बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

तांदुळवाडीचा किल्ला :अन निसर्गाची सुंदरता Tandulwadi trek



















सफाळे ( विरारच्या २ स्थानक पुढे ) ह्या पच्छिम रेल्वे स्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड , तांदूळगड.

एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीच नागमोडी वळनाच नयनरम्य दृश्य , मनाला सुखद अनुभव देतो. मन कस त्या निसर्गाशी एकरूप होवून जातं .

सफाळे स्थानका पासून एसटीने ..दुर्तफा दाट भरगच्च झाडीच्या हिरवळीतून , वळणदार नागमोडी डांबरी रस्त्याने ..   घाट माथा  चढत १५ मिनिटात आपण पोहोचतो ते तांदुळवाडी ह्या गावात.

गावातून एक वाट ..शाळेजवळून .... कॉनक्रिट च्या रस्त्याने ...आनंद दिघे साहेबांची प्रतिमा असलेल्या अन विविध पारितोषिकांनी सजलेल्या त्या कार्यालया जवळून पुढे होत जाते . तिथून  साधारण १ तासात गड माथा गाठता येतो.  

सुरवातीला दगडांच्या राशी पार करत  आपण पुढे पुढे चालू लागतो .  १५- २०मिनितात  आपण एका पठारावर  येऊन  पोहोचतो . येथून आपल्याला 'सुळक्याच अन त्यावरील मळलेल्या वाटेचं सुंदर दृश्य दिसत'. ते नजरेत   टिपत पुढे व्हायचं. . काही वेळेतच त्या सुळक्यावर जाणारी चढण सुरु होते.  
हळू हळू पाउल टाकत अन निसर्गाच विस्तीर्ण मनमोहक दृश्य पाहत , थंड  हवेचा जोरदार मारा खात पाऊलं पुढे सरत राहतात.   

पुढे अजून दोन - तीन चढणीचे टप्पे  पार करून .   ५ फुटापेक्षा उंचावलेल्या गवती पात्यांपासून , मळलेल्या पाय  वाटेने आपण गडावर पोहोचतो.



गडावर '' सप्त हंडी म्हणून ओळखल्या जाणर्या ...७ पाण्याच्या टाके आहेत.

तसेच काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत. 
पावसाळ्यात गडावर आजुबाचुच दृश्य दिसन खर तर भाग्याच असत ...कारण पांढऱ्या शुभ्र धुक्यानी . गड नेहमीच काबीज केलेला असतो. पण ते भाग्य आम्हाला काही लाभल नाही.

काही वेळ गडावर फिरून  जेथून आम्ही आलो त्या वाटेने न जाता त्याच्या दुसर्या वाटेने त्या घनदाट जंगलातून मार्ग शोधत शोधत २ तासात गडाला एक वळसा घालत तांदुळवाडी - चावरेपाडा ह्या गावाच्या विहिरीजवळ पोहोचलो. 
अन तिथून मग गावातून ...रस्त्यामार्गे तांदुळवाडी गावात आलो . 
जेथून आम्ही चढण्यास सुरवात केली.

तिथून मग पुढे एसटी ची वाट पाहत ....उभे असता ....गावातल्याच एका चार चाकी गाडीतून त्याकडे लिफ्ट मागून '' राजेश नाव असलेल्या त्या प्रेमळ मुलाशी ( त्याने प्रवासाचे पैसे काही घेतले नाही आम्हाकडून ) बोलत बोलत सफाळे स्थानकात पोहोचलो.
मोठा ग्रुप वगैरे असेल तर दिवाळीत यायचं ... गावातले सगळे जण गडावर जातात दिवाळीत . अस त्याने आम्हास सांगितले.
सफाळे स्थानकातून मग ३:०५ ची शटल पकडून आम्ही विरार ला पोहोचलो नि तिथून दादर मार्गे थेट ठाणे गाठले आणि अशा तर्हेने आमचा तांदूळ वाडीचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
  
संकेत य पाटेकर 
११.०९.२०१२

सफाळे रेल्वे स्थानक ...........



























             तांदूळ वाडी एसटी थांबा ....सफाळे स्थानका पासून अवघ्या १५ मिनिटात आपण एसटी ने येथे पोहोचतो. 




























                     तांदुळवाडी गावातली शाळा..




























                      डावीकडची वाट आपणास गडावर पोहोचवते ...येथून साधारण १ तासात आपण गडावर पोहोचतो. 




























आनंद दिघे साहेबांची प्रतिमेला वंदन करून पुढे वाटचाल करायची ....






























