गुरुवार, ५ जून, २०१४

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

कधी कधी आपल्याच नातेवाईकांपैकी अथवा मित्र परीवारांपैकी कुणीतरी बोलून जातं. ज्याचा ट्रेक विषयी काहीही संबंध नसतो .
काय रे , नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?काय मिळतं त्यातून तुम्हाला ?
उगाच वेळ वाया , पैसे वाया ? नीट घरी बसा ना ?
एक दिवस मिळतो कुठे आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील असा उनाडायला घालवता . ?
दर शनिवार रविवार बघावं तर हा बाहेर ? कुठे तर ट्रेक ला म्हणे ? काय मिळतं त्यातून ..देव जाणे ?
असे वाक्य आपल्या आप्त मंडळीकडून हमखास ऐकायला मिळतात .
अन आपण ते वाक्य ह्या कानाकडून त्या कानाकडे अगदी सहजतेने भिरकावून मोकळे हि होतो .
कारण त्यांना सांगून समजावून हि काहीहि उपयोग नसतो. पण समजणारे समजतात .
आपला मुलगा /मुलगी इतर मुलांसारखा वाईट मार्गाला तर नाही ना हे त्यांना पटलेले असतं .
शिवरायांबद्दल प्रेम अन आदर हा असतोच त्यांच्या हृदयी , आणि तो असलाच पाहिजे.
महाराष्ट्रात ह्या तपोभूमीत जो जन्म झाला आहे आपला , हेच मोठं भाग्य आपलं !

तर ट्रेक म्हणजे नक्की काय?
ट्रेक म्हणजे नुसतंच डोंगर चढणं - उतरणं नाही .
ट्रेक म्हणजेच नुसतंच काही मौज मजा हि नाही .
ट्रेक म्हणजे मनाने मनाला दिलेली हाक
ट्रेक म्हणजे शिवतेजाची प्रेरणादायी आग

ट्रेक म्हणजे आडवाटेची नुसतीच पायपीट न्हवे
ट्रेक म्हणजे निथल्या घामाचे थकवे थेंब न्हवे
ट्रेक म्हणजे चैतन्याची नवी उमेदी लाट
टेक म्हणजे अभिमानाची सह्याद्रीची साद

ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकणं - पाहाणं न्हवे
ट्रेक म्हणजेच नुसतंच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे
ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन शौर्याचा इतिहास
ट्रेक म्हणजे चिराचीरातुनी घूमघुमलेला आवाज

इतकंच न्हवे ..
तर ट्रेक म्हणजे निसर्गातल्या हरएक घटकांशी
अगदी मुक्तपणे केलेला संवाद .
ट्रेक म्हणजे साऱ्यांशी जुळवून घेतलेला हर एक श्वास.
ट्रेक म्हणजे गती
ट्रेक म्हणजे योग्य दिशा .
ट्रेक म्हणजे जीवनाची शिस्तबद्ध हालचाल
ट्रेक म्हणजे प्रेम
जीवनावर , जगण्यावर , इथल्या माणसां माणसांनवर
ट्रेक म्हणजे बरंच काही ...
खेड्या खेड्यातुनी पाहिलेली जीवनाची विविधरंगी रहाट गाडी..!

असा हा 'ट्रेक' करतेवेळी सृष्टी सौंदर्याची ....विविध मनवेडी रूपं पाहता येतात.
सह्याद्री असा भुरळ घालतो , वेड लावतो मनाला !ते वेगळंच ..!

संकेत य पाटेकर
०५.०६.२०१४