेतल्या. आणि पुढे सरसावलो.

काही वेळाने गावातून जात असताना एका दुकाना शेजारी काही विरगळ दगडी शिल्प दिसली .त्या शिप्लान्चा अर्थ मात्र समजू शकलो नाही .त्याचे फोटो काढून आम्ही पुढे जावू लागलो . आता आमच्या सोबत आणखीन एक नवीन पार्टनर सहभागी झाला होता तो म्हणजे रामू (गावातील एक प्रामाणिक कुत्रा )



आता कुठे चढण सुरु झाली होती. आणि सूर्यदेवाच हि आगमन झाल होत. आम्ही एक एक पाउल झप-झप पुढे पुढे टाकत मार्गीक्रमण करत होतो.

सकाळी ६:४५ ला आम्ही बारी गावातून सुरवात केली ते ठीक १०:३५ मिनिटाने आम्ही कळसुबाई ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पोहोचलो. एखाद्या लढाईत विजय मिळाल्यावर जो आनंद मिळतो. तसाच काहीसा विजयी आनंद आम्हाला झाला. वर येताना चार लोखंडी शिड्या लागल्या त्यातील तिसरी शिडी एका उंच अवघड वाटेवर आहे.


आणि ती बरीच लांब आहे. चौथी शिडी हि आपणास कळसुबाई मंदिरा जवळ नेते . मंदिरा शेजारीच एक लाब लचक लोखंडी साखळी अशीच खाली सोडून दिली आहे. ती ओढण्याचा आम्ही प्रत्येकाने पर्यंत केला . अस ऐकल आहे कि ती साखळी जो पूर्ण वर पर्यंत ओढतो त्याची इच्छा पूर्ण होते . 
(आता ते खर कि खोटं ते माहित नाही )





























कळसूआईच दर्शन घेत , आम्ही सर्वांनी ती साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात फक्त ओमकार नि पूर्ण वर पर्यंत साखळी ओढली . साखळी ओढण्याचा कार्यक्रम झाल्यावर अवतीभोवती च डोंगर दर्याचं ते सुंदर रूप डोळ्यात सामावून नि कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही तिथे असलेल्या मुलांन कडून लिंबू पाणीचे दोन ग्लास प्रत्येकी प्राशन करून थोडा वेळ विसावलो .


दुपारचे आता ठीक बारा वाजले होते . सूर्य हि माथ्यावर आला होता. आता निघायला हव होत. कारण वेळेच्या आत घरी परतून दुसर्या दिवशी (मी सोडून)प्रत्येकाला कामावर जायचं होत . त्या ह्याने मी बाकीच्यानां उठवलं. कळसू आईला प्रणाम करून बारी गावाच्या दिशेने त्याच लोखंडी शिडी मार्गे आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
साधारण २:३० पर्यंत आम्ही बारी गावात उतरलो. आमच्या सोबत कळसुबाई शिखर सर करणारा रामू ह्याचा निरोप घेऊन आम्ही काळ्या निळ्या जीपने शेंडी गावात आलो . बारी ते शेंडी हे साधारण २० मिनीटाच अंतर आहे . प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे काळ्या निळ्या जीपने इथवर येता येत. इथून पुढे काही अंतर चालत गेल्यावर भंडारदराच विहंगमय सुंदर अस रूप आपणास न्हाह्यालाता येत. त्याच बरोबर बोटिंगची हि मजा लुटता येते एका फेरीची २०० रुपये .
आम्ही साधारण दुपारी ३:०५ दरम्यान शेंडी गावात उतरलो . सकाळपासून फक्त चटर फटर जे घरून आणल होत त्यावरच आम्ही आमची भूख भागवत होतो . शेंडी गावात उतरताच अगोदर पोट पूजा उरकून घ्यायचं ठरवलं नि त्याप्रमाणे एका हॉटेल मध्ये जावून बसलो , गरमा गरम मेंदू वडा, वडा उसळ , पाव भाजी आणि सोबत कॉल्ड ड्रिंक्स वर ताव मारत आमची भूख आम्ही शामिवली .
शेंडी गावातून संध्याकाळी ५ ची कसारा करिता एसटी आहे. पण ती वेळेवर कधी असते किंव्हा नाही आणि आलीच तरी त्या मध्ये बसण्याकरिता जागा मिळेलच अस नाही . कारण येताना भरगच्च भरूनच ती येते शेंडी गावातून काळी निळी (काला नीला रंगाचा पट्टा म्हणून काळी निळी ) जीप देखील आहे ती तुम्हाला घोटी गावापर्यंत नेते . प्रत्येकी २५ ते ३० रुपयांमध्ये . तिथून पुढे मग एसटी ने कसारा गाठता येत.

