शनिवार, १७ जानेवारी, २०१५

सायकल सफर - लोनाड लेणे अन शिलाहार कालीन शिव मंदिर

रोजच्या ह्या कामाच्या कचाट्यातून, धागधुगी पळानयानातून , थोडी मोकळीक मिळावी , मनाला प्रसन्नता लाभावी अस प्रत्येकाला वाटतं. अन सतत वाटतं राहतं . मग ते मला हि न वाटावं अस कधी होईल का ?अन म्हणूनच ..
आठवड्यातला शनिवार रविवार जवळ येऊ लागला कि माझ्यासारख्या भटक्यांना हि वेध लागू लागतात ते अनोख्या भटकंतीचे...आड वळणाचे - वेगळेपणाचे ...

असाच हा एक सायकल सफारीचा भुंगा डोक्यात भूनभुनला .अन केली तांगडतोड...जवळ जवळ दोन एक वर्षाने पुन्हा -
ठाणे - ते लोनाड लेणे - शिलाहारकालीन शिव मंदिर - भिवंडी कल्याण
साधारण ३५- एक किलो मीटर - जावून येउन ७० एक किलो मीटर ...

त्याचे काही छायाचित्र ..

फोटो सौजन्य - अनुराग कुलकर्णी




शनिवार, १० जानेवारी, २०१५

सह्याद्रीतला सोबती ...

आपल्या ह्या धगधगत्या , राकट, कणखर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून, कसलेल्या पायमोडी वाटेतून निवांत मुशाफिरी करताना , चढ उतार करताना , एक सोबत नक्कीच आपल्याला लाभते , लाभलीच असेलच तुम्हाला ?
ह्या सह्याद्रीत कुठे ना कुठे , कधी ना कधी , केंव्हा ना केंव्हा , किंव्हा प्रत्येक क्षणी हि म्हणा ट्रेक दरम्यान ...बिना कूच बोले ... कहे ...पीछे पीछे ..पीछे -पीछे ..मुकाट्याने ...

ओळखतं का ? कोण ते ?
शेपूट झुलवीत , जिभली बाहेर काढत पाठीमागून माग काढणारा ..

अहो..ओळखलंच असेलच एव्हाना... होय ना ?

अहो...माणसांची, आपल्या धन्याशी निष्ठेने वागणारा....असं आपण म्हणतोच कि ..

ओळखलंत ना 'पाळीव कुत्रा 'हो ( कुत्रा , ह्याला पर्यायी नाव सुचवा , एखाद, श्वान वगैरे अजून काही... )

ट्रेक दरम्यान ह्यांची भेट होतेच होते . नुसती भेट नाही, तर ते आपल्यासंगे डोंगर दरयांची चढ उतार हि अगदी उत्साहपूर्ण करतात. ओळख पालख नसूनही ..बिनधास्त अगदी ..

सिद्धगड- भीमा शंकर करतेवेळी असंच, गणेश घाटाने आम्हाला उतरायचं होत . त्यावेळेस मंदिराच्या येथूनच आम्हाला रामू भेटला (असं कुणी एखादं भेटला तर नामकरण तर होतंच होत. आम्ही त्यास रामू अस नामकरण करून मोकळे झालो. ) अन तो चक्क 'खांडस' गावा पर्यंत आम्हाला सोबत करत आला.

पुढचा प्रवास चारचाकी ने असल्याने तिथेच त्याला बाय बाय कराव लागलं. . पण त्या तेवढ्या वेळेत त्याने आमच्या हृदयी कप्यात जागा मिळवली होती. अन ती विरह संवेदना (प्राणी असला म्हणून काय झालं ) त्या वेळेस मनास नक्कीच छळत होती.

असंच कळसुबाई ह्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर चढ - उतार करतेवली तोच अनुभव आला. तिथे हि आम्हाला रामू भेटला (सिद्धगड -भीमाशंकर ट्रेकची , त्या रामूची आठवण म्हणून ह्याच हि नाव आम्ही रामू ठेवलं ) तो हि आम्हाला सोबत करत आला .

