SANDHAAN VALLY - माझा अनुभव
ट्रेन मधले आम्ही ..
Gang:-
मी आणि माझी बहिण ..
पाण्यातली वाट ...
चिडवताना ...दीप्ती
छोटे मोठे दगड धोंडे ...त्यातून मार्ग काढताना..
Rappelling Karatanaa....mi
दोन दिवसाचा SANDHAAN VALLY
प्रवास खरच खूप भन्नाट झाला , अजून अंग दुखतंय ,
पूर्णतः त्या VALLY तून प्रवास झाला , एक रात्र त्या VALLYT काढली,
टपोर चांदण्यात , मन
कस खुश झाल, नाहीतर आपल त्या घरात कसल काय दिसतंय चांदन ?
कॉंक्रीट च छत ते , त्यात कुठे काय दिसणार ?
घराच छत कस चांदण्यांनी भरलेलं असाव , सुंदर काळे - निळे ढग , चांदो
मामा, लुक लुक नारे तारे , सार काही दिसावं त्या छता मधून ...........
शनिवारी सकाळी ठीक ८ वाजून १५ मिनिटांनी आमचा प्रवास सुरु झाला.
वर उंच उंच कडे ...खाली लहान मोठाले दगड - मधेच कुठेतरी कमरे इतक
पाणी, आणि त्या पाण्यातून डोक्यावर SACK घेत पुढे पुढे मार्ग काढणारे आम्ही....सार
काही कस निराळाच ,मनाला ताज तवान करणार , हूरहुरी आननार ,
मधल्या त्या बेअर ग्र्यल्ल्स ची आठवण करून देणार , भन्नाट एकदम ..!!
VALLY उतरताना आम्हास तीन ROCK PATCH उतरावे लागले , ROPE च्या
सहायाने , त्यातल्या दुसरा ROCK PATCH उतरताना मी दगडावर आदळलो, (दत्ता ने सांगितल
होत कुठेही पाय ठेवू नको सरळ पाय खाली टाक म्हणून कुठेही पाय न टेकवताच ....सरळ
धुडूम ) थोडी फार हाताला जखम करून घेतली. ...बस तितकंच,
VALLY च ते सुंदर दृश्य मनाला मोहित करत होत. निसर्ग हा निसर्ग खरच
किती सुंदर आहे विविध अंगांनी तो फुललेला आहे. त्याच रुपच किती अनोख आहे , नुसत
पाहत राहावं , त्याकडे टक मक टकमक बस , अप्सरा देखील त्याच्या पुढे मान झुकवेल
आपली अस त्याच ते भव्य मनमोहक रूप मनाला एकदम फ्रेश करत.
निसर्गाशी खरच जवळीक साधावी , त्याच्याशी बोलाव , त्याकडून शिकावं ,
खूप काही दडलंय त्यात ,
सायंकाळी आम्ही दरी उतरलो आणि एका ठिकाणी थांबायचं म्हणजेच रात्र
तिथे काढण्याच ठरवलं ,
त्या प्रमाणे एक जागा निवडली , आणि तिथे लाकड वगैरे गोळा केली, आणि
प्रत्येकाच्या SACK मधील जेवनाच सामान बाहेर काढू लागलो , रात्रीच जेवण जे बनवायचं
होत.
हळू हळू काळोख वाढू लागला तसं तसं थंडी हि वाढू लागली होती ,
जेवनाच सामान एकत्र करून जेवण हि तयार झाल .....आणि मग मस्त पैकी
आमटी आणि भाताच चवदार एक एक घास पोटात जावू लागला . खूपच चवीस्ट स्वादिस्त जेवण
केल होत.
पोट कस तृप्त झाल.
जेवून खावून रात्री टपोर्या चांदण्या पाहण्यात मी हरवून गेलो , आणि
तिथेच झोपी हि गेलो ,
पहाटे लवकरच जाग आली तेंव्हा सारे कसे शांत झोपले होते.. थंड गार
वारा सोडून, पाण्याचा खल खालाट आवाज (पुढे एक तलाव होता )सोडून कसलाच आवाज येत
न्हवता .
मी थोडा वेळ उठून बसलो , आणि ते निसर्गाच रात्रीच मोहक रूप डोळ्यात
साठवू लागल, असे हे क्षण क्वछितच येतात.
सकाळच मस्तपैकी पाय घसरून दगडावर पुन्हा आपटलो , आणि दुसर्या हाताला
जखम करून घेतली, (ह्या वेली ब्रश करण्याकरीता गेलो होतो आणि चुकून पाय ओलसर
जागेतून घसरला ).
कडक चहा - आणि चाविस्त फोडणीच भात खावून आमचा परतीचा प्रवास सुरु
झाला ,
आणि आमचा हा ट्रेक .........यादगार झाला ,
संकेत य. पाटेकर
दि. १९.१२.११
ट्रेन मधले आम्ही ..
Gang:-
मी आणि माझी बहिण ..
पाण्यातली वाट ...
चिडवताना ...दीप्ती
छोटे मोठे दगड धोंडे ...त्यातून मार्ग काढताना..
Rappelling Karatanaa....mi
२ टिप्पण्या:
WOW owsm yar
Dhanywad :)
टिप्पणी पोस्ट करा