आमची पोट पूजा उरकून वेळ अधिक असल्यामुळे आम्ही भंडारदरा Dam च्या दिशेने निघालो.

गावात रविवारचा बाजार भरला होता. त्यामुळे रस्त्यावर माणसाची वर्दळ होती . बाजारातील एक एक वस्तू पाहत पाहत आम्ही भंडारदरा Dam वर पोहचलो. भंडारदरयाच ते भव्य मोहक रूप पाहून माझ मन आवरेना मी लगेच मित्राला माझा एक फोटो काढण्यास सांगितल .


उन्हाची ती पांढरी शुभ्र किरण आणि जलाशयातील ते निळेशार तरंगमय पाणी यांच्या संगमाने डोळे दिपवून जात होते . समोरच रतनगड खुणावत होता . काही वेळ आम्ही तसेच स्तब्ध उभे होतो निसर्गातील ते रमणीय दृश्य पाहत .
मग हळू हळू आमचे पाउल त्या किनार्याकडे जावू लागले , समोरच एक प्रवाशी बोट जलाशयाची एक रमणीय फेरी मारून परतत होती . आम्ही काही वेळ जवळील कातळा जवळ बसलो , निखळ स्वच्छ निळेशार ...पाण्यातल ते आपल स्वतःच प्रतिबिंब पाहत . ..

काही वेळाने घड्याळाकडे लक्ष गेल, सायंकाळचे चाडे चार वाजले होते मग काय आमची पावलं पुन्हा झप झप त्याच मार्गे शेंडी गावातल्या एस टी स्टेन्ड जवळ येऊन थांबली .
५ वाजता कसारा साठी एस टी आहे हे आम्हाला बर्याच लोकां कडून कळल होत म्हणजे विचारपूस करतेवेळी.
परतीचा प्रवास म्हणजे मरगळ एक प्रकारची ....हा परतीचा प्रवास नेहमीच नकोसा वाटतो .
५ ला येणारी कसारा एस टी येता-येता पावणे सहा झाले. एस टी येते कि नाही ह्याने आमचा जीव खाली वर होत होता कारण दुपारी ३ वाजल्यापासून आम्ही शेंडी गावात होतो . आणि लवकरात लवकर घरी परतायचं होत . एव्हाना आमचा चहा पाण्याचा कार्यक्रम देखील उरकला होता.

एसटी समोर येताना दिसताच सारे जण आप आपल्यां साधन सामुग्रीनिशी सज्ज झाले. एका नव्या युद्धा साठी. हो नवं युद्धच कारण कासारया पर्यंत प्रवास करणारे प्रवाशी खूप होते. आणि एस टी हि येताना अगोदरच प्रवाशांनी भरून आली होती . त्यामुळे एस टी मध्ये उभं राहण्याकरिता जागा मिळण फारच मुश्कील झाल होत. नि आम्हाला काही हि करून ती एस टी पकडन भाग होत .
कसे बसे धक्का बुक्की करून बऱयाच हाल अपेष्टा सहन करत आमचा प्रवास झाला तो सगळा उभ्यानेच .


रात्री ८:०५ च्या दरम्यान आम्ही कसारा रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलो .
८:१५ मिनिटांनी CST करीता जाणारी ट्रेन फलाटावर उभीच होती. हेमंत ने पटापट रेल्वे तिकिटे काढली आणि धावत पळत पुन्हा आम्हास ती ट्रेन पकडावी लागली . आणि तिथून मग सगळे आप आपल्या घरी परतले .
आजचा कळसुबाई ट्रेक खरच अविस्मरणीय असाच होता . तो कायम लक्षात राहील माझ्याही आणि माझ्या मित्रांच्याही !!




संकेत पाटेकर
०४ एप्रिल २०१२
  
खर्च आणि वेळ :
1) ठाणे ते इगतपुरी (अमृतसर एक्स्प्रेस ) साधारण डबा
वेळ :- १२:१० pm ते २:३० am
३५ रुपये प्रत्येकी
2) इगतपुरी रेल्वे स्टेशन ते इगतपुरी डेपो (पायी चालत )
वेळ : २:५० ते ३:०० am
3) इगतपुरी डेपो ते बारी गाव (ST)
वेळ: ५:४५ am ते ६:४५ am
4) बारी गाव ते कळसुबाई माथा
वेळ:- ६:४५ ते १०:३५
5) कळसुबाई ते बारी गाव
वेळ:- १२:१५ pm ते २:३० pm
6) बारी गाव ते शेंडी
वेळ :- २:४५ pm ते ३:०५ pm
जीपने - १० रुपये प्रत्येकी
7)शेंडी गाव ते कसारा (ST)
वेळ:- ५:४५ ते ८:०५
8) कसारा ते ठाणे (लोकल ट्रेन)
वेळ:- ८:१५ ते



मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

सांदण दरी - माझा अनुभव

SANDHAAN VALLY - माझा अनुभव





































दोन दिवसाचा SANDHAAN VALLY प्रवास खरच खूप भन्नाट झाला , अजून अंग दुखतंय ,
पूर्णतः त्या VALLY तून प्रवास झाला , एक रात्र त्या VALLYT काढली, टपोर चांदण्यात , मन
कस खुश झाल, नाहीतर आपल त्या घरात कसल काय दिसतंय चांदन ?
कॉंक्रीट च छत ते , त्यात कुठे काय दिसणार ?
घराच छत कस चांदण्यांनी भरलेलं असाव , सुंदर काळे - निळे ढग , चांदो मामा, लुक लुक नारे तारे , सार काही दिसावं त्या छता मधून ...........
शनिवारी सकाळी ठीक ८ वाजून १५ मिनिटांनी आमचा प्रवास सुरु झाला.
वर उंच उंच कडे ...खाली लहान मोठाले दगड - मधेच कुठेतरी कमरे इतक पाणी, आणि त्या पाण्यातून डोक्यावर SACK घेत पुढे पुढे मार्ग काढणारे आम्ही....सार काही कस निराळाच ,मनाला ताज तवान करणार , हूरहुरी आननार ,
मधल्या त्या बेअर ग्र्यल्ल्स ची आठवण करून देणार , भन्नाट एकदम ..!!



VALLY उतरताना आम्हास तीन ROCK PATCH उतरावे लागले , ROPE च्या सहायाने , त्यातल्या दुसरा ROCK PATCH उतरताना मी दगडावर आदळलो, (दत्ता ने सांगितल होत कुठेही पाय ठेवू नको सरळ पाय खाली टाक म्हणून कुठेही पाय न टेकवताच ....सरळ धुडूम ) थोडी फार हाताला जखम करून घेतली. ...बस तितकंच,

VALLY च ते सुंदर दृश्य मनाला मोहित करत होत. निसर्ग हा निसर्ग खरच किती सुंदर आहे विविध अंगांनी तो फुललेला आहे. त्याच रुपच किती अनोख आहे , नुसत पाहत राहावं , त्याकडे टक मक टकमक बस , अप्सरा देखील त्याच्या पुढे मान झुकवेल आपली अस त्याच ते भव्य मनमोहक रूप मनाला एकदम फ्रेश करत.
निसर्गाशी खरच जवळीक साधावी , त्याच्याशी बोलाव , त्याकडून शिकावं , खूप काही दडलंय त्यात ,

सायंकाळी आम्ही दरी उतरलो आणि एका ठिकाणी थांबायचं म्हणजेच रात्र तिथे काढण्याच ठरवलं ,
त्या प्रमाणे एक जागा निवडली , आणि तिथे लाकड वगैरे गोळा केली, आणि प्रत्येकाच्या SACK मधील जेवनाच सामान बाहेर काढू लागलो , रात्रीच जेवण जे बनवायचं होत.
हळू हळू काळोख वाढू लागला तसं तसं थंडी हि वाढू लागली होती ,

जेवनाच सामान एकत्र करून जेवण हि तयार झाल .....आणि मग मस्त पैकी आमटी आणि भाताच चवदार एक एक घास पोटात जावू लागला . खूपच चवीस्ट स्वादिस्त जेवण केल होत.
पोट कस तृप्त झाल.
जेवून खावून रात्री टपोर्या चांदण्या पाहण्यात मी हरवून गेलो , आणि तिथेच झोपी हि गेलो ,
पहाटे लवकरच जाग आली तेंव्हा सारे कसे शांत झोपले होते.. थंड गार वारा सोडून, पाण्याचा खल खालाट आवाज (पुढे एक तलाव होता )सोडून कसलाच आवाज येत न्हवता .
मी थोडा वेळ उठून बसलो , आणि ते निसर्गाच रात्रीच मोहक रूप डोळ्यात साठवू लागल, असे हे क्षण क्वछितच येतात.
सकाळच मस्तपैकी पाय घसरून दगडावर पुन्हा आपटलो , आणि दुसर्या हाताला जखम करून घेतली, (ह्या वेली ब्रश करण्याकरीता गेलो होतो आणि चुकून पाय ओलसर जागेतून घसरला ).

कडक चहा - आणि चाविस्त फोडणीच भात खावून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला ,
आणि आमचा हा ट्रेक .........यादगार झाला ,
संकेत य. पाटेकर
दि. १९.१२.११




ट्रेन मधले आम्ही ..


Gang:-


मी आणि माझी बहिण ..


पाण्यातली वाट ...


चिडवताना ...दीप्ती


छोटे मोठे दगड धोंडे ...त्यातून मार्ग काढताना..


Rappelling Karatanaa....mi