धोडप च्या किल्ल्यावर तर नुकताच जाउन आलो. तिथे हि तसाच प्रकार .
तिथे तर गोंडस लहानगं पिल्लूच होत ते , भुकेने व्याकूळ झालेलं. झाडीत बसून राहिलेलं .
त्याला पाठीवरल्या पाठ पिशवीतून काही बिस्कुट खाऊ घातली तर तो चक्क पाठी पाठीच येऊ लागला. धोडप माची पासून ते थेट हट्टी गावा पर्यंत. त्याने साथ दिली . त्याच नाव मी प्रेमाने सोनू ठेवलं .
वाटलं त्याला हि सोबत करून घरी आणावं. ..पण कसल..काय .. हो ..असो.

ट्रेक दरम्यान खेड्या पाड्यात , प्रेमाने ओतपोत जशी माणसं भेटतात तशी लळा लावणारी हि अशी मुकी प्राणी हि भेटतात.
त्यांना कधी सोबत हवी असते. इकडून तिंकडे जाण्यासाठी तर कधी आपल्या प्रेमापोटी हि ते आपल्या सोबत ,मागे येऊ लागतात.

सह्याद्रीत अश्या बरयाच गोष्टी आहेत. ज्याचा लळा अन गोडी न लागो तर नवलच ...

तुम्हाला हि आलाच असेल असा अनुभव, असेल तर शेअर करा.

आपलाच ,
संकेत उर्फ संकु
१०.०१.२०१५



बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

धोडप - इच्छा शक्ती - योगायोग अन स्वप्नपूर्ती

जग कितीही पुढे गेलं अन विज्ञानाने किती हि प्रगती साधली तरीही निर्सगनिर्मित अद्भुत गोष्टींचा अर्थ लावणे ,तो शोधून काढणे अजूनही तसं मानवाला शक्य नाही . शक्य होईल तेंव्हा त्याचे अजून काही चमत्कारिक, गूढतेने रहस्य्लेले रूपं पुन्हा आपल्या नजरे समोर उभे राहतील . कधी प्रश्नांची कोडी निर्माण करत तर कधी तना मनाला आनंदाच्या वलयांम्ध्ये मुग्धपणे खिळवून ठेवत . तर कधी निसर्गाच्या ह्या अलंकारित रूपाचं गुणगान गातं , मन मोकळेपणाने मनापासून कौतुक करत ....

काल असंच एक अद्भुत पण लोकांच्या मनी भक्ती भावनेने कोरलेलं श्रद्धामय ठिकाण पाहून आलो.
तसा तो योगायोगच जुळून आला अस म्हणायला हि हरकत नाही...
असे योगायोग आपल्या जीवनात घडतच असतातच म्हणा, आपल्या मनातली सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी,,,
कधी कुणाची अकल्पित, अनाठायी भेट होवून... तर कधी काय नि कसं ..कुणास ठाऊक..
'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात त्या प्रमाणे आपला मार्ग हि मोकळा होतो . रस्ता मिळून जातो.

कुठे तरी ऐकलेली, वाचनात आलेली एखादी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यसमोर आली तर ..
त्यातून मिळणारा आनंद हा शब्दात कसा मांडावा हा पहिला प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो .
तरीही आपला कसून प्रयत्न सुरु असतो ...तुटक मुटक शब्दात तो सांगण्याचा ...

माझा हि असाच एक प्रयत्न ...
अजिंठा - सातमाळा रांगेतील धोडप हा तसा एक बलदंड अन रेखीव किल्ला , अन उंचीनेही हि तितकाच उंच , आकार हि अगदी पिंडी सारखा , त्यामुळे भक्ती भावनेने अन श्रद्धेनेच त्याच यथार्थ दर्शन होवून जातं .

फोटो सौजन्य - प्रनील पाटेकर ..

