'सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...
नुसत्या ह्या शब्द गौरावांनी सुद्धा छाती अभिमानाने फुलून येते . .
काल जे अनुभवलं ते तर अफाटच होतं .
डोळ्याचं पारणं फेडणार. जल्लोषपूर्ण अस शिवमय
वातावरण , एक सुवर्ण क्षण ..सुवर्ण महोत्सव. इतिहासाच्या पानावर ठळकपणे वठलेलं .
अजरामर अस ...
आज हि ''त्या क्षणाने' हि सारी सृष्टी , आनंदाने अगदी तल्लीन होवून
नाचू डोलू लागते .
ती हि अभिमानाच गीत गाऊ लागते . अस माझ्या राज्यांच कर्तुत्व..
अभिमानानं उर दाटून यावा असा तो क्षण ...
माझ्या राज्याचा .. स्वराज्याचा , स्वराज्यातील रयतेचा ...
शिवराज्यभिषेक सोहळा .
जय भवानी जय शिवराय ..!
मनावर अधोरेखित झालेल्या
काही गोष्टी ...
खाऊ ..
‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा ..शिवराज्यभिषेक सोहळा’
‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा ..शिवराज्यभिषेक सोहळा’
(३१ मे २०१५)
मोठ्या आनंदाने अन जल्लोषपूर्ण वातावरणात ‘दुर्ग दुर्गेश्वर रायगड’ वर व्यवस्थितरीत्या पार पडला .
महाप्रसादाचा लाभ घेत , दूर दूर वरून आलेले शिवप्रेमी, तो सारा शिवसागर ,तो जनसमुदाय तो ‘सुवर्ण क्षण’
नजरेत सामावत अन हृदशी बिलगत आता परतीची वाट पकडू लागले.
ऐन मध्यान वेळ , सूर्य डोक्यावर आग ओकत असता हि, त्याची जरा हि तमा न बाळगता , जो तो आल्यावाटेने ‘दुर्ग दुर्गेश्वर रायगड’ ला मनोमनं नमनं करत... मुजरा करत खाली उतरत होता .
लहानग्यांपासून ते अगदी थोरापर्यंत एकजूट झालेले शिवप्रेमी ..तो सोहळा पाहून , समाधानी होत, रायगडाची एक एक पायरी उतरू लागले होते .
जागोजागी , इथलेच स्थानिक मंडळी , सावली दिसेल तिथे आपलं बस्तानं मांडून बसले होते .
“ओ दादा, ओ ताई , लिंबू सरबत घेता का , घ्यांना , नायतर ताक तरी घ्या ओ “ ‘डोंगरातीलं काळीमैना बी हाय , घेता का ? घ्या बघा..’ जाणा येणाऱ्यांच्या कानी अशी वाक्य धडत होती.
नजरानजर होत होती.
आठवड्यातले नेमकेच असे क्षण(शनिवार रविवार )त्यांच्या वाटेला येत असतील , जिथे थोड्याफार प्रमाणात तरी त्यांच्या पोटाचा पाण्याचा प्रश्न मिटत असेल . लिंबू सरबत , कोकम सरबत, तर कुणी रानमेवा विकून ....
तेवढास काहीसा दिलासा .
तर असो ..
हे सगळं पाहतं, ऐकतं , कधी थंडगार ‘कोकम सरबत’ वर तर कधी ‘लिंबू पाणी’ वर ताव मारत आम्ही रायगड उतरत होतो...
समुद्रसपाटीपासून सुमारे २९०० फूट उंचीवर स्थिरावलेला अन चहु बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला हा दुर्ग दुर्गेश्वर .... मनाशी काही गुणगणू लागला.
‘अरे कुठे लगेच निघालास रे, इतक्यात ....थोडा अजून थांब कि............कधी निवांत क्षणी हि.....
ह्या गौरवशाली इतिहासाचा ध्यास घेऊन....सर्वत्र फिरून तरी बघ...एखादं रात्र काढ ..
इथल्या गुजगोष्टी ऐक... ध्यानस्थ हो...अगदी शिवसमाधीजवळ....इथल्या एक एक वास्तू इमारती जवळ...
साऱ्या घटनांचा तू साक्षीदार होशील.
ह्या गौरवशाली इतिहासाचा ध्यास घेऊन....सर्वत्र फिरून तरी बघ...एखादं रात्र काढ ..
इथल्या गुजगोष्टी ऐक... ध्यानस्थ हो...अगदी शिवसमाधीजवळ....इथल्या एक एक वास्तू इमारती जवळ...
साऱ्या घटनांचा तू साक्षीदार होशील.
ह्या प्रेरित ईतिहासाचं सळसळतंपण तुझ्या अंगी रुजेल... भिनेल ते अंगभर ..
