मंगळवार, २१ जुलै, २०१५

किल्ले रोहीडा


किल्ले रोहीडा -
पुणे भोर पासून अवघ्या काही अंतरावर वसलेला हा 'देखणा अन तितकाच लढवैय्या'
असा किल्ला , पाहून खरं तर 'ऊर' अभिमामानेच धडाडू लागतो.
कारण ह्याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर, दिमाखाने उभा असलेला ' रायरेश्वर'
त्यावर काही सवंगडी मावळ्यासह , ' छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ
घेतली होती अस म्हणतात.'
हे राज्य व्हावे , ' हि तर श्रींची इच्छा आहे, ' असे मानून , 'स्वराज्याची'
चेतना अंगी भिनवून ..आपल्या रांगड्या अन पौलादी मावळ्यांसह 'सिंहगर्जना' करत
, स्वराज्य स्थापन करणारे ,' छत्रपती शिवराय' !
हा एकमेव अन एकंच असा 'शिवकल्याण राजा..जाणता राजा' ....!
जो इथल्या साऱ्या प्रजेला पूजनीय अन आदरणीय आहे. ज्याची प्रतिमा अजून हि ,
'इथल्या प्रजेच्या हृदयात लक्ख प्रकाशून आहे. ज्याच्या महान कर्तुत्वाचा
प्रेरणादायी इतिहास काल बदलला अथवा बदलत गेला तरी हि , ह्या जन-मनात कायम
अभिमानाने दुणानात राहील .असा हा सार्वभौम 'शिवकल्याण राजा ..!
त्यांस मनोमनं मुजरा करत आपली पाऊलं, आगेकूच करू लागतात ती रोहीड्या कड..
रोहीड्या दिशेनं.
सात बळकट 'बुरुजांचा' अन 'पाण्याचा मुबलक साठा' अंगा खांद्याशी घेऊन वसलेला
, लागोपाठ तिनं एक बळभक्कम 'दरवाज्याची साखळी' अन 'तटबंदी' ने सज्ज अन चौकस
असलेला हा रोहीडा किल्ला.
सृष्टी सौंदर्याने तर 'लखलख' लेलाच आहे. त्याचं ते सृष्टी रूपं पाहून 'तन
मन' तर त्यातच हरखून जातं .
उधाण वारा हि, अगदी बेभान होवून इथे, ' सैरवैर उनाडक्या करत असतो.'
तेंव्हा वाटतं, आपल्या ह्या दोन्ही पंखांची (हाताची ) उघड झाप करून आपण हि
त्यासवे, तो नेईल तेथे निघुनी जावे. फरफडत जावे.
एखाद्या दोर नसलेल्या कटी पतंगासारखा ..वेड्या वाकड्या -वाटोळ्या घेत .
कुठेही -कसेही. .ह्या विस्तारलेल्या निळाईला गवसणी घालत. बस्स...
पण तितक्याच कुठूनसा एखाद चीटपाखरू मुक्तपणे विहार करताना दिसतो . अन
त्याची ती अंगचलाखी झेप मनाभोवती फिरकी घेत राहते.
अन पुन्हा आपलं हे मन कल्पनेच्या दुनियेत हळूच विसावलं जातं.
क्रमश :-
संकेत य पाटेकर
१६.०७.२०१५

काही फोटोग्राफ्स ...










  












































मंगळवार, १६ जून, २०१५

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय ...

त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  ..
कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे .....एक एक  माणसं.  
मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  ...साधसं  जीवन  जगणारी ,
साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा
शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी ,
इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील.
दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं....
जी जोडली जातात. सह्याद्रीच्या प्रत्येक पाऊल वाटेवर ....

- संकेत पाटेकर 

१४..०६.२०१५