नाशिक - वडाळा भोई फाट्यावरून - धोडांबे असा प्रवास करत हट्टी गावात पोहचलो कि अगदी हाकेच्या अंतरावर उभा असलेला धोडप . अर्धा एक तासात सहज चढून होईल हो, अस आपण फुशारकीने म्हणून जातो ..वेळेच मोजमाप करत , पण प्रत्यक्ष चढाई करतेवेळी लागणारा वेळ आपल्याला योग्य त्या मोज मापेच गणित आपल्या पुढे ठेवून देत. आपण गणितात किती शून्य आहे ते दाखवून देत .
तर असो.

उंच सखल भागातून, झाडी झुडपातून वळणा वळणाची पायवाट आपल्याला , शेंदूरचर्चित मारूतीच दर्शन देऊन , साधारण दीड दोन तासाच्या चालीने किल्याच्या माचीवर घेऊन जाते . तिथे आपण २ बुरुजाच्या प्रवेश द्वारापाशी येउन पोहोचतो ,येथून डाव्या हातीची वाट आपल्याला सोनार वाडीतून उजवीकडे वळणा घेत पुढे गडावर घेऊन जाते तर बुरूजा येथून डावीकडची वाट , आकाशाला गवसणी घालणार्या ईखार्या सुळक्या जवळ घेऊन जाते.

धोडप किल्ल्यावर बरेसचे अवशेष आहेत. ऐतिहासिक महत्व असलेले , पण त्यातल्या त्यात
एक नवलाईची गोष्ट सुद्धा आहे . किल्ल्याच्या पोटाशी दडून बसलेली ..
ती म्हणजे 'गाईची कपार' जिचा शोध आम्ही २ दिवस घेत होतो . जे कुठेतरी वाचलेलं अन ऐकलेलं ,
पण अखेर 'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात त्याप्रमणे आम्हाला ते पाहण्याचा योग आला . अखेरच्या दिवशी परतीच्या वेळेस ...योगा योगाने ..,दत्तू नामदेव पवार ह्या काकांमुळे..

धोडप च्या पोटाशी सोनारवाडी च्या पुढे थोडं खालच्या अंगाला , एक नितळ , स्वछ पाण्याचा झूल झुलणारा, मनाला थंडवनारा एक झरा वाहतो ...बाराही महिने , त्याच्याच बाजूला कातळात एक खोदीव टाकं आहे, गणेशाची प्रतिमा असलेलं, ते त्या नितळ स्वछ झरयाने पूर्णतः भरून जातं. त्या पुढूनच एक वाट ... खालच्या दिशेने , झाडी झुडपातून , कातळ टप्प्यातून पुढे होत जाते .
साधारण १०-१५ मिनिटा नंतर आपण एका कपारी पाशी येउन पोहोचतो . येथे उभ्या खडकातलि एक भेग आहे . हीच ती नवलाईची जागा . भक्ती भावनेने पुजलेली .
'गाईची कपार' ...गाईचा हुबेहूब आकार ल्यायलेली कपार .

शाश्त्रा प्रमाणे (इथल्या गाव कार्यान नुसार )
फार वर्षा पूर्वी , गाय अन तिचं लेकुरवाळं वासरूं चरत असताना , दोघांची एकमेकांपासून तुटातुट झाली.
वासरू राहिलं ह्या कपारीच्या अल्याड अन गाय त्या पल्याड ..
आता इतक्या वर्षाने हि ती गाय आपल्या वासरू च्या ओढीने पुढे पुढे सरकत राहते . म्हणजे ती कपा रीतली जागा दर वर्षी इंचा इंचाने पुढे पुढे होत राहते . किती अद्भुत अन चमत्कारीक आहे ना ?
कुणाचा विश्वास बसेल अथवा नाही हि पण निसर्गातल्या अश्या कितीतरी अनभिद्न्य गोष्टी मनाला
नवलाईच्या दुनयेत अलगद घेऊन जातात .