                            पंधरा वीस मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो ....येथून ह्या सुळक्याच सुंदर दृश्य दिसत.





























आमच्या चौघांची छबी...

हे लाल रंगाचे हे फुलझाड इथे बरयाच प्रमाणात आढळतात ...कुणी ह्याच नाव सांगू शकेल का ?



































स्वताहा :...

                                                        माथ्यावर वर नेणारी वाट..

                                                                मनमोहक दृश्य : माथ्यावर नेणारी वाट...

                                                                   दरी  न्याहाळताना... 

                                                                शेवटचा टप्पा ... 





































                                                              कुतूहल ..सृष्टीचे .. 

                                       वैतरणा नदी...

                                वैतरणा नदी...

                                     गवतातून मार्ग काढत जाताना...

                            धु कं...

                              दोन धड एक शिर ..



























               खादाडी  .. 




























पाणी हेची  जीवन ...



लक्ष्या अन किशोर ह्यांची जोडी...



































किशोर अन मी

 स्वताहा ....

धुक्यात हरवलेलं झाड...

झाडावरच भूत .....



































गडावरच्या ''सात'' पाण्याच्या टाक्या ...सप्त हंडी म्हणून ओळखल्या जातात. 

तांदूळ वाडी किल्ला .....
















सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

मृगगड - एक तुफानी ट्रेक (१५ ऑगस्ट २०१२ )




आजवर इतके ट्रेक केले .....पण हा त्यात फारच निराळा ठरला .....
तस पाहयला गेले तर ...प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेग वेगळा आणि अविस्मरणीयच असतो .
पण आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच पण जरा त्याहुनी वेगळा अन अविस्मरणीय असा ठरला. 

वाट चुकण्यात जो आनंद असतो ना ...तो नेहमीच्याच रुळलेल्या वाटेने जाताना नाही मिळत ,
एक वेगळी वाट अन ते धाडस ......नेहमीच अविस्मरणीय अन ...तुफानी ठरत.

पहिल्यांदा घोरपडी सारख ....हात अन पाय दोघांचा उपयोग करून ....निसरड्या गवतातून आणि माखलेल्या चिखलातून . भर पावसात ....सरींचा मारा खात ...अन एक एक पावूल हळूच सावकाश ...टाकत ....मनाचा तोल सांभाळत ...ती उभी निसरडी ...आणि एक बाजूला खोल दरी असलेली ती चढण चंदू लागलो.

काही वेळातच कसे बसे माथ्य्वर पोहोचलो ....खरे ...........पण
वर पोहोचताच कळलं.....कि आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे .....चुकीच्या डोंगरावर ...
समोरून च मृग गड दिसत होता ...जिथे आम्हाला खरे जायचे होते .....

आमचा बरासचा वेळ आता वाया गेला होता . आणि महत्वाच म्हणजे आलो त्या वाटेने पुन्हा जाने म्हणजे
खूपच रिस्की वाटू लागल होत.कारण कुठूनही वाट न्हवती .....सगळीकडून उभी खोल दरी ...

चढण खूप सोप असत ...पण उतरण फार कठीण......
शेवटी नाईलाज म्हणून ...पुन्हा त्याच वाटेने .... उतरायचं ठरलं ...आणि
पुन्हा ते धाडस करून कसे बसे ...आम्ही खाली उतरलो.
अन दुसर्या वाटेने जाऊ लागलो ..एका डोंगराला वळसा घेत ...

पुढे काही वेळातच एक गुहा दिसली. एका वेळी एकंच माणूस त्यात जाईल अशी ती गुहा...
अशा गुहे मध्ये जाण्यात मला नेहमीच फार उत्सुकता असते. त्या उत्सुकतेतच मी त्या गुहेत जाण्याच ठरवले ....आणि एका हाती torch घेऊन .....पुढे पुढे जाऊ लागलो .
ती गुहा सरळ सरळ पुढे गेल्यावर उजवीकडे वळते आणि तिथून पुन्हा ती खाली जाते खालच्या दिशेने आणि 
तिथून पुन्हा सरळ ....आणि पुन्हा कुठे वळते ते ठाऊक नाही .....
कारण त्याच्याही पुढे जाण्यचे धाडस न्हावतेच ...कारण अचानक समोरून काही प्राणी म्हणा किंवा इतर काही आले तर त्वरित मागे फिरणे ......फारच कठीण आणि जीवावर बेतणार ठरू शकत. म्हणून पुन्हा मागे फिरलो .
अन गडाची वाट पकडू लागलो .
थोड्या वेळात पुन्हा एक चढण आली ....आणि त्या उभ्या दगड धोंड्यानच्या घळी मधून आम्ही वर आलो . आणि समोरच ते दृश्य पाहून .....त्या खडकात खोदलेल्या पायर्या पाहून तो आनंद आमचा गगनात मावेनासा झाला .....