हे भगवं वादळ फडकत राहील..कायम तुझ्या हृदयी....
पण एका ध्यासाने उन्मत होवून फिरशील तर ते गवसल तुला...
हे भगवं वादळ फडकत राहील..कायम तुझ्या हृदयी....
पण एका ध्यासाने उन्मत होवून फिरशील तर ते गवसल तुला...
बघ ,' पहायचं आहे ?
‘ऐकायचं आहे, मग .. घे ध्यास …..घे मागोवा..आपल्या ईतिहासाचा ..
इथलं सारं वैभवं पुन्हा नव्याने जिवंत होईल....
केवळ तुझ्यासाठी …. केवळ तुझ्यासाठी . ..!
केवळ तुझ्यासाठी …. केवळ तुझ्यासाठी . ..!
दुर्ग दुर्गेश्वर रायगड ...अन मनाची अशी बातचीत ..अंगभर सैर करत होती.
पाऊलं मात्र न थांबता वेगवान झाली होती . कुठली एवढी घाई लागली होती कुणास ठाऊक .
हे दुर्ग दुर्गेश्वरां आज तरी मी थांबू शकत नाही रे ,
‘मला माफ कर .. ' येतो , निरोप घेतो तुझा...,
आजचे हे सोनेरी क्षण मात्र हृदयी सामावून घेत ...
जय भवानी जय शिवराय ..!
जवळ जवळ आता बरसचं अंतर पार केलं होतं .
खूबलढा बुरुजाशी येउन पोहचलो होतो. एका मागोमाग सुरु असलेली माणसाची रीघ, अजून काही संपत न्हवती .
पायांची रेल चाल सुरुच होती . तेवढ्यात पायवाटेच्या कडेला नजर एकवटली .
एका खांब्याला बिलगून राहिलेलं ते लहानगं पोरगं दिसलं.
निरागसं अस , भाबड्या मनाचं , कोवळ्या वयाचं ...
इथून येणाऱ्या जाणाऱ्या कडून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षनं पाहत. अन हळूवार एकच शब्द पुटपुटतं ..
..'खाऊ'........................'खाऊ'
क्षणभर त्याकड पाहतच राहिलो . कोवलं वय , भूखेशिवाय तरी त्याला काय कळणार..
देश स्वतंत्र होऊन हि इतकी वर्ष झाली. तरी हि इथले रयत अजूनही भूखेने कळवळते हो..... तीच गोष्ट मनाशी फार सळते .
आपल्या वतीने आपण प्रयत्न करू ..एकमेकांना सांभाळू , धीर देऊ , कुणाचा आधार होऊ..
कुठेतरी मनाला दिलासा मिळेल हो ..
त्या मुलाचे आई वडील हि काबाड कष्ट करतच असतील....नाही असे नाही, पण त्यातून त्याचं भागत असेल का ?
नाही..... नाही भागत असणार ...हे जगणचं महाग झालय रे .....
त्या कोवळ्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अन त्याचे शब्द ऐकून पाउलं तिथेच थांबली.
मन स्थिर झालं.
पाठीवरली बैग हळूच पुढे घेतली.
त्यात जे काही (खाऊ) होतं ते त्याला देऊ केलं. अन काही क्षण टकमकतेने त्याचा चेहरा न्याहाळू लागलो .
भाव निरखू लागलो . त्यानं किंचीत्स हास्य केलं. अन लाजाळून पुन्हा इकडे तिकडे पाहू लागलं .
त्यानं काहीसा समाधानी झालो.
( पूर्णतः नाही ) अन बैग पुन्हा पाठीशी घेत, पुन्हा पुढे चालू लागलो.
हि पाऊलं हि आज कुणास ठाऊक थांबायला तयार न्हवती .त्यांनी वेग घेतला . झपझप ती पुढे पडू लागली.
बस्स काहीस अंतरच आता बाकी उरलं होतं. आम्ही रायगड उतरणार होतो .
पण मनात मात्र दुर्गदुर्गेश्वर रायगड , त्या निरागस कोवळ्या मनाची छबी अन अन तो शब्द...
(खाऊ) एक सारखा उमटत होता. तर दुसरीकडे एक विचार अधून मधून मनाशी घिरट्या घेत होता .
खरच ..महाराज आता असते तर .....त्यांच्या हि डोळ्यांची कड पाणावली असती....
रयतेच राज्य ... रयत कशी काय उपाशी....?
संकेत य पाटेकर
०२.०६.२०१५
२ टिप्पण्या:
Khup divsani tuji post aali.............. khup cha chan
आपले मनापासून धन्यवाद ..वेळ काढून माझा ब्लॉग वाचल्याबद्दल ..! :) लवकरच इतर ट्रेक अनुभव हि पोस्ट करेन . :)
टिप्पणी पोस्ट करा