हीच ती गाईची कपार..
फोटो सौजन्य - कला


क्रमश :-
संकेत पाटेकर
२४.१२.२०१४

_______________________________________________________________________________________________
_______________________________________________________________________________________________

ट्रेक दरम्यान आपल्यला अनेकविध क्षण अनुभवयास मिळतात.
त्यातलेच काही गमतीदार क्षण..

ट्रेक मधल्या गमती जमती ..धोडप


नाशिकच्या धोडप किल्ल्यावर मुक्काम करून नुकतंच हट्टी गावात परतलो . तेंव्हा दुपारचे साधारण साडेतीन वाजले होते . सूर्यनारायण माथ्यावरून थोडे पुढे कलले होते. आम्ही आलो तेंव्हा गावातली लहानगी इकडून तींकडे बागडत होती. त्यांच्या चेहर्यावरील निरागसपणा मनाच्या अंतरंगाला स्पर्शून जात होता.

धोडपच्या पायथ्याशी असलेलं हट्टी गाव , तशी परदेशी लोकांची वस्ती. परदेशी लोक म्हणजे आडनाव परदेशी . मुळात राजस्तानचे असलेल हे लोक फार एक वर्षापूर्वी म्हणजे त्यांच्या आजा पणजा पासून इथे स्थित आहेत . त्यामुळे त्यांची भाषा हि मिसळलेली अर्धी हिंदी अन मर्हाटी ...

तशी लोकांची राहणी हि साधीच..पण त्या साधेपणातच किती मधाळ गोडवा भरलेला असतो ते शहरी लोकांना कसे कळणार? घरात काही असून नसूनही केलेला उत्तम पाहुणचार, त्यांच्या बोलण्यातला आदार , आपलेपणा ,आपल्यासाठी सुरु असलेली मनमोकळी धडपड - हृदयातील स्पंदनांना हि काही वेळ थोपवून ठेवते.

अशाच एका परदेशी कुटुंबात , सकाळची ती कांदेपोह्यांची न्ह्याहारी , ती चव अजून हि जिभेवर रेंगाळतेय.
तर असो.
हट्टी गावात आलो तेंव्हा 'मावा' घेण्यासठी म्हणून आमची दोन एक जनाची लगभग सुरु झाली.
पुस्तकात वाचलं होत इथे मस्त अस्सल प्यूअर दुधाचा मावा - खवा काय तो मिळतो . म्हणून अनुरागने चौकशी केली. तर त्याला तिकडून 'ना' असा सूर ऐकू आला . त्याने तसं मग आम्हास सांगितल .

ते ऐकून बाजूलाच बाजीराव तटस्थ उभे राहिले.
बाजीराव म्हणजे आमच्या वाहन चालकाचे नाव हो . इतिहासाच्या पानात अजरामर झालेले अन हृदयाच्या कप्यात कोरले गेलेले ते बाजीराव अन आत्ताचे आमच्या समोर उभे असलेले हे बाजीराव.
नावात काय असत असं लोक म्हणतात खर ? पण बरंच काही असत हो नावात .
तर असो .. आमचा बाजीराव तसा आमच्यात मिसळून गेला होता.
अवघ्या काही तासाच्या प्रवसात हि कधी कुणी अगदीच आपल्यात मिसळून जात , अनमोल आठवणी देत तर कुणी काहीच न बोलता कायमच दूर निघून जातं हे आजवरच्या प्रवासदरम्यान मिळाले अनुभव....तसा हाही बाजीराव ..

गावात 'मावा' नाही हे कळल्यावर बाजीरावं समोर उभा , 'मावा' च हवाय ना? थोडं पुढे गेल्यावर मिळेल कि ,अस हळूच आवाजात अनुरागाशी बोलत त्याने काळी-पिवळी चार चाकी सुसाट पळवली .
हट्टी गावाचा निरोप घेत..धोडप कडे एक कटाक्ष टाकत , इखार्या सुळक्या कडून सुरु झालेली रांग नजरेत भरवत , कांचनचे कांचनमृगी राकट काया मनात साठवत आम्ही निघत होतो .आता पुन्हा कधी येऊ ? ह्यावर मनखेळी करत..