कसे गेलो :
ठाणे ते खोपली - (२ तास )
लोकल ट्रेन (ठाण्याहून )
पहाटे : ५:११ ते ७:००

खोपोली ते परळी (अर्धा ते पाऊन तास )
एसटी
सकाळी : ७:२० ते ८:१० ते ८:१५

परळी ते भेलीव ( अर्धा तास )
टमटम :दहा आसनी रिक्षा
सकाळी : ९:३५ ते १०:०५

भेलीव(गडाच्या पायथ्याच गाव ) ते गडमाथा
सकाळी १०:०५ ते दुपारी 1:३०
आमचा बरासचा वेळ वाया गेला चुकीच्या वाटेने गेल्यामुळे त्यामुळे इथे अधिक वेळ लागला ,
अन्यथा १ तासात आपण गडाचा माथा गाठू शकतो.

गडाकडे जाणारी वाट:
गडाकडे जाणारी खरी वाट हि भेलीव गावाच्या थोड्या वर असलेल्या कातकरी वाडीतून जाते . हि वाट थेट आपणास एका घळी पर्यंत पोहचवते मग तिथून वर आलो कि समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात . त्या पायऱ्या चढत आपण गडावर प्रवेस करतो .

गडावर प्रवेस करत असताना आपणास थोडी फार तटबंदी दिसते .
आपण जिथून प्रवेश करतो तिथेच त्याच्या उजव्या हाताला महिशासुर्वार्दिनी च एक शिल्प आहे आणि मधेच एक तडा गेलेली शिवपिंड दिसते . आणि त्याच्या बाजूला हाती डमरू आणि त्रिशूल असलेल एक शिल्प.
तिथून सरळ पुढे पुढे जात आपण २ टाक्यां जवळ पोहोचतो. त्या दोन टाक्याच्या मधून थोडा पुढे आलो कि समोरील सुंदर परिसर न्ह्याहालाता येतो .

संकेत य.पाटेकर
२७.०८.२०१२

परळीत पोहोचल्यावर थोडी पोट पूजा करत असताना आम्ही
डावीकडून हेमंत.. मी ..आणि लक्ष्मण



मृगगड आणि एकीकडे मोराडीचा सुळका...

मृगगड...




आम्ही चौघे ....आणि पाठीमागे मोराडीचा सुळका...




























मी ..




























दगड धोंड्यातून उभी चढ चढत असताना ....


मोराडीच्या सुळक्याकडे ..........लक्ष्मन आमचा लक्षा उर्फ मेन इंजिन..


























डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य..

गडाकडे कूच करताना ...मृग गडाचा map पाहताना...

हेमंत ...किशोर आणि लक्ष्या उर्फ बाळू दा...

एका बाजूला खोल दरी ....आणि निसरड्या ओल्याचिंब गवतातून त्या मातीतून सावकाशपणे पाउल ठेवत खाली उतरताना .....
गडाकडे जाणारी वाट..

हीच ती..............वेडी वाकडी ....गुहा..




























गुहेच्या आत जात असताना .......मी...
ह्या घळी तून वर गेल्यावर ...समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात ..तिथूनच गडावर जाता येते. 





































ओसंडून वाहणारा आनंद ..............

गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या...

पायऱ्या चढत असताना ............दगडात कोरलेले एक शिल्प दिसत. 

महिषासुर्वार्धिनी देवी.




































महिषासुर्वार्धिनी देवी ....शिवपिंड आणि एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 

एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 



































पाण्याच दोन टाकं..

समोरील दृश्य..

मृगगड

अंबा नदीच्या पात्रात ,…

अंबा नदीवरील अरुंद पूल...



अंबा नदीवरील अरुंद पूल..



मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते ( भेलीव पासून काही अंतर पार केल्यावर माणगाव लागते )

सकाळ वृत्त पत्रात आलेली मृगगडाची/ भेलीवचा किल्लाची माहिती. 












शनिवार, ३० जून, २०१२

सह्याद्री ...सह्याद्री ..सह्याद्री !!!


सह्याद्री ..सह्याद्री ..सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप ,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग ....

सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज...
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा ....
रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ....,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ...
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ...

सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा ....हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .

असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग''
मला नेहमीच वेडं लावतं .

संकेत य पाटेकर

३० जून २०१२