कधी खाच खळग्यातुन तर कधी सपाटी डांबरी रस्त्यातून ...
गाडीची चारी चाके हि स्वतःची झीज करत पलायन करत होती. . तेवढ्यात बाजीरावाने ब्रेक दाबले? अन ती काही अंतर पुढे करत स्थिरावली . बाजीराव हि गाडीतून उतरता झाला .
आमच्यातल्या प्रशांत दा , आमच्यातला मोठा दादा म्हणून अगदी अगतीकने सर्वाना ओरडून सांगितले, कुणाला काही घ्यायचं आहे का रे ? गाडी थांबली आहे तर ..
मग आमच्यातले दोघे चौघे प्रशांत दा स्वतः , कला , अनुराग अन मी . पाय मोकळे म्हणून अन काही घ्यावं म्हणून गाडीतून उतरते झालो.

नाशिकच्या ताज्या अन शुद्ध मातीतल्या स्वस्त भाज्या दिसताच त्याची जोरदार खरेदी सुरु झाली .
आज वर ट्रेक वरून परताना पहिल्यांदा अशी भाज्यांची शोप्पिंग करत होतो. त्यामुळे मनातून अगदीच खुश होतो. मनातल्या मनात म्हणत, चला घरातले खुश अन मी हि खुश...(पुढचे २ दिवस त्याचीच भाजी खात होतो म्हणा , कोंथिबीर वड्या काय , मेथीचे ठेपले काय, )

तर असो शोप्पिंग खरेदी वगैरे झाली. अन दुसर काही मिळत का म्हणून नजर शोधा शोध करत होती.
तेवढ्यात बाजीराव ने अनुराग ला वेढा दिला . शब्द टाकत..
मावा हवाय ना ? तो बघ तिथे मिळेल.

त्याच्या त्या बोलण्याने आम्ही दोघे तर आनंदानेच हवेत तरंगलो . कारण एकंदरीत ट्रेक मनासारखा झाला होता. फक्त 'मावा' च काय तो मिळाला न्हवता ..
त्यामुळे त्याच्या बोलण्याने आनंदुनच गेलो.

पण ज्यावेळेस त्याने हातवारे करत दिशा दर्शिवली तेंव्हा त्या ठिकाणे कडे पाहून हसूच आवरेना ...
ती पानटपरीची जागा होती......
- संकेत य पाटेकर
३०.१२.२०१४






शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

हडसर- दुर्गशास्त्रील एक अनोखं दुर्गरत्न ....!

सह्याद्री तसा नेहमीच भुलवतो , साद घालतो ..अन मग आपली पाऊलं हि न अडखळता त्याप्रेमापायी अन आपल्या आनंदापायी पुढे सरसावू लागतात. कधी नाशिक , कधी पुणे कधी रायगडच्या दिशेने ...त्याच्या मायेभरल्या कुशीत काही क्षण विसावण्यासाठी ..ध्यान- मग्न होण्यासठी ...गौरवशाली इतिहासाची पानेमुळे पुन्हा उजळवीण्यासाठी , हृदयाशी सारे क्षण टिपून घेऊन .. सह्याद्री जीवन अगदी जवळून अनुभवण्यासाठी ....


काल अशीच पाऊलं निघाली ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुकाच्या च्या दिशेने ..हडसर च्या वाटेने - दुर्गशास्त्रील एक अनोखं दुर्ग रत्न ....पहावयास !

समुद्र सपाटीपासून साधारण १००० मीटर उंच असलेला हा किल्ला दुर्ग बांधानितला एक वेगळंच वैशिष्ट्य आहे . एक वेगळंच अलंकार . कातळात कोरून काढलेले प्रवेशद्वार , बोग्देवाजा मार्ग , ती अंधारी कोठारं, शत्रूला हि कळणार नाही अशी केलेली दुर्ग बांधणीची रचना पूर्वीच्या लोकांची बुद्धिमत्ता अन कलागुणाची दाद देऊन जातं.

तसं सह्याद्री म्हटलं तर मला नाशिक आधी खुणावतो. एक वेगळं राकाटपनं अन सौंदर्यविष्कार येथे पाहायला मिळतं . पण त्या इतकंच पुणे हि माझं आवडीच ....इथल्या सह्याद्री रांगा वेडावून सोडतात . 
कधी मंद कधी बेभान गतीने वाहणारा उनाड वारा , अथांग पसरलेला निळेशार जलाशय , वर विस्तारलेलं मोकळं आभाळ, सभोवतालची हिरवी घनदाट झाडी , त्यावर बागडणारी इवली टीवली सुरेख रंगेवाली ना ना विविध प्रकारची फुलपाखरं, पक्षी पाखरांची भान हरपून टाकणारी मंजुळ शिळ , इथला रम्य सुखद परिसर , इथली माती इथली मनमिळावू , मदतीस तप्तर असणारी गोड - साधी भोळी माणसं ., त्यांचा पेहराव .., त्यांचा येथोच्छित पाहुणचार ...आठवणीच गाठोडं घरी जाता जाता अगदी भरभरून जातं . 
पुढे नक्कीच येऊ ..अशी मनाशी आर्त हाक देत .

ठाण्याहून पहाटे साडेचार वाजता , साईचरणी लीन होत .
आमच्या (म्हणजे हेमंत ची हो ) बजाज ct १०० ने आमची पुढील प्रवासी वाटचाल सुरु झाली . रस्त्यावरील निरव शांततेला छेदत..,पहाटी काळोखात ...वाऱ्याशी सलगी करत, अंगा खांद्याला बिलगणाऱ्या , कुडकुडवनाऱ्या गुलाबी थंडीचां आस्वाद घेत आम्ही निघालो. मधेच कुठे थांबत , थर्मास मधल्या वाफालेल्या चहाचे एक एक घुटके घेत . .कधी सेल्फी सेल्फी म्हणत स्वतःचे फोटो काढत .
माळशेज च्या नागमोडी वळणाने , सह्याद्रीचा राकट कणखरपणा नजरेत सामावत , आम्ही खुबी फाट्याजवळ आलो.
हरिश्चंद्रगड ची मनमोहक रांग समोरच खुणावत होती. पण पाउलं हडसर च्या दिशेने जी जाणार होती. 




थोडी पोटपूजा उरकून घ्यावी म्हणून एका हॉटेल मध्ये उतरलो . हॉटेल धारकास गरमागरम मिसळ पावची ऑर्डर देऊन मुक्त गप्पांत रंगून गेलो. बऱ्याच दिवसाने अशी चवदार मिसळ खावयास मिळाली. त्याने अतृप्त उदर मन हि तृप्त झालं. नंतर पुढे बराच वेळ त्या मिसळची चव जिभेवर तशीच रेंगाळत राहिली . .

साधारण ९:३० दरम्यान गणेश खिंडीतून , गणेशाला वंदन करत , खामगावातून वळसा घेत , माणिकडोह च्या रम्य परिसरात आम्ही दाखल झालो. अन भान हरपून गेलो. सृष्टी सौन्दर्याचं जितकं कौतक करू तितकंच कमीच आहे. सौंदर्यलांकाराने नट- नटलेली अन प्रेमाने ओतपोत अशी हि सृष्टी नेहमीच भान हरपून टाकते. खरंच निसर्ग सारखा जादुगार नाही अन त्याच्यासारखा मित्रगुरु हि ...


वळणा वळणाच्या अरुंद रस्तावर , मोकळ्या वातारवणात ,. ..हडसर अन बाजूचा हटकेश्वर डोळ्यासमोर ठेवत ...
आम्ही हडसर गावाशीपाशी पोहचते झालो.



सकाळची नेहमीचीच गावकरयांची दिनचर्या , कामाची लगभग सुरु झाली होती . कुणी इस्टी खांब्या जवळ जुन्नर इस्टी ची वाट पाहत होते. तर आया - बहिणी - विहिरीवर पाणी भरण्यास गर्क झाल्या होत्या .
हडसरला पहिल्यांदाच आलो असल्याने हडसर कडे जाणारी वाट विचारावी म्हणून ..विहिरीवर पाणी भरावयास आलेल्या एका ताई ला मी विचारलं . ' ताई ' हडसर ला जाणारी वाट कुणीकडून जाते?
तेंव्हा माझ्या 'ताई' ह्या शब्दाने ती गालातल्या गालात हसली अन लाजली ..तेंव्हा वाटलं कि ' ताई' म्हणून मी चुकलो कि काय ? असो हा गमतीचा भाग ...
तसे संस्कारच आहे आम्हावर ...बहिणीचं नात हळूच गुंफून घ्यायचं .

हडसर ला जाणारी एक पायवाट विहिरी जवळून जाते . पच्छिम दिशेने तो किल्ल्याचा राजमार्ग तर दुसरी वाट बुरूजा जवळून जाते पूर्वेकडचा उभा कातळ कडा चढून ..खुंटीच्या वाटेने, थर थरार अनुभवून , कमी वेळेत (नवख्याने येथून अजिबात जावू नये )

सुरवातीला आम्ही राजमार्गाने जायचं ठरवत होतो पण नंतर खुंटीच्या वाटेनेच माथा गाठायचा ठरवलं. अन आमची ' बाईक' एका ठिकाणी घरी सोपावत , आम्ही खुंटी च्या वाटेने निघालो .
गावातल्या एकाने आम्हास रस्ता दाखवला नि आम्ही पुढे होत हळूहळू त्या पाउलं वाटे संगे निघू लागलो.
सुरवातीला पायथ्याशी एक मंदिर लागलं . त्याच दर्शन घेतलं. अन पुढे वाटचाल सुरु ठेवली .

आता मोकळ्या आभाळाशी ' खुंटीची उभी' पहाडी वाट आमचं लक्ष वेधून घेत होती .


खालून मुंग्यासारखी दिसणारी काही माणसं ती वाट हळूच सर करत होती. .ते पाहून आमच्या साहसी मनाला हि उत्सुकतेची नवी बहर आली . तनामनात नवा जोश नवा आत्मविश्वास फडफडू लागला .
त्यातचं पायाखालची वाट तुडवत तुडवत आम्ही नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे चुकीच्या वाटेने कधी निघालो ते आमचच आम्हाला कळल नाही .
आजवरचे बरेच ट्रेक असे सीध्या मार्गाने न होता असे हटकेच झालेत . काट्या कुट्यातून उभ्या घासार्या मधून स्वतः ला सावरत मार्ग काढत.
आठवणीचा तो अनमोल ठेवा कायम स्मृतीत जागे ठेवून ...
तर असो ...
हाता खांद्यावर काट्यांचे ओरबडे उमटवत त्याची ती खून आठवण म्हणून ठेवत आम्ही खुंटी च्या उभ्या पहाडा जवळ बुरूजा जवळ आलो.
उभ्या कातळातल्या त्या खोबण्या आता उराशी धडकी देत होत्या . नवा थ्रील अनुभवायला मिळणार होता. पण जरासाही हलगर्जीपणा आमचा .....नवं संकट ओढवणारा होता .
त्यामुळे मनाशी पक्का निर्धार करून ..सावधगिरी बाळगून , नव्या दमाने हळुवार आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला.



आणि मोकळं श्वास टाकला.

आता एका गुहेपाशी येउन आम्ही पोहचलो ...

क्रमश :- पुढील भाग लवकरच ..
संकेत य पाटेकर

०७.१०.२०१४